निरोगी आरोग्याचे असाधारण महत्त्व आहे. आरोग्य चांगले असल्यास त्या व्यक्तीचा, कुटुंबाचा तसेच समाजाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. आजारी पडल्यास उपचार करीत बसण्यासाठी वेळ व पैसा खर्च होत राहतो. याचा मानसिक ताण स्वतःवर तसेच कुटुंबावरही पडत असतो. त्यामुळे नेहमी निरोगी राहण्यासाठीच सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आरोग्य निरोगी राहावे यासाठी सर्वप्रथम आरोग्य विषयी सामान्य माहिती माहीत असावी लागते.
यासाठी हेल्थ मराठी डॉट कॉम ह्या आमच्या वेबसाईटवर आरोग्यविषयक सर्व माहिती सोप्या शब्दात मराठीमध्ये एकाचठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये आपणास सर्व प्रमुख आजारांची माहिती, साथीच्या रोगांची माहिती, आरोग्य टिप्स, व्यायाम व फिटनेस टिप्स, सौंदर्य सल्ला, स्त्रियांचे आरोग्य, प्रेग्नन्सी, बालसंगोपन, पुरुषांचे आरोग्य, निदान तपासणी, प्रथमोपचार अशी उपयुक्त माहिती याठिकाणी दिली आहे.
खाली दिलेल्या प्रमुख विभागाद्वारे आरोग्यविषयक विविध माहिती जाणून घ्या..
- विविध रोगांची माहिती
- हेल्थ टिप्स
- आहार आणि पोषण
- व्यायाम आणि फिटनेस टिप्स
- ब्युटी टिप्स
- गर्भधारणा आणि बाळंतपण
- बालसंगोपन
आरोग्याविषयी दोन शब्द..
आरोग्य हिचं खरी संपत्ती मानले जाते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने, आजार अंगावर काढण्याच्या सवयीमुळे भविष्यात मोठ्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. पैसा, संपत्ती मिळवण्याच्या हव्यासापोटी आपण आपले आरोग्य धोक्यात घालत आहोत.
आरोग्य विषयक सल्ला :
• योग्य व संतुलित आहार घ्या.
• आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या, ताजी फळे, धान्ये, कडधान्ये, सुकामेवा, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे यांचा समावेश असावा.
• दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे.
• फास्टफूड, जंकफूड, बेकरी प्रोडक्ट, चरबीचे पदार्थ, कोल्ड्रिंक्स यापासून दूर राहा.
• तंबाखू, सिगारेट स्मोकिंग, अल्कोहोल, ड्रग्स यासारख्या व्यसनांपासून दूर राहा.
• नियमित व्यायाम करा.
• मानसिक ताण घेऊ नका. यासाठी प्राणायाम, ध्यान, धारणा करा, फिरायला जा किंवा आवडता छंद जोपासा.
• स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावून घ्या.
Last Medically Reviewed on February 27, 2024 By Dr. Satish Upalkar.