अक्रोड खाण्यामुळे होणारे फायदे व नुकसान – Health benefits of Akhrot in Marathi

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

अक्रोड – Walnuts :

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुखामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे प्रमाण भरपूर असते. अक्रोडला ब्रेन फूड असेही म्हणतात. मेंदूच्या आरोग्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी अक्रोड खाणे फायदेशीर ठरते.

अक्रोडमध्ये उच्च प्रतीचे अँटी-ऑक्सिडेंट, ओमेगा-3 फॅटी ऍसिड, मेलाटोनिन, पॉलीफेनॉल आणि व्हिटॅमिन-E असे अनेक उपयुक्त पोषक घटक असतात. यामुळे हृदयविकार, मधुमेह, कँसर होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.

अक्रोड खाण्याचे हे आहेत फायदे :

हृद्यविकाराचा धोका कमी करते..
अक्रोडमध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते. तसेच दररोज अक्रोड खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, वजन आटोक्यात राहते, रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होत असल्याने हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

कॅन्सरचा धोका कमी करते..
अक्रोडमध्ये polyphenols या कँसरविरोधी घटकाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे दररोज अक्रोड खाण्यामुळे ब्रेस्ट कँसर, प्रोस्टेट कँसर आणि मलाशयाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.

वजन कमी करते..
अक्रोड खाण्यामुळे भूक कमी लागते व वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास किंवा वजन आटोक्यात ठेवायचे असल्यास अक्रोड खाणे एक चांगला पर्याय ठरू शकतो.

मधुमेहामध्ये उपयुक्त..
वजन जास्त असल्यास टाईप-2 डायबेटीस होण्याचा धोका जास्त असतो. मात्र अक्रोड खाण्यामुळे वजन आटोक्यात राहत असल्याने टाईप-2 डायबेटीसचा धोका कमी होतो. याशिवाय अक्रोडमुळे रक्तातील साखरही नियंत्रित होते त्यामुळे मधुमेह रुग्णांसाठी अक्रोड खाणे हितकारक असते.

हृद्यविकाराचा धोका कमी करते..
अक्रोडमध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते. तसेच दररोज अक्रोड खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, वजन आटोक्यात राहते, रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होत असल्याने हृद्यविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.

ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवते..
दररोज अक्रोड खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. हाय ब्लडप्रेशरमुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक (पक्षाघात) आणि किडन्या निकामी होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ब्लडप्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणे आवश्यक असते.

वाईट कोलेस्टेरॉल कमी करते..
रक्तामध्ये वाईट कोलेस्टेरॉलचे (LDL कोलेस्टेरॉलचे) प्रमाण जास्त असल्यास हार्ट अटॅक, हृदयविकार, पक्षघात, हाय ब्लडप्रेशर होण्याचा धोका जास्त वाढतो. यासाठी रक्तात वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असणे गरजेचे असते. दररोज अक्रोड खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल आणि triglycerideची पातळी कमी होण्यास आणि चांगल्या कोलेस्टेरॉलचे (HDL कोलेस्टेरॉल) चे प्रमाण वाढण्यास मदत होते.

मेंदूसाठी उपयुक्त..
अक्रोडचा आकार हा अगदी दिसायला मेंदू सारखाच असून अक्रोड खाणे मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. अक्रोडमध्ये असणारे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट, पॉलीफेनॉल आणि व्हिटॅमिन-E हे उपयुक्त घटक आपल्या मेंदूमध्ये ऑक्सिडेटिव्ह डॅमेज आणि सूज कमी करण्यास मदत करतात. अक्रोड खाण्यामुळे मेंदू तल्लख होऊन स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. मानसिक तणाव, नैराश्य दूर करण्यासही अक्रोड उपयुक्त ठरते.

पुरुषाच्या जनन क्रियेसाठी उपयुक्त..
शुक्रजंतूंची (Sperm) संख्या वाढण्यासाठी अक्रोड उपयुक्त ठरतात. पुरुषांच्या वंध्यत्वसंबंधित तक्रारी ह्या दररोज अक्रोड खाण्यामुळे कमी होण्यास मदत होते. शुक्रजंतू कमी असल्यामुळे वंध्यत्व निर्माण झालेल्या पुरुषांनी अक्रोड नियमित खावा.

वाईट कोलेस्टेरॉल कमी करते..
रक्तामध्ये वाईट कोलेस्टेरॉलचे (LDL कोलेस्टेरॉलचे) प्रमाण जास्त असल्यास हार्ट अटॅक, हृदयविकार, पक्षघात, हाय ब्लडप्रेशर होण्याचा धोका जास्त वाढतो. यासाठी रक्तात वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असणे गरजेचे असते. दररोज अक्रोड खाण्यामुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल आणि triglycerideची पातळी कमी होण्यास आणि चांगल्या कोलेस्टेरॉलचे (HDL कोलेस्टेरॉल) चे प्रमाण वाढण्यास मदत होते.

अक्रोड कसे खावे..?

अक्रोडचे कवच मजबूत असते. अक्रोड खाण्यासाठी अक्रोडचे कठीण कवच फोडून आत असलेला गर खावा. अक्रोड हा इतर सुक्यामेव्यासोबत खाल्ल्यास आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतो. अक्रोड खरेदी करताना कवचासह असणारे अक्रोड खरेदी करावेत आणि ज्यावेळी अक्रोड खायचा आहे त्याचवेळी तो फोडून खावा. अक्रोड एकाचवेळी फोडून गरांची साठवणूक करायची असल्यास हवाबंद बरणीत किंवा फ्रिजमध्ये ठेवावेत. कारण फोडून ठेवलेल्या अक्रोडच्या गराला कीड लागण्याची जास्त शक्यता असते.

रोज किती अक्रोड खावेत..?

अक्रोडमध्ये अनेक पोषकघटक असली तरीही योग्य प्रमाणातचं अक्रोड खाणे आवश्यक असते. एका दिवसांमध्ये साधारण 4 ते 6 अक्रोड खाऊ शकता.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

अक्रोड खाण्यामुळे होणारे नुकसान :

अक्रोड खाण्यामुळे काही व्यक्तींना ऍलर्जीचा आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो. अधिक प्रमाणात अक्रोड खाल्ले गेल्यास त्यामुळे त्वचेवर खाज व पुरळ उटणे, अतिसार आणि मळमळ होऊ शकते. ऍलर्जीचा विचार करता दमा रुग्णांनी आणि गरोदर स्त्रियांनी अक्रोडचा आहारात समावेश करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

एका अक्रोडमधील पोषकघटक :

मिळणारी ऊर्जा – 26 कॅलरीज
एकूण फॅट – 2.61 ग्रॅम
सॅच्युरेटेड फॅट – 0.245 ग्रॅम
ट्रान्सफॅट – 0 मिलीग्राम
पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट – 1.887 ग्रॅम
मोनोअनसॅच्युरेटेड फॅट – 0.357 ग्रॅम
कोलेस्टेरॉल – 0 मिलीग्राम
सोडियम – 0 मिलीग्राम
एकूण कार्बोहायड्रेट – 0.56 ग्रॅम
फायबर – 0.3 ग्रॅम
शुगर्स – 0.1 ग्रॅम
प्रोटिन्स (प्रथिने) – 0.61 ग्रॅम
कॅल्शियम – 4 मिलीग्राम
आयर्न (लोह) – 0.12 मिलीग्राम
पोटॅशियम – 18 मिलीग्राम

Information about akrod dry fruit benefits in Marathi language.