त्वचा कोरडी पडणे याची कारणे व घरगुती उपाय

त्वचा कोरडी पडणे :

त्वचा कोरडी पडण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याची समस्या जास्त होते. येथे त्वचा कोरडी पडणे याची कारणे व त्यावरील घरगुती व आयुर्वेदिक उपाय यांची माहिती दिली आहे.

त्वचा कोरडी पडण्याची कारणे :

हिवाळ्यातील वाढत्या थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. याशिवाय खालील कारणेही जबाबदार ठरतात.
• पाणी कमी पिण्याची सवय,
• जास्त गरम पाण्याने अंघोळ करणे,
• केमिकल्स युक्त साबणाचा अतिवापर,
सोरायसिस सारखे त्वचाविकार यामुळे त्वचा कोरडी पडत असते.

त्वचा कोरडी पडणे यावरील घरगुती उपाय :

खोबरेल तेल –
कोरड्या त्वचेला सकाळी व रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावावे. यामुळे आपली त्वचा मऊ, मुलायम आणि तजलेदार बनते. चेहरा कोरडा पडत असल्यास त्यावरही हा उपाय फायदेशीर ठरतो.

जोजोबा तेल –
कोरड्या त्वचेवर थोडे कोमट केलेले जोजोबा तेल लावून हलका मसाज करावा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.

बदाम तेल –
कोरड्या त्वचेवर बदाम तेल लावून मसाज करणेही उपयुक्त ठरते. यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला थोडे बदाम तेल लावावे. यामुळे त्वचा मऊ, मुलायम बनते.

मध –
कोरड्या त्वचेवर मध लावल्यानेही त्वचा कोरडी पडण्याची समस्या दूर होते. आठवड्यातून एक वेळा हा उपाय आपण करू शकता.
© लेखक- डॉ. सतीश उपळकर
(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

हे सुद्धा वाचा..
चेहरा सुंदर होण्यासाठीचे उपाय जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.