जवस खाण्याचे फायदे आणि नुकसान (Flaxseed Health Benefits)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Flax seeds marathi, javas fayde Marathi, Health Benefits of Flax Seeds in Marathi.

जवसाची माहिती :

जवस विविध जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असून यात प्रोटिन्स, फायबर आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड या उपयुक्त घटकांचे प्रमाण मुबलक असते. जवसात असणाऱ्या ओमेगा-3 फॅटी ऍसिड, लिग्नान्स आणि फायबर यासारख्या पोषकघटकांमुळे जवस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते.

जवस म्हणजे काय..?

जवसला मराठीत अळशी तर हिंदीमध्ये अलसी असे म्हणतात. जवस बियांना इंग्लिशमध्ये flax seeds किंवा linseed या नावानेही ओळखले जाते.

जवस खाण्याचे फायदे :

हृदयासाठी उपयुक्त..
जवसमध्ये हृदयाच्या उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या ओमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे जवस आहारात असल्यास हार्ट अटॅक, पक्षाघात येण्याचा धोका कमी होतो. याशिवाय रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते तसेच रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्टेरॉल जमा होण्यासही अटकाव यामुळे होतो.

कॅन्सरपासून बचाव करते..
जवसमध्ये लिग्नान्स अँटीऑक्सिडंट भरपूर असते. कोणत्याही शाकाहारी पदार्थांपेक्षा जवसमध्ये 800 पट लिग्नान्स अँटीऑक्सिडंट असते त्यामुळे कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते. जवस नियमित खाण्यामुळे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर तर पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर होण्यापासून रक्षण होते.

फायबर्स मिळते..
केवळ एक चमचा जवसामधून 3 ग्रॅम फायबर्स (तंतुमय पदार्थ) मिळतात. फायबर्समुळे पोट नियमित साफ होण्यास मदत होते. तसेच फायबर्समुळे रक्तातील साखर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवले जाते.

कोलेस्टेरॉल कमी करते..
जवस रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करते, चांगले कोलेस्टेरॉल वाढवते आणि रक्तवाहिन्यात कोलेस्टेरॉल साचू देत नाही. दररोज 3 चमचा जवसची चटणी आहारात असल्यास 20% वाईट कोलेस्टेरॉल (म्हणजे LDL कोलेस्टेरॉल) कमी होते. तर हार्टसाठी आवश्यक असे चांगले कोलेस्टेरॉल (म्हणजे HDL कोलेस्टेरॉल) 15% नी वाढते.

रक्तदाब आटोक्यात ठेवते..
हाय ब्लडप्रेशरमुळे हार्ट अटॅक, पक्षाघात, किडनी निकामी होणे यासारखे गंभीर समस्या होत असतात. यासाठी ब्लडप्रेशर नियंत्रित असणे आवश्यक असते. जवस नियमित खाण्यामुळे ब्लडप्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे हाय ब्लडप्रेशरचा त्रास असल्यास आहारात जवसचा वापर उपयोगी ठरतो.

डायबेटीसमध्ये उपयोगी..
जवस खाल्याने ब्लड शुगर लेव्हल कमी होते. त्यामुळे डायबिटीज नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच जवस रक्तातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करते, चांगले कोलेस्टेरॉल वाढवते आणि रक्तवाहिन्यात कोलेस्टेरॉल साचू देत नाही. यात हार्टसाठी आवश्यक असणाऱ्या अमेगा-3 फॅटी ऍसिडचे प्रमाण मुबलक असते. त्यामुळे जवस नियमित आहारात असल्यास डायबेटीस रुग्णांना सदैव असणारा हार्ट अटॅक, पक्षाघात, हाय ब्लडप्रेशर याचा धोका कमी होतो.

अॅनिमिया दूर करते..
जवसामध्ये लोह (आयरन) मुबलक असते जे अॅनिमिया दूर करण्यास फायदेशीर ठरते.

लिव्हरसाठी उपयुक्त..
जवसामधील अँटीऑक्सीडेंट्स बॉडीला डिटॉक्स करतात ज्यामुळे लिव्हर प्रॉब्लेम दूर होते.

हाडांसाठी उपयुक्त..
रोज एक चमचा जवस पावडर खाल्ल्याने आपली हाडे व सांधे मजबूत होतात.

वजन आटोक्यात ठेवते..
जवस खाण्यामुळे भूक नियंत्रित राहण्यास मदत होते. याशिवाय यात फायबर्सही मुबलक असते त्यामुळे वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.

शाकाहारी लोकांसाठी सुपरफूड..
मासे खाणाऱ्या लोकांना माशांमधून ओमेगा-3 फॅटी ऍसिड मिळत असते. पण शाकाहारी असणाऱ्या लोकांचे काय? हृदयाच्या आरोग्यासाठी ओमेगा-3 फॅटी ऍसिडची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे ओमेगा-3 फॅटी ऍसिड मिळण्यासाठी आहारात जवसचा जरूर समावेश करावा.
याशिवाय जवसमध्ये उच्च दर्जाचे प्रोटिन्सही असते. मांस, मासे, अंडी न खाण्यामुळे पुरेसे प्रोटीन शाकाहारी लोकांना मिळत नाही. त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी ओमेगा-3 फॅटी ऍसिड, प्रोटिन्स देणारे जवस हे सुपरफूडचं आहे.

जवस कसे खावे..?

जवस बिया थोड्या गरम करून त्यामध्ये थोडे सैंधव मीठ (काळे मीठ), तिखट घालून मिक्सरला बारीक करून याची सुखी चटणी करून आहारात सामावेश करावी.

जवस खाण्याचे दुष्परिणाम किंवा जवस खाण्याचे नुकसान :

जवस हे अनेक पोषकघटकांनी युक्त असते. असे असूनही काही लोकांसाठी ते थोडे अपायकारक ठरू शकते. जवस अधिक प्रमाणात खाल्यामुळे अतिसार, पोटदुखी, गॅसेस, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या होऊ शकतात.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

जवस कोणी खाऊ नये..?
• गरोदरपणात जवस खाऊ नये. इस्ट्रोजेन हॉर्मोनप्रमाणे जवस कार्य करत असल्याने प्रेग्नन्सीमध्ये व डिलिव्हरीनंतर काही दिवस जवस खाणे टाळावे.
• जवस खाण्यामुळे रक्त पातळ होत असल्याने ब्लिडिंग समस्या (रक्तस्त्राव होण्याची समस्या) असणाऱ्यांनी जवस खाणे टाळावे.
• जवस खाण्यामुळे रक्त पातळ होऊन रक्तस्राव होण्याची शक्यता असल्याने मोठ्या शस्त्रक्रियेनंतर काही दिवस जवस खाणे टाळावे.
• जवस खाण्यामुळे रक्तातील साखर एकाएकी कमी होऊ शकते त्यामुळे डायबेटीस रुग्णांनी जवस खाताना थोडी खबरदारी घ्यावी. डायबेटीस रुग्णांनी जवस अधिकप्रमाणात खाणे टाळावे.
• जवस खाण्यामुळे ब्लडप्रेशर कमी होत असल्याने लो ब्लडप्रेशरचा त्रास असणाऱ्यांनी जवस खाणे टाळावे.

जवसमधील पोषकतत्वे (Nutrition contains) –

एक चमचा म्हणजे साधारण 7 ग्रॅम जवसात पुढीलप्रमाणे पोषकतत्वे असतात.
कॅलरी – 37
प्रोटीन्स – 1.3 ग्रॅम
कर्बोदके – 2 ग्रॅम
फायबर – 1.9 ग्रॅम
एकूण फॅट – 3 ग्रॅम
सॅच्युरेटेड फॅट – 0.3 ग्रॅम
मोनोअनसॅच्युरेटेड फॅट – 0.5 ग्रॅम
पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट – 2.0 ग्रॅम
कोलेस्टेरॉल – 0%
ओमेगा-3 फॅटी ऍसिड – 1597 मिलीग्राम
व्हिटॅमिन-B1 – दिवसाच्या एकूण गरजेपैकी (RDI) 8%
व्हिटॅमिन-B6 – 2% of the RDI
फोलेट – 2% of the RDI
कॅल्शियम – 2% of the RDI
लोह – 2% of the RDI
मॅग्नेशियम – 8% of the RDI
फॉस्फरस – 4% of the RDI
पोटॅशियम – 2% of the RDI

Flaxseed Health Benefits, Food Sources, Recipes, and Tips in Marathi.