फुफ्फुसाचा कर्करोग मराठीत माहिती (Lung Cancer in Marathi)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Lung cancer in Marathi, Lung cancer Treatments in Marathi, Lung Cancer Causes, Symptoms, Diagnosis test, Stages and Treatment in Marathi.

फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे काय..?

Lungs cancer information in Marathi
फुफ्फुसे ही श्वसन प्रणालीतील सर्वात महत्वाचे अवयव असून श्वसनक्रिया होण्यासाठी, श्वास घेण्यासाठी फुफ्फुसे आवश्यक असतात. जेव्हा फुफ्फुसातील पेशी ह्या अनियंत्रितपणे वाढू लागतात तेव्हा हळूहळू फुफ्फुस कॅन्सरची स्थिती निर्माण होऊ लागते. तसे पाहता सर्वच प्रकारचे कॅन्सर हे धोकादायकचं असतात मात्र त्यातही फुफ्फुसांचा कर्करोग हा एक अत्यंत धोकादायक असा रोग आहे. धूम्रपान करणे हे फुफ्फुस कॅन्सरचे प्रमुख कारण आहे याशिवाय वाढलेले हवेचे प्रदूषण हेसुद्धा फुफ्फुस कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. आज वयाच्या 40शी नंतर फुफ्फुस कॅन्सर होण्याचे प्रमाण जास्त आहे.

फुफ्फुसाच्या कर्करोगाची सुरवात अगदी हळूहळू होत असते. फुफ्फुसाच्या कर्करोगाची वाढ होत असताना कोणतीही लक्षणे रुग्णाला जाणवत नाहीत. अधिकांशवेळा कोणत्याही लक्षणांशिवाय फुफ्फुस कॅन्सर अधिक वाढलेला असतो, त्याची लागण शरीरातील इतर अवयवांना देखील झालेली असते, तो सेकंड स्टेजमध्ये पोहचलेला असतो. सेकंड स्टेजमध्ये गेलेल्या कॅन्सरवर उपचार करणे कठीण होऊन जाते. यासाठी कर्करोगाचे सुरुवातीच्या स्टेजमध्येचं निदान होऊन उपचार करणे आवश्यक असते.

फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची कारणे :

कशामुळे होतो फुफ्फुसांचा कॅन्सर..?
Lung Cancer Causes in Marathi
धूम्रपान करण्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होतो. सिगारेट-बिडी-चिलीम-तंबाखू यांचे व्यसन हे फुफ्फुस कॅन्सरचे प्रमुख कारण बनले आहे. फुफ्फुसाचा कर्करोग हा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना होण्याचे प्रमाण हे 90% इतके आहे.
• ‎सेकंडहँड स्मोकमुळेही याचा धोका संभवतो. म्हणजे जर आपण धूम्रपान करत नसाल आणि आपल्या आजूबाजूची व्यक्ती धूम्रपान करीत असल्यास त्या धुराच्या संपर्कात आल्यानेही याचा आपणास धोका संभवतो.
• ‎हवेच्या प्रदूषणामुळेही फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. विषारी धूर ओखणारे कारखाने, वाढलेली वाहने, शहरीकरण आणि बेसुमार केलेली वृक्षतोड यांमुळे हवेच्या प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. हवेमध्ये विविध अपायकारक घटक मिसळलेले आहेत.
• ‎फुफ्फुसांशी संबंधित COPD किंवा क्षयरोग (TB) यासारखे गंभीर आजार झाल्यामुळे.
• ‎अनुवंशिकतेमुळे, फुफ्फुसांचा कर्करोग कुटुंबातील आजोबा, वडील, आई, भाऊ, बहीण यांना झालेला असल्यास.
• ‎तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमजोर झालेल्या व्यक्तीमध्ये फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोका संभवतो.

फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची लक्षणे :

फुफ्फुसाच्या कॅन्सरची प्रमुख लक्षणे कोणती आहेत..?
Lung Cancer Symptoms in Marathi
फुफ्फुसाच्या कर्करोगाची सुरवात अगदी हळूहळू होत असते त्यामुळे कधीकधी कोणतीही लक्षणे रुग्णाला जाणवत नाहीत. अधिकांशवेळा कोणत्याही लक्षणांशिवाय फुफ्फुस कॅन्सर अधिक वाढलेला असतो.
तर कधीकधी ही लक्षणे दिसू शकतात.
• दीर्घकाळ खोकला असणे. दोन ते तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकल्याचा त्रास होत असणे.
• ‎खोकताना छातीतून वेदना होणे.
• ‎खोकल्यातून रक्त येणे.
• ‎श्वास घेताना त्रास होणे, छातीत दुखणे.
• ‎भूक न लागणे, वजन कमी होणे.
• ‎आवाजामध्ये बदल होणे ही फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणे असू शकतात. या लक्षणांमुळे वेळीच रोगाचे निदान झाल्यास त्वरीत उपचार करुन फुफ्फुस कॅन्सरचा पुढचा धोका टाळता येणे शक्य आहे यासाठी वेळीच या लक्षणांना ओळखा व त्वरीत उपचार करुन घ्या.

फुफ्फुस कॅन्सरचे निदान कसे करतात..?

Lung Cancer Diagnosis & Test in Marathi
असलेली लक्षणे, पेशंट हिस्ट्री, रुग्णाची शारीरिक तपासणी करून डॉक्टर यांच्या निदानास सुरवात करतील. तसेच ब्रोंकोस्कोपीद्वारे, छातीच्या एक्सरे, सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅनद्वारे फुफ्फुसातील स्थिती पहिली जाईल. याशिवाय लंग बायोप्सी (फुफ्फुसातील पेशी काढून घेऊन त्यांची तपासणी केली जाते), रक्त तपासणी आणि खोकल्यातील बेडक्याची तपासणीसुद्धा केली जाईल.

फुफ्फुस कॅन्सर उपचार मराठीत माहिती :

Lung Cancer Trearment in Marathi
फुफ्फुसाच्या कर्करोगाचा उपचार हा कोणत्या स्टेजमध्ये कॅन्सर आहे यावर अवलंबून असतो. गाठेचे स्वरूप, कॅन्सर किती पसरलेला आहे याप्रमाणे उपचार पद्धती ठरते. त्यानुसार फुफ्फुसाच्या कँसरवर ऑपरेशन आणि केमोथेरेपीद्वारे (Chemotherapy), Targeted Therapy किंवा रेडिएशन थेरपी याद्वारे उपचार केला जातो.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

फुफ्फुस कॅन्सर होऊ नये म्हणून काय करावे, कोणती काळजी घ्यावी..?

Tips for Lung Cancer Prevention in Marathi
• धूम्रपान करू नका. सिगारेट-बिडी-चिलीम-तंबाखू यांचे व्यसन करणे टाळा. सिगारेट सोडण्याचे उपाय जाणून घ्या..
• ‎दुसऱ्यांनी सोडलेल्या धूम्रपानाच्या धुराच्या संपर्कात येऊ नका.
• ‎हवेच्या प्रदूषणापासून दूर राहा.
• ‎संतुलित आहार घ्या. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश अधिक असावा.
• ‎नियमित व्यायाम आणि योगासने करा.
• ‎जर आपण धूम्रपान व्यसन केलेले असल्यास यापुढे धूम्रपान करू नका आणि वर्षातून किमान एकदा वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
• ‎भरपूर दिवस खोकला असणे किंवा खोकल्यातुन रक्त येणे यासारखी लक्षणे दिसून येत असल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन योग्य निदान आणि उपचार करून घ्यावेत.

खालील कॅन्सरचीही माहिती जाणून घ्या..
तोंडाचा कँसर मराठीत माहिती
रक्ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर)
पोटाचा कँसर
लिव्हर – यकृताचा कर्करोग
स्तनाचा कर्करोग

how is lung cancer diagnosed, types of lung cancer, is lung cancer curable, best lung cancer treatment, stage 4 lung cancer treatment options in Marathi.