स्किझोफ्रेनिया – Schizophrenia :
स्किझोफ्रेनिया हा एक मानसिक विकार असून प्रामुख्याने उतारवयात ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येते. यामध्ये रुग्णास भास व भ्रम जाणवत असतो. त्यामुळे रुग्णाचे मन गोंधळून जात असते. याचा परिणाम व्यक्तीच्या वागणुकीत आणि दैनंदिन जीवनात होत असतो.
स्किझोफ्रेनिया हा गंभीर विकार असला तरीही यावर वेळीच योग्य उपचार केले गेल्यास, रुग्णास पुढील आयुष्य जगणे सुलभ जाऊ शकते.
स्किझोफ्रेनिया ची लक्षणे (Symptoms of Schizophrenia) :
व्यक्तीगणिक स्किझोफ्रेनियाची वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. त्यातही काही सामान्य लक्षणे आहेत त्याविषयी माहिती खाली दिली आहे.
- मनात नेहमी भ्रम, शंका किंवा संशय निर्माण होणे,
- कसला तरी भास होणे,
- गोंधळलेले मन,
- लक्ष केंद्रित न होणे,
- चेहऱ्यावर भाव नसणे,
- कसली तरी चिंता वाटू लागणे,
- एकलकोंडा स्वभाव होणे,
- विचित्र हावभाव करणे,
- बारीकसारीक गोष्टीवरून चिडचिड होणे, यासारखी लक्षणे स्किझोफ्रेनियामध्ये जाणवू शकतात.
स्किझोफ्रेनिया कारणे (Schizophrenia causes) :
स्किझोफ्रेनिया हा मनोविकार असून त्याची अनेक कारणे असतात. कुटुंबात स्किझोफ्रेनिया असल्यास आनुवंशिकतेमुळे हा आजार होऊ शकतो. याशिवाय,
- जेनेटिक फॅक्टर,
- मनावरील आघात,
- मानिसक तणाव,
- मेंदूतील डोपामाइन या द्रव्यातील असंतुलन,
तसेच काही विशिष्ट औषधे, अमली पदार्थांचे व्यसन यांमुळेही स्किझोफ्रेनिया होण्याचा धोका वाढतो.
स्किझोफ्रेनिया हा उतारवयात होणारा आजार असला तरीही या आजाराची सुरवात ही वयाच्या तिशीमध्ये होत असते.
स्किझोफ्रेनियाचे निदान असे केले जाते :
रुग्णातील लक्षणे, कौटुंबिक इतिहास, मानसिक आरोग्य व शारीरिक तपासणी याद्वारे आपले डॉक्टर स्किझोफ्रेनियाचे निदान करू शकतात. याशिवाय MRI स्कॅन किंवा CT स्कॅन सारख्या तपासण्याही कराव्या लागू शकतील.
स्किझोफ्रेनिया वरील उपचार (Schizophrenia treatments) :
स्किझोफ्रेनिया ही एक दीर्घकालीन व गंभीर अशी स्थिती आहे, परंतु वेळीच योग्य उपचार केल्यास त्या व्यक्तीस जीवन जगणे सुकर जाते. उपचारामुळे पूर्णपणे ह्या आजारापासून बरे होता येत नाही, मात्र काही प्रमाणात त्रास कमी होण्यासाठी मदत होते.
मनोविकारतज्ञ डॉक्टर यावर समुपदेशन (कौन्सेलिंग) आणि औषधांच्या आधारे उपचार करतात. एंटीसायकोटिक औषधोपचार यावर प्रभावी असतो. risperidone, olanzapine, quetiapine, ziprasidone, clozapine, haloperidol अशी औषधे यासाठी वापरतात.
डॉक्टरांनी दिलेली औषधे रुग्णाने नियमित वेळेवर घेणे आवश्यक असते. डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय स्वतःहून औषध घेणे थांबवू नये.
रुग्णाच्या कुटुंबियांचे सहकार्य :
स्किझोफ्रेनियाचे बहुतांश रुग्ण हे त्यांच्या कुटुंबासोबतच राहतात. स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांचं मानसिक खच्चीकरण मोठ्या प्रमाणावर होत असते. अशावेळी त्यांच्या नातेवाईकांची भूमिका महत्त्वाची असते. रूग्णाला औषधे वेळेवर देण्यात आणि सतत प्रोत्साहित करण्यात रुग्णाच्या सांभाळ करणाऱ्या घरच्यांची महत्वाची जबाबदारी असते.
हे सुद्धा वाचा..
उतारवयात होणाऱ्या अल्झायमर या आजाराविषयी माहिती जाणून घ्या..
Read Marathi language article about Schizophrenia Symptoms, Causes and Treatments. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.