Dr Satish Upalkar’s article about Varicose veins upay in Marathi.

व्हेरिकोज व्हेन्स –

व्हेरिकोज व्हेन्स मध्ये अशुद्ध रक्तवाहिन्यात रक्त जमा होऊन शिरा फुगतात. यामुळे शिरांना सूज येते व त्या दुखू लागतात. पायाच्या शिरांमध्ये व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास अधिक दिसून येतो. व्हेरिकोज व्हेन्स वरील सोपे घरगुती उपाय या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी सांगितले आहेत.

 home remedies for varicose veins article by Dr Satish Upalkar.

व्हेरिकोज व्हेन्सची कारणे –

  • कुटुंबात व्हेरिकोज व्हेन्सची अनुवांशिकता असणे,
  • ‎गरोदरपण,
  • लठ्ठपणा,
  • ‎व्यायामाचा अभाव,
  • ‎सिगारेट-धूम्रपान सारखी व्यसने,
  • ‎उंच टाचेच्या चप्पल वापरणे,
  • ‎आहारात मिठाचे जास्त प्रमाण असणे,
  • ‎बराच काळ उभे किंवा बसून रहाण्याची सवय असणे

,
अशा विविध कारणांमुळे व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास होऊ शकतो.

व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणे –

  • त्वचेवर जांभळट किंवा निळ्या रंगाच्या फुगीर शिरा दिसू लागतात,
  • अशुद्ध रक्त साठून शिरा फुगतात.
  • शिरांना सूज येते,
  • त्या शिरा दुखू लागतात,
  • शिरांच्या ठिकाणी खाज सुटते,
  • ‎पायाच्या शिरा सुजल्यास त्यामुळे पाय दुखू लागतो.

असे त्रास व्हेरिकोज व्हेन्समुळे होतात.

व्हेरिकोज व्हेन्स वर हे घरगुती उपाय करावे –

1) दुधात लसूण घालून प्यावे.
एक कप दुधात 3 लसूण कळ्या घालून दूध उकळून प्यावे. हा घरगुती उपाय नियमितपणे केल्याने शिरांचे अडथळे दूर होऊन व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास कमी होतो.

2) दुधात हळद घालून प्यावे.
काही दिवस एक ग्लास दुधात 1 चमचा हळद आणि थोडासा मध घालून ते दूध प्यावे. या उपायाने शिरांचे अडथळे दूर होऊन व्हेरीकोज व्हेन्सची समस्या दूर होते.

3) डाळिंबाचा रस प्यावा.
ग्लासभर डाळिंबाचा रस नियमितपणे काही दिवस सेवन करावा. यामुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते. व्हेरिकोज व्हेन्स घालवण्यासाठी हा घरगुती उपाय फायदेशीर आहे.

4) ऑलिव्ह ऑईलने मालीश करावी.
व्हेरिकोज व्हेन्स वर ऑलिव्ह ऑईलने मालीश करणे हा उपाय खूप फायदेशीर असतो. यामुळे शिरांतील अडथळा दूर होतो, त्याठिकाणी रक्ताभिसरण व्यवस्थित होते. तसेच मालीश केल्याने शिरांना आलेली सूज कमी होऊन वेदना दूर होण्यास मदत होते.

5) व्हेरिकोज व्हेन्स वर झेंडूची फुले चोळावीत.
व्हेरिकोज व्हेन्स वर झेंडूची फुले चोळल्याने हा त्रास कमी होण्यास मदत होतात.

वरील घरगुती उपाय व्हेरिकोज व्हेन्सच्या त्रासावर उपयोगी असतात.

वेरिकोज व्हेन्स असल्यास घ्यायची काळजी –

Written by - डॉ. सतीश उपळकर
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास येथे क्लिक करून आमचे YouTube चॅनल Subscribe करा.

हे सुध्दा वाचा – व्हेरिकोज वेन्सवरील उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

3 Sources

Information about Varicose veins Home remedies in Marathi language. Article written by Dr Satish Upalkar.

माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल जरूर Subscribe करा.


सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...