त्वचेला खाज येण्याची कारणे आणि उपाय (Skin Itching in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

त्वचेला खाज सुटणे (Itchy skin) :

त्वचेला खाज अनेक कारणांनी येत असते. विविध त्वचारोगांमध्ये खाज हे प्रमुख लक्षण म्हणून आढळते. खरूज, नायटा, शीतपित्त, घामोळया ह्या सारख्या रोगांत त्वचेवर खाज सुटते.

ऍलर्जीमुळे (वावडे), जंतुसंसर्ग झाल्याने, त्वचेच्या शुष्कतेमुळे तर कधी कीटकाच्या दंशामुळे त्वचेला खाज येण्याची शक्यता असते. त्यापैकी ऍलर्जी हे खाण्यातील विशिष्ट पदार्थ, सूर्यप्रकाश, धूळ, कृत्रिम धाग्याचे कपडे, औषधे, मासे, अंडी यांपैकी कशाचेही असू शकते.

त्वचेची खाज कमी करण्यासाठी हे करा घरगुती उपाय :

• जंतूसंसर्ग टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता ठेवा.
• ‎आंघोळ करताना जंतूनाशक साबणाचा वापर करा त्यामुळे त्वचेवरील जिवाणूंची संख्या आटोक्यात राहील.
• ‎आपल्याला अॅलर्जी आहे असे पदार्थ टाळा.
• ‎त्वचेवर खाज सुटत असल्यास खोबरेल तेल लावा त्यापासून आराम मिळवण्यास नक्कीच मदत होईल.
• ‎जास्त प्रमाणात खाजवल्यास त्वचेला हानी पोहचून इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. यासाठी नखे वेळेवर कमी करावीत.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

अधिक काळ हा त्रास होत असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हे सुद्धा वाचा..
अंगावर पुरळ उठणे आणि उपाय
अंगावर पित्त उठण्याची समस्या व उपाय

Itchy skin (Pruritus) in Marathi. Skin itching causes, symptoms and treatment in Marathi.