जल प्रदूषण समस्या प्रस्तावना – Water pollution :

मानवाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचे अतिशय नुकसान झालेले आहे. त्यामुळेच पाणी, हवा, ध्वनी आणि मृदा प्रदूषणाच्या विविध समस्या आज निर्माण झाल्या आहेत. यापैकी जल प्रदूषणाची समस्या ही अधिक गंभीर मानली जाते. जल प्रदूषणामुळे मनवासह इतर सजीवांचे आरोग्य धोक्यात येत असते.

जल प्रदूषण रोखणे का आवश्यक आहे..?

जगण्यासाठी सजीवांना पाण्याची अत्यंत गरज असते. फक्त 1 ते 1.5 % च पाणी पिण्यायोग्य आहे. कारण पृथ्वीवरील एकूण पाण्यापैकी जवळजवळ 98 % पाणी हे समुद्र आणि बर्फाच्या स्वरुपात आहे. त्यामुळे पिण्यायोग्य पाणी जपुन वापरणे गरजेचे तर आहेच त्याशिवाय पिण्यायोग्य पाण्यात प्रदुषके मिसळण्यापासून थांबवणेसुद्धा गरजेचे आहे.

जल प्रदूषण म्हणजे काय..?

काही कारणामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेमध्ये बदल झाल्याने ते पाणी पिण्यासाठी अपायकारक बनते. अशा पाण्याला प्रदूषित पाणी असे म्हणतात. जल प्रदूषणामध्ये पाण्याचे विविध स्त्रोत म्हणजे नदी, तलाव, धरणे, विहिरी वैगेरे यातील पाणी प्रदूषित होत असते. या समस्येला ‘जल प्रदूषण’ असे म्हणतात.

जलप्रदुषणामुळे पाण्यामध्ये जीवाणूंची उत्पत्ती होते असे जीवाणूयुक्त पाणी पिल्याने अनेक रोग उत्पन्न होतात. यामध्ये अतिसार (हगवण), उलटी, काविळ, विविध ताप, विसूचिका (Cholera), यासरखे रोग उत्पन्न होतात.

जलप्रदुषणाची कारणे – Causes of Water Pollution :

जल प्रदूषण समस्येसाठी मानवच सर्वस्वी जबाबदार आहे. वाढते शहरीकरण, कचरा व सांडपाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, औद्योगिककरण अश अनेक कारणांद्वारे जल प्रदुषण होत असते.

जलप्रदुषणाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

  • औद्योगिक रासायनिक पदार्थ पाण्यात सोडणे,
  • सांडपाणी मैलापाणी जलाशयात सोडल्याणे,
  • रासायनिक खते, किटकनाशके पाण्यात मिसळल्याने,
  • पाण्यातील जीव मृत होऊन कुजल्याने,
  • कचरा किंवा तत्सम पदार्थ पाण्यात टाकल्याने,
  • जमिनीवर असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पावसाचे पाणी जाऊन ते दूषित पाणी वाहत जाऊन नदीमध्ये मिसळल्याने,
  • जनावरे, कपडे, भांडी नदीच्या ठिकाणी धुतल्याने,
  • मृत जनावरे नदीत टाकल्याने,
  • अंत्यसंस्कारानंतरची राख किंवा इतर धार्मिक कार्यातील निर्माल्य, नैवेद्य वैगेरे नदीमध्ये टाकणे,
  • रासायनिक रंगकाम केलेल्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या मुर्त्यांच्या विसर्जनामुळे,
  • जहाजातून खनिज तेलाची वाहतूक करताना गळतीमुळे समुद्राच्या पाण्यावर तेलाचे तवंग निर्माण झाल्याने समुद्राच्या पाण्याचे प्रदूषण होते.

जल प्रदुषणाचे परिणाम – Water pollution side effects in Marathi :

  • जलप्रदुषणामुळे पाण्यामध्ये जीवाणूंची उत्पत्ती होते असे जीवाणूयुक्त पाणी पिल्याने अनेक रोग उत्पन्न होतात. यामध्ये अतिसार (हगवण), उलटी, काविळ, विविध ताप, टायफॉइड, विसूचिका (Cholera) यासरखे विविध साथीचे रोग उत्पन्न होतात.
  • दूषित पाण्यात डासांची पैदास होऊन डेंग्यू, मलेरिया सारखे आजार होतात.
  • रासायनिक पदार्थ युक्त दूषित पाणी सेवन केल्यास त्यांचा अत्यंत वाईट परिणाम आपल्या किडन्यांवर होतो. किडन्या निकामी होणे, कॅन्सर यासारखे गंभीर आजार उत्पन्न होतात.
  • पाण्यातील जलचर प्राणी, पाण्यातील वनस्पती यांचे आरोग्य धोक्यात येते.
  • समुद्रातील पाण्याचे प्रदूषण झाल्यास समुद्रातील सजीवसृष्टी धोक्यात येते.

जल प्रदूषण उपाय योजना – Solution of Water Pollution :

जल प्रदुषण थांबवण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिक प्रयत्न करणे आवश्यक असते. पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी खालील उपाय योजना कराव्यात.

  • कचरा व सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.
  • औद्योगिक घटकांना मार्गदर्शक सुचना करणे, त्यांना रासायनिक पदार्थ पाण्यात टाकण्यापासून अटकाव करणे.
  • औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उद्योगात सक्तीचा करावा.
  • सेंद्रिय शेतीचा वापर करणे. शेतामध्ये रासायनिक खते, किटकनाशके यांचा मर्यादित वापर करणे.
  • धार्मिक कार्यातील निर्माल्य, नैवेद्य, राख वैगेरे नदी पाण्यात टाकणे टाळावे.
  • शेडूमातीच्या मुर्ती आणि नैसर्गीक रंग वापरुन सणांचा सात्विक आनंद घेणे. जल प्रदूषण थांबवण्यासाठी यासारखे उपाय करणे आवश्यक आहे.

हे सुध्दा वाचा..
वायू प्रदूषण विषयक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

In this article information about Causes, Effects and Solutions of Water pollution in Marathi language.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...