Article about Measles causes, symptoms, treatments and prevention in Marathi.

गोवर – Measles :

गोवर हा विषाणूपासून पसरणारा एक संसर्गजन्य आजार आहे. गोवर आजार विशेषतः लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात झालेला आढळतो. तसेच काहीवेळा मोठेपणीही गोवर होऊ शकते. गोवर आजार एकदा झाल्यास पुन्हा तो आजार त्या व्यक्तीला होत नाही. या लेखात गोवर रोग कशापासून होतो, त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार याची माहिती दिली आहे.

गोवर आजाराची कारणे – Measles Causes :

गोवर हा रोग Paramyxovirus या व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होत असतो. शरीरात या विषाणूंची लागण झाल्यानंतर साधारण 10 ते 12 दिवसात गोवरची लक्षणे जाणवू लागतात.

गोवर रोगाची लागण कशामुळे होते..?

गोवर हा व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. गोवराची साथ येत असते. गोवर आजाराने संक्रमित व्यक्तीच्या खोकला, शिंका यातून गोवराचे विषाणू हवेत पसरतात. आणि विषाणूंच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना गोवर आजार होत असतो. अशाप्रकारे रुग्णाच्या खोकला व शिंकेद्वारे हवेतून हा आजार पसरत असतो.

गोवरची लक्षणे – Measles Symptoms :

त्यानंतर 5 ते 7 चेहऱ्यावर व त्यानंतर पोट आणि पाठीवर लालसर बारीक आकाराचे पुरळ उटतात.

गोवर आणि लहान मुले :

लहान मुलांना गोवरची लागण झाल्यास अधिक काळजी घ्यावी लागते. कारण गोवरमुळे मुलाची प्रतिकार शक्ती कमी होऊन न्यूमोनिया, अतिसार यासारख्या गंभीर समस्या होऊ शकतात. काहीवेळा आजार गंभीर होऊन मुलाच्या जीवावरही बेतू शकते. तसेच गोवरमुळे शरीरातील व्हिटॅमिन-A चे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे गोवरकडे दुर्लक्ष करू नये. यावर कोणतेही घरगुती उपाय करत बसू नये.

लहान मुलांमध्ये अंगावर लाल पुरळ किंवा रॅशेस येणे, मुलाला ताप, सर्दी, खोकला येणे असे त्रास होत असल्यास मुलाला डॉक्टरांकडे घेऊन जावे. लहान मुलांमध्ये गोवरची अशी लक्षणे दिसल्यास त्यावर तात्काळ दवाखान्यात जाऊन उपचार घेणे गरजेचे आहे.

गोवर आजारावरील उपचार – Measles Treatments :

लहान मुलामध्ये गोवरची लक्षणे दिसल्यास त्याला तात्काळ डॉक्टरांकडे घेऊन जावे. गोवरवर रुग्णांत असलेल्या लक्षणांवरून उपचार केले जातात. जसे ताप असल्यास तापावरील औषध दिले जाते. त्यामुळे या आजारात सर्दी, ताप, खोकला यावरील औषधे देतात. गोवर उपचारात लहान मुलांना व्हिटॅमिन-A दिले जाते. गोवरच्या रुग्णाने विश्रांती घेणे आवश्यक असून पुरेसे तरल पदार्थ रुग्णाच्या आहारात असावेत. साधारणपणे 8 ते 14 दिवसात खोकला, ताप वैगेरे लक्षणे कमी होऊन पुरळसुद्धा कमी होऊन आजार बरा होतो.

गोवर प्रतिबंधात्मक उपाय :

गोवरची लागण होऊ नये म्हणून काय करावे, कोणते प्रतिबंधात्मक उपाय करावेत याची माहिती खाली दिली आहे.

  • लहान बालकांना आवश्यक त्या लसी वेळेवर द्याव्यात.
  • गोवर उठलेल्या मुलांना आजार बरा होईपर्यंत शाळेत पाठवून देऊ नये.
  • गोवर उठलेल्या रुग्णाच्या संपर्कात जाणे टाळावे.
  • गोवर असलेल्या रुग्णाच्या संपर्कात आल्यास आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
  • परिसरात गोवरची साथ आली असल्यास मास्क चा वापर करावा.
  • दूषित हातांचा स्पर्श आपले तोंड, डोळे यांना होणार नाही याची काळजी घ्यावी.

गोवर आणि लसीकरण :

MMR लसीमुळे गालगुंड (Mumps), गोवर (Measles) आणि वाऱ्याफोड्या (Rubella) ह्या तीन आजारांपासून रक्षण होते. MMR vaccine लहानपणी दिली जाते. त्यामुळे पुढे गालगुंड, गोवर आणि रूबेला अशा आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते.

लहान बालकांना नवव्या महिन्यात गोवरची लस देतात व दुसरा डोस दीड ते दुसऱ्या वर्षी देतात. गोवराची लस दिलेल्या मुलांना आयुष्यात पुढे कधीही गोवर आजार होत नाही. गोवरवर लसीकरण करून घेणे हाच प्रभावी उपचार आहे. त्यामुळे 9 महिने ते 5 वर्षे वयाच्या मुलांची गोवर लस घ्यायची राहिली असल्यास त्वरित ती मुलाला द्यावी.

न्युमोनीया आजाराची लक्षणे, कारणे व उपचार जाणून घ्या..

गोवर आणि रुबेला यातील फरक :

गोवर म्हणजे Measles तर वाऱ्याफोड्या म्हणजे रुबेला किंवा German measles. गोवर आणि रुबेला ह्या दोन्ही आजारांची लागण ही वेगवेगळ्या व्हायरसपासून होत असते त्यामुळे वरील दोन्ही आजार हे भिन्नभिन्न असे आजार आहेत.

हे सुद्धा वाचा..

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
4 Sources

In this article information about Measles symptoms, causes, prevention and treatments in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...