पांढरे कोड (Vitiligo) : लक्षणे, कारणे आणि उपचार माहिती

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Vitiligo in Marathi information. Vitiligo Causes, symptoms, types in Marathi. Vitiligo treatment in Marathi.

पांढरे कोड म्हणजे काय :

त्वचेतील रंगकण नष्ट झाल्याने त्वचेवर जे पांढरे डाग दिसतात, त्यांना कोड किंवा पांढरे कोड (Vitiligo) असे म्हणतात. रंग तयार करणाऱ्या पेशींना ‘पिगमेंट सेल्स’ किंवा ‘मेलॅनोसाईटस्’ (रंगपेशी) म्हणतात. या पेशी शरीरातील काही कारणांमुळे जर नष्ट झाल्या तर त्वचेचा रंग तयार होण्यात अडथळे येतात. अशा प्रकारे त्वचेच्या ज्या भागात रंग तयार होऊ शकत नाही तिथे पांढरा डाग पडतो. कोडाचे डाग आकाराने वेगवेगळे असतात, तसेच त्यांचे स्थान निश्चित असे नसते.

पांढरे डाग हे कोणत्याही वयाच्या व्यक्तींना होऊ शकतात. अगदी लहान बाळापासून ते वयस्कर व्यक्तींमध्येही हे डाग दिसू शकतात. पण अधिक रुग्ण तरूण वयातील आढळतात. कोड रोग हा संसर्गजन्य रोग नाही. पांढरे डाग (कोड रोग) उपचार माहिती खाली दिली आहे.

पांढरे कोड लक्षणे :

Vitiligo Symptoms in Marathi
कोडाच्या पांढर्‍या डागांची सुरुवात हातापायांची बोटे, कोपर, गुडघे, ओठ व तळवे यांपासून होते. या डागांमुळे वेदना, खाज किंवा दाह होत नाही. परंतु प्रखर सूर्यप्रकाशात या डागांमुळे दाह जाणवतो. कोडासंबंधी निश्चित अंदाज वर्तविता येत नाहीत. कोडाचे डाग आकाराने वाढू शकतात वा तसेच राहतात. ज्या भागांवर कोड येतात त्या भागांतील केसही पांढरे होतात.

पांढरे डाग कारणे :

Vitiligo Causes in Marathi
या विकाराला काही प्रमाणात जेनेटिक दोष कारणीभूत असतात. या विकारात जनुकामधील बिघाडामुळे त्वचेतील मेलॅनीन तयार करणार्‍या पेशी (मेलॅनोसाइट) नष्ट होतात. मेलॅनिनाच्या निर्मितीनुसार त्वचेचा आणि केसांचा रंग ठरतो. सुमारे तीस टक्के रुग्णांच्या बाबतीत कोडाचे डाग आनुवांशिक असल्याचे दिसते. पांढरे कोड हे संसर्गाने होत नाहीत. कोड असलेल्या व्यक्तीबरोबर राहिल्याने कोड काही निर्माण होत नाहीत. त्यामुळे पांढरे कोडसंबधी गैरसमज करून घेऊ नका.

पांढरे कोडचे प्रकार :

Vitiligo Types in Marathi
Vitiligo vulgaris – जर चट्टे संपूर्ण शरीरावर असतील तर त्याला विटीलिगो वलगारीस असं म्हणतात. Lip-tip vitiligo – चट्टे फक्त ओठांवर, बोटांच्या टोकावर व गुप्तांगांवर असतील तर त्याला लिप टिप विटीलिगो म्हणतात.
Localised vitiligo – एकाच ठिकाणी आढळणारा चट्टा असेल तर त्याला लोकलाईज्ड विटीलिगो म्हणतात. unstable vitiligo – जर का चट्टे वेगाने उमटत असतील तर त्याला अनस्टेबल विटीलिगो म्हणतात.

पांढरे कोड आणि मानसिक ताण :
आज सुंदर दिसण्यासाठी लोक नानाविध उपाय करत असतात. अशा ह्या ‘सेल्फी काढण्याच्या’ आजच्या काळामध्ये आपल्याला कोड झाल्याचा मानसिक ताण त्या व्यक्तीवर अधिक असतो. शरीराच्या दर्शनी भागावर कोडाचा डाग दिसल्यास अशा व्यक्ती निराश होतात किंवा त्यांना न्यूनगंड येतो.

मात्र अशा व्यक्तींनी विनाकारण ह्या किरकोळ गोष्टीचे दडपण घेऊ नये. हात-पाय धडधाकट नसतानाही किंवा दृष्टिहीन, कर्णबधिर असतानाही जर आपले दिव्यांग बंधू-भगिनी जर संकटांवर मात करून ‘सुंदर’ आयुष्य जगू शकतात तर आपण का नाही..? त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा व मानसिक ताण घेऊ नका.

पांढरे कोड उपचार माहिती :

Vitiligo Treatments in Marathi
पांढरे डाग म्हणजेच Vitiligo (कोड)च्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. अनेकदा भरपूर औषधे, नानाविध उपाय करूनही हा त्रास कमी होत नसल्याचे अनेकांच्या लक्षात आले असेल. यासाठी पांढरे कोड आजारावर येथे आयुर्वेदिक औषधे दिली आहेत ज्यायोगे हा त्रास मुळापासूनच कमी होण्यास मदत होईल.

पांढरे कोडवरील गुणकारी औषधांची माहिती देणारी उपयुक्त ‘पांढरे कोड उपचार मार्गदर्शन पुस्तिका’आजचं डाउनलोड करा व पांढरे कोडच्या त्रासापासून सुटका मिळवा. तज्ञ डॉक्टरांनी या पुस्तिकेत कोडावरील अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक औषधे दिली आहेत ज्यायोगे हा त्रास मुळापासूनच कमी होण्यास मदत होईल. अनेक रुग्णांना गुणकारी ठरलेली औषधे या पुस्तिकेत दिली आहेत.

केवळ 100 रुपयांमध्ये हे उपचार पुस्तिका आपण खरेदी करू शकता. डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन पुस्तिका खरेदी करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा. खरेदी केल्यानंतर तात्काळ आपणास पुस्तिका pdf स्वरूपात उपलब्ध होईल.

Paytm किंवा PhonePe द्वारेही आपण पेमेंट करू शकता..
यासाठी आमच्या 7498663848 या नंबरवर 100 रुपयांचे पेमेंट करा. त्यानंतर आमच्या 7498663848 या Whatsapp नंबरवर paytm किंवा PhonePe पेमेंट जमा केल्याचे सांगा. उपचार पुस्तिका तात्काळ आपणास whatsapp किंवा ई-मेलवर पाठवुन दिली जाईल.

डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसल्यास काय करावे..?
आपण आमच्या बँक खात्यात पेमेंट जमा करूनही पुस्तक घेऊ शकाल. यासाठी खालील बँक खात्यात पुस्तकासाठीचे 100 रुपये जमा करा व आम्हाला Deposits Slip चा 7498663848 ह्या Whatsapp नंबरवर फोटो पाठवा. त्यानंतर आपणास तात्काळ पुस्तक पाठवून दिले जाईल.

BANK OF MAHARASHTRA, Ajara Dist- Kolhapur
Account holder name –
 Dr. Satish Upalkar
Account No. : 20140447629
IFSC Code : MAHB0000150

पांढरे डाग (कोड) उपचार मार्गदर्शन पुस्तिका :
यामध्ये खालील माहिती दिली आहे –
• पांढरे डाग (कोड) सामान्य माहिती, प्रकार, कारणे, लक्षणे
• ‎पांढरे डाग (कोड) प्रभावी औषधे, 
• ‎औषधे कशी घ्यावीत, त्यांची मात्रा यासंबंधी माहिती माहिती एकाचं ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरांनी ह्या पुस्तिकेमध्ये दिली आहे.
• कोड रुग्णांसाठी आहार, पथ्य अपथ्य सूचना, आरोग्य सल्ला व मार्गदर्शन या पुस्तकेत दिले आहे.
• पांढरे डाग (कोड) असणाऱ्या रुग्णासाठी उपयुक्त ठरणारी माहिती येथे दिली आहे.

पांढरे कोडसंबंधी आपल्या काही समस्या, प्रश्न असल्यास डॉक्टरांना विचारण्यासाठी खालील फॉर्म भरा. :

kod rog in marathi causes symptoms treatment in marathi, pandhare dag upchar in marathi. ayurvedic medicine, kod disease in marathi.