अतिसार, जुलाब मराठीत माहिती (Diarrhoea in Marathi)

109
views

Diarrhoea in Marathi, Diarrhoea Symptoms, Causes & Treatments in Marathi, atisar, julab var gharguti upay in marathi

जुलाब (अतिसार) म्हणजे काय..?
Diarrhoea information in Marathi

अतिसार म्हणजे एका दिवसात तीनपेक्षा जास्त वेळा पातळ शौचास होणे. अतिसार ह्या आजारास डायरिया असेही म्हणतात. वारंवार पातळ शौचाला होणे म्हणजे अतिसार किंवा हगवण होय. अतिसार हे सामान्यपणे आतड्याच्या विकारांचे एक लक्षण आहे. आमांश (Dysentery), कॉलरा, टायफॉईड व कृमींची बाधा अशा अनेक रोगांत अतिसार होऊ शकतो. जिवाणू, विषाणूंच्या इन्फेक्शनमुळे आणि उघडे व शिळेपाके दूषित अन्न यांच्या सेवनामुळे अतिसार होतो. अतिसारामध्ये वारंवार शौचास होणे, पोटात दुखणे, पोटफुगी, मळमळणे ही लक्षणे जाणवितात. अतिसाराचा त्रास अधिक वाढल्यास डीहायड्रेशनचा धोका संभवतो.

अतिसाराचे तीन प्रकार करता येतील :
1) तीव्र पातळ अतिसार – यात अनेक तास किंवा अनेक दिवस पातळ शौचास होते. या तीव्र प्रकारात एकाएकी पोटात कळ येते व बेंबीभोवती गुरगुर होऊन अस्वस्थता वाटते. तसेच, अतिसाराच्या तीव्रतेनुसार व कारणानुसार ताप येणे, अन्नाविषयी तिटकारा वाटणे, उलटी होणे, मळमळणे, अंग दुखणे, हातापायांत गोळे म्हणजे पेटके येणे इ. लक्षणेही आढळतात.
2) ‎तीव्र रक्तयुक्त अतिसार – यात पातळ शौचाबरोबर रक्तही पडत असते. काही बालकांमध्ये अतिसारात शौचासोबत आव व रक्त जाणे ही लक्षणेही दिसतात.
3) ‎दीर्घकालिन अतिसार (क्रॉनिक) – चौदा दिवसांहून अधिक काळ पातळ शौचास वारंवार होत असल्यास त्याला क्रॉनिक अतिसार असे म्हणतात.

ही माहिती कॉपी पेस्ट करू नका :
ही माहिती आपणास कॉपी पेस्ट करून वापरता किंवा शेअर करता येणार नाही. तसा प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. – हेल्थमराठी डॉट कॉम © कॉपीराईट सूचना.

अतिसाराची लक्षणे :
Diarrhea symptoms in Marathi
• पोटात वेदना होणे, पोटात कळ येणे, पोटात मुरडा येणे
• ‎वारंवार पातळ शौचास होणे
• ‎शौच झाल्यावरही पुन्हा जाण्याची इच्छा होणे.
• ‎मळमळ आणि उलट्या होणे.
• ‎शौचासोबत रक्त आणि आव पडणे.
• ‎वजन कमी होणे.
• ‎ताप, डोकेदुखी, भूक न लागणे, चक्कर आल्यासारखे वाटणे, अशक्तपणा जाणविणे.
• ‎लघवीचे प्रमाण कमी होऊन ती गडद रंगाची होणे.
ही लक्षणे अतिसारात जाणवितात.

अतिसाराची कारणे, जुलाब होण्याची कारणे :
Diarrhoea causes in Marathi
अतिसार अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतो.
• बॅक्टरीयांच्या इन्फेक्शनमुळे जसे ई. कोलाई, सेलमोनेला, शिगेला, क्लोस्ट्रीडियम किंवा कॉलरा (विब्रियो कॉलेरी) जिवाणूंमुळे अतिसार होऊ शकतो.
• ‎व्हायरसमुळे (विषाणू संक्रमानामुळे) जसे की रोटावायरस, नोरोवायरस, एन्टेरोवायरस आणि हिपॅटायटीस व्हायरसमुळे अतिसार होऊ शकतो.
• ‎पोटातील जंत आणि कृमींमुळे.
• ‎दुषित पाणी आणि आहारातून अतिसाराची लागण होऊ शकते. उन्हाळा आणि पावसाळ्यात दूषित पाणी व अन्नाच्या सेवनाने लहान मुलांना अतिसार होण्याची शक्यता वाढते.
• ‎तसेच अतिसार सामान्यत: आतड्यांसंबंधी काही विकारांमुळेही होऊ शकतो. जसे, डाईवर्टिकुलर डिजीज, इरिटेबल बोवेल सिंड्रोम, लेक्टोस इनटॉलेरेंस किंवा कोलिअक रोग या विकारामुळे अतिसार होऊ शकतो.

अतिसाराचे निदान कसे होते..?
Diarrhea diagnosis test in Marathi
डॉक्टर उपस्थित लक्षणे आणि शारीरिक तपासणी करून तसेच प्रयोगशाळेत शौचाची तपासणी करून अतिसाराचे निदान करतील. काहीवेळा पोटाची एक्स-रे तपासणी, गुद्द्वारातून बेरियम एनिमा व कोलोनोस्कोपी तपासणीही करावी लागेल.

अतिसार प्रतिबंधात्मक उपाय :
Diarrhea prevention tips in Marathi
अतिसाराची लागण होऊ नये म्हणून हे करा..
• उकळवून गार केलेले स्वच्छ पाणी प्यावे.
• ‎जेवण योग्य पद्धतीने शिजवून योग्य पद्धतीने साठवून ठेवले पाहिजे.
• ‎भाजीपाला, फळे वापराआधी स्वच्छ धुवावीत.
• ‎एखादा पदार्थ खराब झाल्याची शंका असल्यास ते खाऊ नये.
• ‎आजारी व्यक्तीने जेवण तयार करू नये.
• ‎जेवण्याआधी तसेच बाथरुमला जाऊन आल्यानंतर दोन्ही हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
• ‎घरातील व आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छता राखावी.

अतिसार, जुलाब थांबवण्यासाठी उपाय व उपचार, जुलाब वर घरगुती उपाय :
Diarrhoea, dysentery treatments in marathi
अतिसारात वारंवार शौचास झाल्याने तसेच उलट्यांमधून शरीरातील पाण्याची होणारी झीज भरून काढणे गरजेचे ठरते. दवाखान्यात जाऊन डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. उपचार करण्यापूर्वी डॉक्टर अतिसाराचे मूळ कारण शोधतात. खाण्यातील अनियमितपणामुळे होणारा अतिसार दोन-तीन दिवसांत आपोआप बरा होतो. तीव्र अतिसारामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास शिरेतून ग्लुकोज व सलाइन देतात. जीवाणूसंसर्गामुळे अतिसार होत असल्यास अॅण्टिबायोटिक्स दिल्या जातात. अतिसाराचे प्रमाण कमी करण्याकरिता झिंक रसायनाचा वापरही केला जातो.
• डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाणी तसेच नारळाचे पाणी, भाताची पेज किंवा इतर द्रवपदार्थ भरपूर प्यावेत. जलसंजीवनी (ओआरएस) द्यावी. शुष्कता कमी असल्यास किंवा जलसंजीवनी पावडर नसल्यास साखर-मीठ-पाण्यापासून घरीच जलसंजीवनी करून रुग्णास देता येते.
• ‎घरीच जलसंजीवनी करण्यासाठी स्वच्छ 1 लिटर पाणी, 6 चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ चांगले एकजीव करावे. ही जलसंजीवनी रुग्णास वरचेवर थोडी थोडी देत राहावी. त्यामुळे शरीरातील पाणी व क्षार यांचे प्रमाण संतुलित राहते व रुग्ण बरा होतो. एकदा केलेले मिश्रण दुसऱ्या दिवशी वापरू नये. दुसऱ्या दिवशी याचे पुन्हा नवीन मिश्रण करावे व ते वापरावे.
• ‎रुग्णाला आहार देताना साधे जेवण द्यावे. मसालेदार, तिखट, आंबट, तळलेले पदार्थ असलेले जेवण टाळावे.
• ‎आजार तीव्र स्वरूपाचा असेल, भरपूर प्रमाणात पातळ संडासला होत असल्यास, उलटया होत असल्यास किंवा शौचातुन रक्त पडत असल्यास रुग्णाला त्वरित रुग्णालयात दाखल करून उपचार करणे गरजेचे असते.
(Diarrhoea, amoebic dysentery upchar upay in Marathi, atisar, julab medicine in marathi)

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

अतिसार संबंधित हे लेख सुद्धा वाचा..
कॉलरा आजार
टायफॉईड
गॅस्ट्रोची साथ
कावीळ

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.

आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.