मलेरियाविषयी जाणून घ्या

7206
views

मलेरिया (Malaria) :
मलेरिया हा एक संक्रामक ज्वर आहे. यामध्ये शरीरात थंडी भरणे, अंग थरथरणे, डोकेदुखी, उलटी होणे, ताप येणे, सर्व शरीरात वेदना होणे यासारखी लक्षणे उद्भवतात. मलेरिया रोग हा विषमज्वर, शीतज्वर किंवा शीतताप या अन्य नावांनेसद्धा ओळखला जातो.

या विकारात थांबून थांबून ताप येत असतो. हा ताप प्लाज्मोडियम परजीवींच्या संक्रमणातून होतो. मलेरियास कारक असणारे प्लाज्मोडियम परजीवी हे एक कोशीय जिवाणू असून ते एनोफिलीज नामक मादा डासांच्या लाळ ग्रंथीत राहतात.
एनोफिलीज मादा डास स्वस्थ व्यक्तीस चावल्यास, प्लाज्मोडियम परजीवी त्या व्यक्तीच्या शरीरात, रक्तात पोहचतात.

हे परजीवी रक्तात पोहचून रक्तातील लाल पेशींवर (RBC) गंभीर परिणाम करतात. परजीवी RBC मध्ये ठराविक काळापर्यंत राहतात त्यानंतर RBC ला फाडून रक्तप्रवाहात येत असतात. RBC फाटल्यामुळे एक प्रकारचा टॉक्सिक घटक रक्तप्रवाहामध्ये मिसळतो. जेंव्हा परिपक्व परजीवी लालकणांना विदिर्ण करुन बाहेर येतात तेंव्हा शीत आदी लक्षणे उत्पन्न होत असतात. यामुळेच मलेरियामध्ये थांबून थांबून ताप येत असतो. अशाप्रकारे परजीवी पुनःपुन्हा RBC मध्ये प्रवेश करतात. रक्तप्रवाहातून यकृतात पोहचून आपली संख्या वाढवतात.

मलेरियाचे परजीवी रक्तातील लाल पेशींमध्ये राहत असल्याने मलेरिया संक्रमित व्यक्तिपासून रक्तदानाद्वारे किंवा दुषित सिरिंज किंवा अंगप्रत्यारोपनाद्वारे परजीवी दुसऱ्‍या व्यक्तीमंध्ये जातात.

प्लाज्मोडियम परजीवीच्या 4 प्रमुख जाती आहेत.
◦ प्लाज्मोडियम वाइवेक्स
◦ प्लाज्मोडियम ओवेल
◦ प्लाज्मोडियम फैल्सिपैरम
◦ प्लाज्मोडियम मलेरी
प्लाज्मोडियम वाइवेक्स आणि ओवेले हे परजीवी 48 ते 72 तासापर्यंत RBC मध्ये राहतात. त्यामुळे ह्यामध्ये दर तीन दिवसांनी ताप येत असतो.

इतर विविध संसर्गजन्य रोगांची माहितीसुध्दा वाचा :
खालील सर्व प्रमुख संसर्गजन्य रोगांची माहिती मराठीमध्ये हवी असल्यास येथे क्लिक करा..
डेंग्‍यू ताप, मलेरिया, चिकुनगुन्‍या, लेप्टोस्पायरोसिस, स्वाईन फ्लू, निपाह वायरस, गोवर, वाऱ्याफोड्या, जर्मन गोवर, कांजिण्या, नागीण, काविळ, हिपॅटायटीस, टायफॉईड, गालफुगी, टॉन्सिल्स सुजणे, डांग्या खोकला, न्यूमोनिया, घटसर्प, क्षयरोग TB, कुष्ठरोग, एड्स HIV यासारख्या सर्व प्रमुख संसर्गजन्य रोगांची माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

मलेरिया लक्षणे –
◦ अकस्मात ताप येणे
◦ थांबुन थांबून ताप येत राहणे
◦ शिरःशुल
◦ शरीरात वेदना होणे
◦ मांसपेशींमध्ये पीडा होणे
◦ मळमळणे, उलटी होणे
◦ सांध्यांच्या ठिकाणी वेदना होणे
◦ तहान लागणे
◦ नाडीची गती तीव होणे
◦ अतिसार यासारखी लक्षणे मलेरियामध्ये उत्पन्न होतात.

मलेरियाचे निदान कसे करतात –
रुग्ण इतिहास, शारिरीक परिक्षण आणि थांबून थांबून ताप येणे. थंडी वाजणे, मळमळणे, प्लीहा वृद्धी यासरख्या लक्षणांच्या आधारे मलेरियाचे निदान करण्यास मदत होते.
रक्त परिक्षण –
WBC Count- रक्त परिक्षणातून श्वेतकणांची संख्या कमी आढळते.
रक्तकण RBC मध्ये प्लाज्मोडियम परजीवी आढळतात.
तसेच Blood film examination द्वारे मलेरियाचे निदान केले जाते.

मलेरिया उपद्रव –
मलेरियाच्या परजीवींमुळे रक्तसंचारणास बाधा निर्माण होते. यकृत, रक्तातील रक्त कण, श्वेत कणांवर मलेरियामुळे गंभीर परिणाम होतात.
याशिवाय प्लीहा अतिवृद्धी Splenomegaly हा विकार उद्भवतो.
रक्ताल्पता, पक्षाघात, मुर्च्छा, अतिसार, Coma, अत्यधिक ज्वर, मुत्रवहसंस्थेचे विकार जसे वृक्कपात, युरीमिया, अमुत्रता यासारखे विकार मलेरियाची स्थिती अधिक काळापर्यंत शरिरात राहिल्यास उत्पन्न होतात. तसेच योग्य उपचाराअभावी मृत्युही येऊ शकतो.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

मलेरिया प्रतिबंधात्मक उपाय –
– कोणताही ताप अंगावर काढू नये.
– कोणत्याही तापावर डॉक्टरांसल्ल्याशिवाय परस्पर औषधे घेणे टाळावे.
– ताप सदृश्य लक्षणे जाणवल्यास तात्काळ चिकित्सकांकडे जावे.
– अनेक दिवसांपासून थांबून थांबून ताप येत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. आणि रक्त परिक्षण करुन घ्यावे.
– मलेरियाच्या निदानासाठी रक्त तपासणीपुर्वी मलेरिया नाशक औषधे घेऊ नये.
– डासांपासून रक्षण करणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. आपल्या घराशेजारी कचरा, सांडपाणी साचू देऊ नये. मलेरिया पसरवणारे डास विशेषतः संध्याकाळच्या वेळी वावरत असतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळी डासनाशक औषधांचा वापर करावा.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.