लसूण खाण्याचे फायदे मराठीत माहिती (Garlic Health Benefits)

Garlic Health Benefits in Marathi.

लसूण आपल्या आहारातील एक अविभाज्य घटक बनला आहे. लसूण फक्त भोजनाची चवचं वाढवत नाही, तर याच्या सेवनाचे अनेक औषधी उपयोग आहेत.

लसूण खाण्याचे फायदे :
• दररोज लसणाची एक पाकळी खाणे आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. यातून अ, ब आणि क जीवनसत्त्वांसह आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारखे अनेक पोषक तत्त्व एकत्र मिळतात.
• ‎लसणाच्या नियमित सेवनाने त्वचेचे आजारही बरे होतात.
• ‎लसूण शरीरात इन्सुलीनचे प्रमाण वाढविते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे.
• ‎लसणाचे सेवन कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते. लसणामुळे रक्ताचे शुद्धीकरण होतेच, शिवाय रक्त पातळ होते. त्यामुळे रक्ताच्या गाठी निर्माण होत नाहीत.
• ‎लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्सच्या प्रभावापासून वाचवितो. तसेच सल्फरयुक्त गुण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. Anti-clotting गुणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत.
• ‎रोज लसणाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. हवामान बदलामुळे होणा-या सर्दी आणि खोकल्यावर लसूण टाकलेला चहा गुणकारी आहे.
• ‎थंडी किंवा बदलणा-या वातावरणात सर्वच वयोगटातील लोकांना कफ किंवा सर्दीचा त्रास होतो. लसणाचे नियमित सेवन केल्यास अशा आजारांपासून सहज मुक्तता होऊ शकते.
• ‎लसणात Anti-inflammatory गुण आहेत.
• ‎लसणाचे नियमित सेवन केल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो.
• ‎सोरायसिच्या त्रासावर लसूण रामबाण उपाय आहे. लसणाचे तेल लावल्यास त्वचेला खूप आराम मिळतो आणि समस्या दूर होते.
• ‎लसणात डायली-सल्फाईड असते. त्यामुळे फेरोप्रोटीनचे प्रमाण वाढविते. याचा फायदा म्हणजे, आयर्न मेटाबॉलिझम सुधारण्यात मदत होते.
• ‎नियमित लसूण सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. Acidity आणि गॅसेसच्या त्रासापासूनही दिलासा मिळतो. हृदयाच्या विकारांसह तणावावरही लसूण नियंत्रण ठेवतो.
• ‎दुधात लसूण उकळवून पाजल्यास लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. लसणाच्या पाकळ्या भाजून खाल्ल्यास लहान मुलांना श्वास घेताना होणारा त्रास दूर होतो. ज्या मुलांना सर्दीचा त्रास जास्त होतो, त्यांना लसणाच्या पाकळ्यांची माळा घातली पाहिजे. त्रास कमी होतो.
• ‎वजन घटविण्यात लसूण गुणकारी आहे. शरीरातील वसा कोशिकांना विनियमित करण्याची क्षमता लसणात आहे. त्यामुळे वजन कमी होते.
• ‎सांधेदुखीसाठी लसूण अतिशय गुणकारी आहे.
• ‎शरीरात रक्ताची कमतरता असल्यास लसूण खूप फायदेशीर आहे. लसणात लोह असते. रक्त तयार होण्यास लोह आवश्यक असते. तसेच क जीवनसत्त्व असल्यामुळे स्कर्वी रोगापासूनही बचाव होतो.
• ‎लसणाच्या सेवनामुळे सर्दीपासून लवकर आराम होतो. तसेच घशाला होणा-या संसर्गापासूनही बचाव होतो. अस्थमासारख्या श्वसनविकारात लसूण गुणकारी आहे.
• ‎लसणाच्या सेवनाने केस गळणे बंद होते. लसणाची पेस्ट डोक्याला लावल्यास केस गळणे कमी होते.
• ‎लसूण नियमित सेवन केल्यास दातांच्या दुखण्यामध्ये आराम मिळतो. दात दुखत असल्यास लसणाची पेस्ट करून दातांवर ठेवावी. लगेच आराम मिळेल. लसणात anti बॅक्टेरियल तत्त्व असतात.

विविध आहार घटकांची, फळांची, भाज्यांतील पोषकतत्वे यांची मराठी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..

– डॉ. सतीश उपळकर
CEO, हेल्थ मराठी नेटवर्क

© कॉपीराईट विशेष सूचना : वरील माहिती आपणास कॉपी पेस्ट करून अन्य ठिकाणी वापरता येणार नाही. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा व सूचना वाचा.

आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.