नागीण रोग (हर्पीस जोस्टर) : नागीण रोगाची कारणे, लक्षणे, निदान आणि उपचार माहिती मराठीत

4129
views

Nagin rog in marathi, Nagin rog karane lakshne nidan upchar mahiti shingles or herpes zoster in marathi skin disease in marathi

नागीण रोग म्हणजे काय..?
नागीण हा एक विषाणूजन्य आजार असून याला विसर्प, शिन्गल्स किंवा हर्पीस जोस्टर या नावांनीही ओळखले जाते. नागीण हा आजार कांजिण्याच्या विषाणूमुळे होतो. लहानपणी ज्यांना कांजिण्या झालेला असतो त्यांच्या शरीरात मज्जारज्जूमध्ये कांजिण्याचा विषाणू लपून बसलेले असतात. आणि जेंव्हा केंव्हा त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा हे लपलेले विषाणू पुन्हा जागृत होतात आणि मज्जारज्जूतून एखाद्या नसेमार्फत पसरून त्वचेवर प्रचंड वेदना असणारे पुरळ निर्माण करतात त्याला नागीण होणे असे म्हणतात. हे सुद्धा वाचा – कांजिण्या (Chicken pox) ह्या आजाराविषयी माहिती जाणून घ्या..

नागीण ही शरीराच्या एकाच बाजूला येते. या विषाणूची एका किंवा दोन-तीन नसांनाही याची लागण होऊ शकते. नागीण त्वचेवर होतो तसेच डोळ्यांमध्येही होऊ शकतो. डोळ्यांमध्ये नागीण झाल्यास परिणामी अंधत्वही येऊ शकते.

नागीण रोगाची लक्षणे :
• ‎नागीण झालेल्या ठिकाणी वेदना होतात. त्याठिकाणी हात लावल्यास वेदना जास्त जाणवितात.
• ‎तेथील त्वचेची आग होते.
• ‎दोन-तीन दिवसांनंतर लालसर पुरळांचे पुंजके येतात व त्यानंतर त्यात पाणी धरते.
• ‎पाच ते सहा दिवसात खपल्या धरतात व फोडही जातात. फोड गेल्यानंतर वेदना कमी होते.
नागीण बरी झाल्यावरही काही व्यक्तींना त्या नसेच्या क्षेत्रात अधूनमधून वेदना होणे, चमक मारणे असा त्रास होऊ शकतो.

ही माहिती कॉपी पेस्ट करू नका :
ही माहिती आपणास कॉपी पेस्ट करून वापरता किंवा शेअर करता येणार नाही. तसा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – हेल्थमराठी डॉट कॉम © कॉपीराईट सूचना.

नागीण उपचार :
डॉक्टरांकडून नागीण झाल्यावर लगेच उपचार सुरू करावेत त्यामुळे याचा त्रास लवकर कमी होऊन रुग्ण पूर्णपणे बरा होतो. यासाठी आपले डॉक्टर अँटीव्हायरल आणि वेदना कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधे देतील.

इतर विविध संसर्गजन्य रोगांची माहितीसुध्दा वाचा :
खालील सर्व प्रमुख संसर्गजन्य रोगांची माहिती मराठीमध्ये हवी असल्यास येथे क्लिक करा..
डेंग्‍यू ताप, मलेरिया, चिकुनगुन्‍या, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्लू, निपाह वायरस, गोवर, वाऱ्याफोड्या, जर्मन गोवर, कांजिण्या, नागीण, काविळ, हिपॅटायटीस, टायफॉईड, गालफुगी, टॉन्सिल्स सुजणे, डांग्या खोकला, न्यूमोनिया, घटसर्प, क्षयरोग TB, कुष्ठरोग, एड्स HIV यासारख्या सर्व प्रमुख संसर्गजन्य रोगांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

नागीण झाल्यास ही काळजी घ्या..
• हलका आहार घ्यावा.
• ‎पुरेशी विश्रांती घ्यावी.
• ‎नागीण असलेल्या ठिकाणी खाजवू नका.
• ‎अंघोळीनंतर ती जागा पुसून घ्यावी.
• ‎नागीण झालेल्या रुग्णाचे कपडे, साबण इ. वैयक्तिक वापराच्या वस्तू दुसऱ्यांनी वापरू नयेत.
• ‎गरोदर स्त्री, लहान बालके आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी नागीण झालेल्या रुग्णांचा प्रत्यक्ष संपर्क टाळावा.
• ‎घरगुती उपाय करत बसू नका.
• ‎डॉक्टरांकडून नागीण झाल्यावर लगेच उपचार करून घ्या.
• ‎मुख्य म्हणजे नागीण ह्या आजारावर असलेल्या गैरसमजांवर विश्वास ठेऊ नका. जसे नागिणीचे दोन टोके मिळाल्यास किंवा नागिणीने विळखा मारला की जीवाला धोका होतो. ह्या सर्व गैरसमजुती आहेत. नागीण ही शरीराच्या एकाच बाजूला येते त्यामुळे दोन टोके जुळण्याचा, विळखा घेण्याचा प्रश्नचं येत नाही.

In this article..
नागीण आजारावर घरगुती उपाय आजार व उपाय nagin rog in marathi त्वचा रोग व उपचार नागीण रोग घरगुती उपाय रोग आणि उपाय कशामुळे होतो नागीण आजार ? जाणून घ्या घरगुती उपाय मराठीत ..नागीण आणि उपचार | नागीण समज-गैरसमज – नागिणीचा विळखा – वेळीच ओळखा! | काय नागीण आहे – संसर्ग मार्ग, व्हायरल संसर्ग नागीण रोग म्हणजे काय ? कशामुळे होतो नागीण आजार ? जाणून घ्या विसर्प आजार आयुर्वेदिक उपचार होमिओपॅथी नागीण किंवा हर्पीझ झोस्टर या आजाराविषयी हरपिज (नागिण) त्वचेवर खाज आग येणे त्वचेचे आजार चमडी रोग shingles | त्रास शिंगल्सचा Shingles: Symptoms, Treatment, and Prevention in marathi home remedies for shingles or herpes zoster virus shingles disease meaning in marathi skin disease in marathi shingles disease in marathi shingles in hindi marathi word for shingles nagin disease nagin rog in marathi nagin rog ka ilaj in marathi shingles meaning nagin rog ke upay in marathi nagin rog ka ilaj in marathi nagin rog upay nagin disease home treatment in marathi nagin rog treatment in hindi nagin disease upchar in marathi nagin rogachi mahiti nagin rog kaise hota hai

© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

नागीण आजारावर घरगुती उपाय आजार व उपाय nagin rog in marathi त्वचा रोग व उपचार नागीण रोग घरगुती उपाय रोग आणि उपाय कशामुळे होतो नागीण आजार ? जाणून घ्या घरगुती उपाय मराठीत ..नागीण आणि उपचार | नागीण समज-गैरसमज – नागिणीचा विळखा – वेळीच ओळखा! | काय नागीण आहे – संसर्ग मार्ग, व्हायरल संसर्ग नागीण रोग म्हणजे काय ? कशामुळे होतो नागीण आजार ? जाणून घ्या विसर्प आजार आयुर्वेदिक उपचार होमिओपॅथी नागीण किंवा हर्पीझ झोस्टर या आजाराविषयी हरपिज (नागिण) त्वचेवर खाज आग येणे त्वचेचे आजार चमडी रोग shingles | त्रास शिंगल्सचा Shingles: Symptoms, Treatment, and Prevention in marathi home remedies for shingles or herpes zoster virus shingles disease meaning in marathi skin disease in marathi shingles disease in marathi shingles in hindi marathi word for shingles nagin disease nagin rog in marathi nagin rog ka ilaj in marathi shingles meaning nagin rog ke upay in marathi nagin rog ka ilaj in marathi nagin rog upay nagin disease home treatment in marathi nagin rog treatment in hindi nagin disease upchar in marathi nagin rogachi mahiti nagin rog kaise hota hai

आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.