तोंडाचा कर्करोग (Oral Cancer in Marathi)

233
views

Oral cancer in Marathi, Mouth cancer Symptoms, diagnosis, and treatment in Marathi tondacha karkrog karne, lakshane, nidan, upchar mahiti marathi

तोंडाचा कर्करोगाची माहिती मराठीमध्ये :
Oral cancer information in Marathi
आपण अनेक प्रकारच्या कर्करोगाबद्दल ऐकले असेल, त्यापैकी एक आहे तोंडाचा कर्करोग. याला ओरल कॅन्सर ह्या नावानेही ओळखले जाते. तोंडाचा कर्करोग (Mouth Cancer) हा तोंडातील ओठ, हिरड्या, जीभ, घसा, टाळू अशा तोंडाच्या कोणत्याही भागात कर्करोग होऊ शकतो. तंबाखू, सुपारी खाण्याच्या सवयीमुळे भारतामध्ये तोंडाच्या कॅन्सरचे सर्वात जास्त रुग्ण आढळतात. तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, गालाचा कॅन्सर, जिभेचा कॅन्सर या कर्करोगांची मराठीत माहिती, तोंडाचा कॅन्सर कसा होतो, तोंडाचा कॅन्सरमध्ये लक्षणे कोणती जाणवतात, तोंडाचा कॅन्सरवरील उपचार, औषधे, किमोथेरपी, रेडिएशन, आयुर्वेदिक, होमिओपॅथी उपचार, तोंडाच्या कँसरपासून बचाव करण्याचे उपाय या सर्वांची माहिती ह्या ठिकाणी मराठीमध्ये दिली आहे.

तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे :
Oral cancer symptoms in Marathi, तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे
तोंडाच्या कॅन्सरची सुरवात हळूहळू होत असते. तंबाखूचे व्यसन करणाऱ्या व्यक्तींच्या तोंडामध्ये सुरवातीला पांढरट चट्टे (ल्यूकोप्लाकिया) किंवा लाल चट्टे (एरिथ्रोप्लाकिया) दिसू लागतात. असे चट्टे दिसल्यानंतरही त्या व्यक्तीने तंबाखूचे व्यसन सुरुचं ठेवल्यास त्या चट्ट्यामध्ये गाठ, व्रण निर्माण होऊन तोंडाचा कर्करोग होतो. कॅन्सरच्या ऍडव्हान्स्ड स्टेजमध्ये खालील लक्षणे दिसून येतात.
• तोंडात जखमा व सूज येऊन वेदना होऊ लागतात.
• ‎तोंडातून रक्तस्राव होणे.
• ‎तोंड उघडण्यास त्रास होऊ लागतो.
• ‎बोलताना किंवा अन्न गिळताना, अन्न चावण्यास त्रास होऊ लागतो.
• ‎अशक्तपणा, वजन कमी होते.

तोंडाच्या कॅन्सरची कारणे :
कोणाला होऊ शकतो तोंडाचा कर्करोग..?

Causes of mouth cancer in Marathi
• वयाच्या 40शी नंतर तोंडाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जास्त आहे.
• ‎तंबाखू, गुटका, पानमसाला, सुपारी, सिगारेट, बिडी, चिलीम, हुक्का, मद्यपान यांचे व्यसन करणाऱ्या व्यक्तींना तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.
• ‎तोंडाचा कर्करोग जर कुटुंबातील आजोबा, वडील, आई, भाऊ, बहीण यांना झालेला असल्यास अनुवंशिकतेमुळेही तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो.

तोंडाचा कर्करोग उपचार :
Oral cancer treatment in Marathi, Chemotherapy, radiation treatment information in Marathi
तोंडाच्या कर्करोगाचा उपचार हा कोणत्या स्टेजमध्ये कॅन्सर आहे यावर अवलंबून असतो. गाठेचे स्वरूप, कॅन्सर किती पसरलेला आहे याप्रमाणे उपचार पद्धती ठरते. सर्जरी आणि केमोथेरेपीद्वारे ह्या कर्करोगावर उपचार केला जातो. तोंडाच्या कर्करोगाचे निदान अगदी सुरुवातीला झाल्यास त्यावर शस्त्रक्रिया करून कर्करोगाचे बाधित भाग काढून टाकल्यास कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो. हा कॅन्सर हळूहळू वाढत असल्याने आणि सुरुवातीच्या काळात कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्याने अनेकदा तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण हे ऍडव्हान्स्ड स्टेजमध्ये कॅन्सर गेल्यावर उपचारासाठी येत असतात. मग अशावेळी उपचाराचा फारसा उपयोग होत नाही.

तोंडाचा कर्करोग होऊ नये म्हणून काय करावे..?
Oral Cancer prevention tips in Marathi
• तंबाखू, गुटका, पानमसाला, सुपारी, सिगारेट, बिडी, चिलीम, हुक्का, मद्यपान यांचे सेवन करने टाळा.
• ‎याआधी जर यांचे व्यसन केलेले असल्यास वर्षातून किमान एकदा डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
• ‎याशिवाय महिन्यातून एकदातरी स्वतःच्या स्वतः तोंडाची तपासणी करावी. तोंडामध्ये चट्टे, व्रण, गाठ आहे का ते पाहावे. तसे काही आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे.
• ‎संतुलित आहार घ्यावा. हिरव्या पालेभाज्या, फळे आहारात समाविष्ट करावीत.
• ‎तोंडाची स्वच्छता ठेवावी.

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.

oral cancer oral cancer causes oral cancer stages oral cancer symptoms oral cancer treatment oral cancer definition oral cancer photos oral cancer survival rate how long does oral cancer take to spread oral cancer treatment in mumbai oral cancer treatment in mumbai mumbai maharashtra best doctor for mouth cancer in mumbai best oral cancer hospital in mumbai mouth cancer treatment cost tata memorial hospital oral cancer oral cancer treatment cost in tata memorial hospital best doctor for mouth cancer in india oral oncologist in mumbai oral cancer treatment in pune oral cancer hospital in pune mouth specialist doctor in pune oral cancer diagnosis in pune lakshya cancer hospital pune maharashtra cancer specialist in pune cancer specialist doctor in pune onco surgeon in pune cancer specialist hospital in pune oral cancer in marathi mouth cancer ka ilaj in hindi mouth cancer photo hindi symptoms of mouth cancer due to tobacco in hindi muh ke cancer ki photo. muh ke cancer ke suruati lakshan muh ke cancer ka ayurvedic ilaj tongue cancer ka ilaj mouth cancer symptoms mouth cancer information in marathi


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.