व्यायाम नियोजन : व्यायामाचे प्रकार आणि फायदे

39144
views

Exercise information in Marathi Exercise types and importance in Marathi.

व्यायाम म्हणजे काय..?
शरीराला स्थिरता प्राप्त करण्यासाठी, शरीर मजबुत बनवण्यासाठी, बल वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या क्रियेस व्यायाम असे म्हणतात. व्यायामामुळे शारीरीक कष्ट करण्याची क्षमता अर्थात स्टॅमिना वाढतो. तुम्ही जर चार्जिग केलं नाही तर तुमचा मोबाइल फोन चालेल का? अगदी तसेच शरीराला, मनाला, डोक्याला रीचार्ज करण्यासाठी कमीत कमी दररोज 30 मिनिटांचा व्यायाम आवश्यक आहे. व्यायाम म्हणजे खरं री-क्रिएशन. एकदा व्यायामाची सवय लागली की व्यायाम हा दैनंदिन जीवनाचा एक भागच होऊन जाईल.

नियमित व्यायामाचे फायदे :
• व्यायामामुळे शरीर निरोगी आणि बांधेसूद बनते.
• ‎व्यायामामुळे स्नायूंची (मसल्सची) शक्ती, लवचिकता वाढते. मसल्स मजबूत बनतात.
• ‎शरीरातील चरबीचे प्रमाण नियंत्रित राहते,
• ‎शरीराच्या चयापचयाच्या गतीमध्ये सुधारणा होते.
• ‎हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. पर्यायाने स्टॅमिना वाढतो.
• ‎शरीर मजबूत होते, बलाची वाढ होते पर्यायाने रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते.
• ‎रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढते.
• ‎कोलेस्टेरॉल नियंत्रित होते.
• ‎मानसिक तणाव कमी होतो. मन ताजेतवाने, प्रसन्न बनते.
• ‎व्यायामामुळे आळस नाहीसा होतो.
• ‎झोप व्यवस्थित लागते.
• ‎कार्य करण्याची स्फुर्ती मिळते, आत्मविश्वास वाढतो.
• ‎उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा या सर्व विकारांपासून दूर राहण्यास व्यायामामुळे मदत होते. त्यामुळे फिट आणि निरोगी आयुष्य जगायचे असल्यास, आजपासूनच व्यायामाला सुरुवात करा. व्यायाम सुरू कसा करावा यासंबंधी महत्वाच्या फिटनेस टिप्ससुद्धा जाणून घ्या..

व्यायामाचे विविध प्रकार :
(1) एरोबिक व्यायाम – 

हृदयाची, फुफुसांची आणि स्नायूंची गती आणि शक्ती वाढवणाऱ्या व्यायामाला एरोबिक व्यायाम म्हणतात. चालण्याचा व्यायाम, सायकल चालवणे, पोहणे, जॉगिंग, ग्रुप अॅक्टिव्हिटी जसे झुम्बा एरोबिक्स, पॉवर योगा हे एरोबिक व्यायाम आहेत. अशा व्यायामामध्ये हृदयाचे ठोके आणि श्वासाचे प्रमाण 20 ते 30 टक्क्यांनी वाढले पाहिजे आणि ते 20 ते 30 मिनीटे करायला हवा. अशा व्यायामामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते, म्हणजेच न थकता काम करता येण्याची शक्ती वाढते. हा व्यायाम हृदयविकार असलेल्या व्यक्तींही डॉक्टरच्या सल्ल्याने करू शकतात.


** कॉपी पेस्ट संबधी विशेष सूचना **
ही माहिती आपणास कॉपी पेस्ट करून वापरता किंवा शेअर करता येणार नाही. तसा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. © कॉपीराईट हेल्थमराठी डॉट कॉम.

(2) अॅनेरोबिक व्यायाम (Anaerobic Exercise) –
ताकद म्हणजे कुठलीही क्रिया करण्याची स्थिती. ताकद वाढण्यासाठीच्या व्यायामाला अॅनेरोबिक व्यायाम म्हणतात. या प्रकारांमध्ये जलदरित्या हालचाली कमी वेळात कराव्या लागतात. ह्यात वजन उचलणे, जोर बैठका, दोरीवरच्या उडय़ा, वेगाने धावणे आदी प्रकारांचा समावेश असतो. अशा प्रकारच्या व्यायामामुळे कमी वेळात जास्त ऊर्जा (कॅलरीज) वापरली जाते. ह्या व्यायामामुळे आपले स्नायू पिळदार व डौलदार दिसतात. हा व्यायाम हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी करू नये.

(3) स्ट्रेचिंग व्यायाम –
दुखापत न होता आपल्या शरीराला कोणत्याही स्थितीत नेता येणे म्हणजेच लवचिकता. वयोमानाने व योग्य व्यायामाच्या अभावी स्नायू ताठरतात, कडक बनतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. ह्यामुळे आपल्याला इजा आणि दुखापत देखील होऊ शकते. लवचिकता राखण्यासाठी स्नायूंना ताण देण्याचे व्यायाम उपयुक्त आहेत. 

(4) योगासने –
शरीरातील सांधे लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन. योगासनांच्या नियमित सराव केल्याने शारीरिक हालचालींना उपयोगी पडणारे स्नायू सक्षम होतात. योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व मानसिक ताण तणाव नाहीसा करण्यास उपयुक्त ठरतात.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

अर्धा तासाचा व्यायाम आणि बर्न होणारी कॅलरी :
• अर्धा तास चालणे – 200 कॅलरी
• ‎अर्धा तास सायकलिंग – 330 कॅलरी
• ‎एरोबिक व्यायाम – 260 कॅलरी
• ‎मैदानी खेळ – 250 कॅलरी
• ‎पोहण्याचा व्यायाम – 280 कॅलरी

हे सुद्धा वाचा..
व्यायाम करताना कोणती काळजी घ्यावी..?
वजन कमी करण्यासाठी व्यायाम कसा करावा..?
लठ्ठपणा म्हणजे काय? त्याची कारणे, होणारे दुष्परिणाम व उपाय

– डॉ. सतीश उपळकर
CEO, Health Marathi Network


exercise in marathi importance of exercise in marathi types of exercise in marathi benefits of exercise in marathi benefit of exercise in marathi language importance of exercise in life essay in marathi exercise information in marathi vyayamache mahatva in marathi vyayamache prakar in marathi aerobic exercise in marathi anaerobic in marathi aerobic meaning in marathi aerobics exercise videos bhayanak mahiti bhayanak kasaa karava vajan kami karnyasathi vyayam weight loss excersise marathi fat burning vyayam व्यायाम कसा करावा जिम मध्ये व्यायाम कसा करावा व्यायाम कसा कोणता व किती करावा वेळ प्रमाणात व्यायाम आणि आहार व्यायाम करण्याचे प्रकार व्यायाम चे प्रकार पोट कमी करण्यासाठी व्यायाम व्यायाम आणि आहार व्यायाम माहिती मराठीत


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.