बीट खाण्याचे फायदे व नुकसान मराठीत माहिती

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Health Benefits of Beetroot Juice in Marathi.

बीट खाण्याचे फायदे :

बीट हे अनेक पोषक घटकांनी युक्त असून रोजच्या आहारात बीटचा वापर केला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. बीटमध्ये अनेक उपयुक्त पोषक घटक म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटेशियम, फॉस्फरस, विटामिन बी1, बी2 आणि सी, आयरन आणि फोलिक अ‍ॅसिड असतात. बीट खाण्याचे, बीट रस पिण्याचे फायदे खाली दिले आहेत.

रक्तदाब नियंत्रणात राहतो..
बीट खाल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. बीटमध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या नायट्रेटमुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. बीट खाल्याने नायट्रेट हा घटक पचनसंस्थेत पोहचल्यानंतर नायट्रेट आॅक्साइड बनते आणि रक्तप्रवाहास (Blood circulation) वाढवितो, त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. यासाठी हाय ब्लडप्रेशरचा त्रास असलेल्या व्यक्तींना बीट नेहमी खावे किंवा दाररोज 1 कप बीटचा रस प्यावा.

कोलेस्टेरॉल कमी करतो..
बीट खाण्यामुळे किंवा बीटचा रस पिण्यामुळे वाईट कोलेस्टेरॉल आणि triglycerides कमी होते तर चांगले कोलेस्टेरॉल (HDL) वाढण्यास मदत होते. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होण्यास मदत होतो. शिवाय बीटमुळे हृदयाच्या मांसपेशीही मजबूत होण्यास मदत होते.

रक्त वाढते..
बीटमध्ये मुबलक प्रमाणात लोह आणि फॉलिक ऍसिड असते त्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते. रक्त वाढीसाठी रोज सकाळी 1 कप बीटचा रस प्यावा.

स्टॅमिना वाढतो..
दररोज 2 कप बीटचा रस पिल्यामुळे व्यायामासाठीचा स्टॅमिना वाढण्यास मदत होते. शरीरातील रक्तप्रवाह वाढून व्यायामाचा योग्य फायदा होण्यास मदत होते.

वजन आटोक्यात राहते..
बीट किंवा बीटच्या रसात कमी कॅलरीज असतात तसेच 0% फॅट असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीच्या डायट प्लॅनमध्ये याचा समावेश करणे खूप फायदेशीर ठरते कारण, लो-कॅलरीज असणाऱ्या बीट किंवा बीटच्या रसात फायबर्स आणि कॅल्शियम, लोह यासारखी पोषकतत्वे भरपूर असतात. बीटच्या रसासोबत गाजरचा रस समभाग मिक्स करून पिल्याने शारीरिक ताकद वाढते, सोबतच वजन वाढत नाही आणि चरबी कमी करण्यासही मदत होते.

कॅल्शिअमचा मुबलक स्रोत..
बीट कॅल्शिअमची पूर्तता करतो. कॅल्शिअम हे शरिरासाठी आवश्यक असा घटक आहे. कॅल्शिअममुळे आपली हाडे आणि दात मजबूत होतात. बीट शरिरातील कॅल्शिअमची कमतरता दूर करतो. यासाठी बीट दातांनी चाऊन खाल्ले पाहिजे, यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात.

महिलांसाठी लाभदायक..
मासिक पाळी जर नियमित येत नसेल आणि यावेळी त्रास होत असेल तर बीट खाल्याने त्यापासून सूटका होते. महिलांमध्ये रक्त, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बीट उपयुक्त ठरते. यासाठी ज्या महिलांना मासिक पाळीदरम्यान त्रास होतो, त्यांनी कच्चे बीट आहारात समाविष्ट करावे. याशिवाय गरोदर महिला आणि गर्भात असलेल्या बाळासाठी आवश्यक असणारे फॉलिक अॅसिड बीटमध्ये भरपूर प्रमाणात असते. तसेच प्रसूतीनंतर बीटमुळे आईचे दूध वाढण्यास मदत होते.

कँसरपासून रक्षण करतो..
बीट हे Betalaines या अँटीऑक्सिडंट्समुळे गडद लाल रंगाचे असते. Betalaines ह्यामुळे कँसरपासून रक्षण होण्यास मदत होते शिवाय शरीरातील विकृत पेशी नष्ट करण्यासही ह्याची मदत होते.

बीट कोणी खाऊ नये किंवा बीट रस पिताना कोणती काळजी घ्यावी..?
• जर तुम्हाला लो-बीपी म्हणजे रक्तदाब कमी होण्याचा त्रास असल्यास बीट किंवा बीट रस पिऊ नका कारण अशावेळी एकाएकी रक्तदाब कमी होऊ शकतो.
• जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असल्यास बीट खाणे टाळावे. कारण बीटमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि Oxalates चे प्रमाण असते यामुळे किडनी स्टोन्सचा त्रास होऊ शकतो.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

सुरवातीला बीट खाण्यामुळे किंवा रस पिल्यामुळे लघवी व संडासचा रंग हा लालसर होऊ शकतो, असे होणे सामान्य असून अशावेळी घाबरण्याचे काहीही कारण नाही. अशाप्रकारे आपण आपल्या आहारात बीटचा समावेश केल्यास आपणास बीटमुळे आरोग्यदायी लाभ होण्यास मदत होईल.

हे सुद्धा वाचा..
हळद खाण्याचे फायदे
लसूण खाण्याचे फायदे
गरम पाणी पिण्याचे फायदे

Benefits of Beetroot And Its Side Effects in Marathi. Health Benefits Of Beets And Beet Juices in Marathi.