आमवात म्हणजे काय, आमवात का व कसा होतो, त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार (Amavata in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Information about amavata treatment, lakshane, causes in Marathi.

रुमेटाइड आर्थराइटिस किंवा आमवात म्हणजे काय..?

रुमेटाइड आर्थराइटिस हा विकार सांध्यांना जखडून ठेवतो हा आजार ‘आमवात’ ह्या नावानेही ओळखला जातो. बदललेली जीवनशैली, अयोग्य आहार, लठ्ठपणा यामुळे 40 ते 60 वयोगटातील महिला व पुरुषांना आमवाताची (Rheumatoid arthritis) समस्या भेडसावू लागली आहे. पूर्वी साठीनंतर ही समस्या दिसून येत असे, परंतु आता तरुण वयातच या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

रुमेटाइड आर्थराइटिस हा दीर्घकाळ चालणारा एक गंभीर आजार असून या आजारात सांध्यांमध्ये वेदना आणि सूज येते, यामुळे सांध्याची हालचाली कमी होतात. रुमेटाइड आर्थराइटिसमुळे शरीराच्या कोणत्याही सांध्यावर परिणाम होऊ शकतो, तरीही प्रामुख्याने हात आणि पाय यांच्या सांध्यामध्ये अधिक परिणाम दिसतो.

ही समस्या कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकते. पण साधारणपणे 40-60 वयाच्या व्यक्तीमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण जास्त आहे. येथे आमवात कसा व का होतो, आमवाताची कारणे, लक्षणे, निदान आणि आमवाताचे उपचार याची मराठी माहिती दिली आहे.

आमवाताची लक्षणे (Rheumatoid arthritis symptoms) :

प्रत्येक व्यक्तीमध्ये लक्षणे वेगवेगळी असू शकतात.
• सांधे जखडणे. प्रामुख्याने सकाळी उठल्यावर सांध्यामध्ये आखडल्यासारखं वाटते.
• ‎सांध्यांमध्ये वेदना होणे, सूज येणे, सांध्यात पाणी साचणे,
• ‎सांध्यांची हालचाल मंदावणे.
• ‎हाता पायाला मुंग्या येणे, सुया टोचल्याप्रमाणे वेदना होणे.
• ‎प्रभावित जॉईंटजवळ कडक भाग तयार होणे, त्याठिकाणी लालसरपणा असतो.
• ‎अशक्तपणा, अनेमिया (रक्ताल्पता).
• ‎ताप येणे, वजन कमी होणे, भुक कमी होते ही लक्षणे दिसू शकतात.
आयुर्वेदानुसार आमवातात असणारी संधीवेदना व संधीसूज यामध्ये संचारित्व असते. आम हा शरीरात संचार करताना ज्या संधीच्या ठिकाणी जाऊन पोहचतो त्याठिकाणी सूज, वेदना दिसतात.

आमवात होण्याची कारणे (Amavata causes in Marathi) :

हा एक ऑटोइम्यून डिसीज आहे. बिघडलेल्या रोगप्रतिकारशक्तीमुळे ज्या व्याधी होतात त्यांना ‘ऑटो-इम्यून डिसीजेस’ म्हणतात व हृमॅटॉइड आर्थ्रायटीस हा त्यापैकीच एक. म्हणूनच ही व्याधी फक्त उतारवयातच न होता, तरुणाईत किंवा लहानमुलांमध्ये देखील आढळतो.
• अचानकपणे विपरीत झालेली रोगप्रतिकारशक्तीमुळे हा आजार होतो.
• ‎याशिवाय अनुवंशिकता, जेनेटिक फॅक्टर आणि हार्मोनल चेंजेसदेखील या आजारासाठी कारणीभूत ठरतात.
• ‎धूम्रपान करणाऱ्या व्यक्ती, थायरॉईड पेशंट यांमध्ये हा विकार होण्याचा धोका अधिक असतो.

आमवाताचे परिणाम :

रोगाकडे बरेच दिवस दुर्लक्ष केल्यास..
• सांध्यांच्या आतील भागातील सूज असल्यामुळे सांध्यांची गादी (कार्टीलेज) आणि हाडे या दोन्हीचे नुकसान होऊ शकते. परिणामी, हाडांचा आकार विकृत होऊ शकतो.
• ‎सांध्याच्या हालचाली कमी किंवा बंद होऊ शकतात.
• ‎फुफ्फुसाला आणि हृदयाजवळील रक्तवाहिन्यांभोवती सूज येऊ शकते.
• ‎अनेमिया (रक्ताची कमतरता होणे) हा विकार होऊ शकतो.
• ‎रक्तातील पांढऱ्या रक्त पेशींमध्ये घट झाल्यास, प्लीहाचा आकार (रक्त शुद्ध करण्यासाठी काम करते) मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

आमवाताचे निदान आणि तपासणी (Diagnosis test) :

रक्त चाचणीद्वारे RA factor, ESR, CRP, blood count, ANA आणि यूरिक ऍसिड इ. चे प्रमाण तपासले जाते. याशिवाय काहीवेळेस सायनोव्हिअल फ्लुईडची तपासणी, एक्स-रे आणि एमआरआय तपासणीही केली जाते.

आरए टेस्ट – ही रुमॅरॉइड आर्थ्रायटिसची मुख्य तपासणी असून ही सुमारे 80 टक्के रुग्णांमध्ये पॉझिटिव येते. RA test विषयी अधिक माहिती वाचा..

सी-रिअॅक्टिव प्रोटिन्स (CRP) – सी-रिअॅक्टिव प्रोटिन्सची पातळी रोग नियंत्रणाखाली आहे का नाही हे ठरवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. रोग वाढू लागल्यास सी-रिअॅक्टिव प्रोटिन्सची पातळीसुद्धा वाढते.

आमवात उपचार माहिती (Amavata treatment in Marathi) :

आमवाताच्या त्रासावर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. आमवातावरील प्रभावी औषधांची माहिती देणारी उपयुक्त ‘आमवात उपचार मार्गदर्शन पुस्तिका‘ आजचं डाउनलोड करा व आमवाताच्या त्रासापासून सुटका मिळवा. या उपयुक्त पुस्तकातून आपण आमवातावर औषधोपचार करून घेऊ शकाल.

आमच्या तज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांनी ‘आमवात उपचार मार्गदर्शन पुस्तिका‘ यामध्ये आमवातवरील आयुर्वेदिक औषध उपचार, पथ्य, रुग्णांनी घ्यायची काळजी यांची माहिती दिली आहे. ही pdf पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

Marathi language article about Rheumatoid arthritis causes, symptoms, diagnosis and treatment.