RA Factor Test in Marathi, Amavata test in Marathi, Rheumatoid Factor (RF) Test in Marathi.

RA Factor टेस्ट म्हणजे काय..?

Rheumatoid Factor Test in Marathi
Rheumatoid Factor (RF) हे आपल्या इम्यून सिस्टीममधून तयार होणारे एक प्रकारचे प्रोटीन असते. सामान्यतः निरोगी व्यक्तीच्या शरीरात RF घटक तयार होत नाही त्यामुळे जर तुमच्या रक्तात RF घटक आढळत असल्यास तुम्हाला प्रतिकारशक्तीचे आजार असल्याचे सूचित होते. RF टेस्ट नंतर रिपोर्टमध्ये RF पॉजिटिव असणे म्हणजे आपल्या रक्तामध्ये Rheumatoid Factor (RF) उपस्थित आहे. ह्या टेस्टला RA Factor टेस्ट ह्या नावानेही ओळखले जाते.

तसेच काही व्यक्तींमध्ये कोणत्याही आजाराशिवायही अल्प प्रमाणात RF घटक तयार होत असल्याचे आढळू शकते.

केंव्हा RA Factor टेस्ट करावी लागते..?
RA Factor test प्रामुख्याने ऑटोइम्यून आजारांच्या निदनांसाठी केली जाते. तसेच खालील आजारांच्या निदनांसाठी आपले डॉक्टर RA Factor टेस्ट करायला सांगतात.
आमवात (Rheumatoid arthritis)
• स्जोग्रेन सिंड्रोम 
• ल्यूपस आजार
• इन्फेक्शन
यकृताचा सिरोसिस
हिपॅटायटीस
• कँसर
याशिवाय प्रेग्नन्सीमध्येही RA Factor टेस्ट करावी लागू शकते.

RF टेस्ट किंवा RA Factor टेस्ट कशी केली जाते..?
ही एक रक्तचाचणी असून यासाठी आपल्या हाताच्या शिरेतून ब्लड सॅम्पल घेऊन लॅबमध्ये RF ची तपासणी केली जाते.

RF टेस्टचे नॉर्मल प्रमाण किती असते..?
RA Factor Normal Range in Marathi
• जर RF टेस्ट निगेटिव्ह आल्यास नॉर्मल रिपोर्ट आहे असे समजावे.
• जर Rheumatoid factor चे प्रमाण 14 IU/ml पेक्षा कमी असल्यास नॉर्मल रोपोर्ट समजावे.
• आणि जर RF चे प्रमाण 14 IU/ml पेक्षा जास्त असणे म्हणजे RA पॉजिटीव्ह रिपोर्ट असून संबंधित आजाराचे निदान होते.

RF टेस्ट करण्यासाठी किती खर्च येऊ शकतो..?
RA Factor Test Cost in Maharashtra
साधारण 200 ते 1000 रुपये खर्च येऊ शकतो.

हे सुद्धा वाचा..
आमवातविषयी मराठीत माहिती व उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Rheumatoid Factor (RF) Blood Test, Rheumatoid Arthritis Factor Automated Blood Rheumatoid Factor Blood Test (RF) Rheumatoid Arthritis Treatment in Marathi.

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)