हिरड्या काळ्या पडणे –
निरोगी हिरड्या ह्या गुलाबी रंगाच्या असतात. काहीवेळा आपल्या हिरड्या ह्या काळ्या पडतात. अनेक कारणांमुळे हिरड्या काळ्या पडू शकतात. तसेच बऱ्याचदा हिरड्यांवर काळे डाग पडू शकतात.
हिरड्या काळ्या होणे याची कारणे –
- अतिरिक्त मेलेनिनमुळे हिरड्या काळ्या पडतात.
- शरीरातील मेलेनिनचे प्रमाण अधिक वाढल्यास त्यामुळे हिरड्या काळ्या पडू शकतात.
- काही औषधांच्या दुष्परिणामांमुळे देखील हिरड्या काळ्या होऊ शकतात. विशेषतः antidepressants औषधे दीर्घकाळ घेणार्या लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते.
- हिरड्या सुजल्यामुळे किंवा तेथे जखम झाल्याने हिरड्या काळ्या पडू शकतात.
- तंबाखू, गुटखा, सिगारेट यासारखी व्यसने असल्यास त्यामुळेही हिरड्या काळ्या पडतात.
हिरड्या काळ्या पडणे यावर घरगुती उपाय –
- दररोज दोनवेळा दात घासावेत. दात घासण्यासाठी हिरड्यांसाठी योग्य असणारी टूथपेस्ट वापरावी.
- दात घासल्यानंतर हिरड्यांवर बेकिंग सोडा लावून मालिश करा. यामुळे हिरड्यांचा काळेपणा निघून जाईल.
जर तुमच्या हिरड्या काळ्या झाल्या असतील तर आहारात - व्हिटॅमिन-डी चा समावेश करा. अंडी, मांस, मासे, दुधाचे पदार्थ, सोया प्रोडक्ट यात व्हिटॅमिन-डी मुबलक असते.
घरगुती उपायांनी हिरड्यांचा काळेपणा दूर न झाल्यास डॉक्टरांशी जरूर संपर्क साधावा.
हिरड्यांची काळजी अशी घ्यावी..
- तोंडाची स्वच्छता ठेवावी.
- दररोज दोनवेळा दात घासावेत.
- दात घासण्यासाठी हिरड्यांसाठी योग्य असणारी टूथपेस्ट वापरावी.
- माउथवॉशचा वापर करावा.
- दात घासताना हिरड्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
- मऊ ब्रिसल्स असलेला टूथब्रश वापरावा.
- वर्षातून एकदा डेंटल चेकअप करून घ्या.
- तंबाखू, पानमसाला, गुटखा, धूम्रपान अशा व्यसनांपासून दूर राहा.
हे सुध्दा वाचा – हिरड्या मजबूत करण्यासाठी उपाय जाणून घ्या.
Read Marathi language article about Black spot on Gums Causes and home remedies. Last Medically Reviewed on February 24, 2024 By Dr. Satish Upalkar.