डोकेदुखी कारणे, लक्षणे व उपाय मराठीत माहिती (Headache)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Headache in Marathi information, Headache treatments in Marathi, Headache (dokedukhi) Symptoms, Causes, Diagnosis & Treatments in Marathi.

डोकेदुखी म्हणजे काय..?

डोकेदुखी (Headache) ही एक सामान्य समस्या आहे. प्रत्येक व्यक्तीने डोकेदुखीचा कधीनाकधी अनुभव हा घेतलेला असेलच. आज बदललेली जीवनशैली, ताणतणाव आणि अयोग्य आहार यामुळे डोकेदुखी होणे हे अगदी सामान्य झाले आहे.

कारणे डोकेदुखीची..

Headache causes in Marathi
• अयोग्य आहार, मसालेदार पदार्थ, तेलकट-तिखट-खारट पदार्थ, फास्टफूड, चहा-कॉफीचा अतिरेक ह्यासारख्या आहार सेवन केल्याने,
• ‎स्मार्टफोन, काम्प्युटर, टीव्हीसमोर सतत बसणे,
• ‎व्यायामाच्या अभावामुळे,
• ‎अपूर्ण झोप, मानसिक ताणतणावामुळे,
• ‎डोक्याला मार लागल्यामुळे,
• ‎सिगारेट-धूम्रपान-तंबाखू आणि मद्यपानाचे व्यसनांमुळे डोकेदुखीचा त्रास होतो.
• ‎स्पॉन्डिलायटिसचा त्रास, साइनस, ऍसिडिटी, दातदुखी, डोळ्यांच्या समस्या किंवा वातावरणात होणारे बदल, हवेचे प्रदूषण यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. तर कधी डोकेदुखी हे ब्रेन ट्युमर, मेंदूचा कर्करोग यासारख्या कोणत्याही गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. ब्रेन ट्यूमरविषयी माहिती वाचा..

डोकेदुखीचे प्रकार :

Headache Types in Marathi
(1) अर्धशिशी किंवा मायग्रेन – यामध्ये डोक्याच्या एका बाजूला खूप वेदना होतात. ह्या वेदनांचा त्रास हा काही तासांपासून ते काही दिवसांपर्यंत असू शकतो. मायग्रेनमध्ये डोकेदुखीव्यतिरिक्त, मळमळणे, उलट्या दिसणे, अंधुक दिसणे, कमजोरी, आवाज किंवा प्रकाश सहन न होणे ही लक्षणे आढळतात. अर्धे डोके दुखणे यावरील माहिती व उपाय जाणून घ्या..

(2) विविध आजारांमुळे होणारी डोकेदुखी – स्पॉन्डिलायटिसचा त्रास, ऍसिडिटी, दातदुखी, फिट्स येणे, मेंदूचे आजार, पक्षाघाताचा झटका येणे, ब्रेन कॅन्सर, डोळ्यांच्या समस्या जसे चष्मा लागणे, डोळ्यातील दाब वाढणे, काचबिंदू (ग्लाकोमा) यांमुळेही डोकेदुखी होऊ शकते.

(3) तणावामुळे होणारी डोकेदुखी (Tension Headache) – अत्याधिक ताण आणि काळजी, चिंता करण्यामुळे हा डोकेदुखीचा त्रास होतो. बऱ्याच वेळा औषधोपचार न करताही केवळ विश्रांती घेतल्यास हा त्रास कमी होतो.

(4) सायनसची डोकेदुखी (Sinus Headache) – आपल्या चेहऱ्यावरील हाडांमध्ये कपाळ, नाक आणि गालाजवळ पोकळ भाग असतात. त्या भागांना सायनस असे म्हटले जाते. सर्दी झाल्याने किंवा थंडीच्या दिवसात, थंड पाणी पिल्याने या सायनस भागात कफ जमा होऊ लागतो. या कफात संक्रमण होऊन सायनाइटिसचा त्रास होऊ शकतो. यामुळे डोकेदुखी निर्माण होते. यामध्ये खाली बघितले असताही वेदना खूप जाणवितात. सायनसच्या त्रासाविषयी माहिती वाचा..

धोकादायक लक्षणे केंव्हा..?
डोकेदुखीचा त्रास होणे हे सामान्य असले तरीही अनेकदा डोकेदुखी हे गंभीर आजाराचेही लक्षण असू शकते. पक्षाघाताचा झटका येणे, ब्रेन कॅन्सर, मेंदूची सूज यामध्येही डोकेदुखी होऊ शकते. तेंव्हा मेंदूत रक्तस्त्राव किंवा रक्ताची गुठळी झाल्यास डोकेदुखी वाढते. अचानक डोकेदुखी वाढणे, डोळ्यांनी वस्तू डबल दिसणे, तोंड वाकडे होणे, बोलण्यास त्रास होणे, फिट्स येणे यासारखी डोकेदुखी बरोबर येणारी लक्षणे धोकादायक ठरू शकतात.

यासारखी गंभीर लक्षणे जाणवितात तेंव्हा रुग्णाची न्यूरॉलॉजिस्ट डॉक्टरांकडून तपासणी आणि उपचार करून घेणे आवश्यक असते. निदान करण्यासाठी आपले डॉक्टर मेंदूची CT Scan, MRI Scan तपासणी करून घेतील.

डोकेदुखीवर उपाय मराठीत :

डोके दुखू लागल्यास खालील उपयुक्त घरगुती उपाय करावेत..
• आल्याचा तुकडा घेऊन तो चांगला चावून खावा.
• काही लवंगा घेऊन त्या तव्यावर भाजून गरम कराव्यात. त्यानंतर एका रुमालात त्या गरम लवंगा घालून त्यांचा वास हुंगल्यास डोकेदुखी कमी होते.
• डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाणी कमी झाल्यामुळेही अनेकदा डोकेदुखी होऊ शकते. अशावेळी पुरेसे पाणी पिल्यामुळे डोकेदुखी कमी होऊ शकते.
• कपाळाला बर्फाचा शेक दिल्यामुळेही डोकेदुखी काही प्रमाणात कमी होऊ शकते.
• वेखंड, सुंठ किंवा दालचिनीची पेस्ट करून ती कपाळावर लावल्यानेही डोकेदुखीमध्ये आराम पडतो.
• आपल्या हाताचा अंगठा आणि तर्जनीमध्ये असणाऱ्या जागेत हलकासा दाब देऊन मसाज करावा. ह्या अॅक्युप्रेशर उपायामुळेही डोकेदुखी लगेच कमी होईल. 

डोकेदुखीचा त्रास होऊ नये म्हणून ह्या करा उपाययोजना :

Headache Treatment in Marathi
• संतुलित आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या यांचा समावेश करा. ज्यादा वेळ उपाशी राहू नका.
• ‎दिवसभरात भरपूर पाणी म्हणजे किमान 7 से 8 ग्लासतरी पाणी प्यावे.
• दररोज सकाळी उठल्यावर ग्लासभर गरम पाणी प्यावे.
• ‎मसालेदार पदार्थ, तेलकट–तिखट-खारट पदार्थ, फास्टफूड ह्यासारखे पदार्थ वारंवार खाणे टाळावे.
• ‎चहा-कॉफी वारंवार पिणे टाळा.
• ‎स्मार्टफोन, काम्प्युटर, टीव्हीसमोर सतत बसू नका.
• ‎जागरण करणे टाळा. दररोज किमान 6 तासांची झोप आवश्यक असते. पुरेशी झोप घ्यावी.
• ‎नियमित व्यायाम करावा. मोकळ्या हवेत फिरायला जावे.
• ‎मानसिक ताणतणाव, चिंता यापासून दूर रहा. मनशांत ठेवण्यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा करावी.
• ‎वारंवार डोकेदुखी होत असल्यास डोळ्यांचीही तपासणी करून घ्या.
• ‎तंबाखू, गुटखा, सिगरेट, बीडीचे व्यसन करणे टाळा.
• ‎डोकेदुखीवर सतत वेदनाशामक औषधे घेणे टाळा.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

वारंवार डोकेदुखी होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोकेदुखीवर उठसुठ वेदनाशामक गोळ्या (पेनकिलर्स) घेणे धोकादायक ठरू शकते. यापेक्षा वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन निदान व तपासणी करून योग्य उपचार करून घ्यावेत.

डोकेदुखी संबंधित खालील माहितीपूर्ण लेखही वाचा..
अर्धशिशी किंवा मायग्रेन डोकेदुखी म्हणजे काय
पित्ताचा त्रास कारणे आणि उपाय
पोट साफ होण्यासाठीचे उपाय
चक्कर येणे व उपाय
अपस्मार किंवा फेफरे येणे, फिट येणे आजाराची माहिती

dokedukhi marathi dokedukhi chi karne ardha shishi headache in marathi dokedukhi tablet migraine cure in marathi dokedukhi karne dokedukhi sathi gharguti upay dokedukhi che prakar.