धुम्रपान व्यसन आणि आरोग्य :

सिगारेट, बिडी, चिलिम ओढणे म्हणजे धुम्रपान. धुम्रपान करणे शरिराला घातक असते. त्यामध्ये तंबाखू, निकोटिन यासह विविध शरिरघातक रसायने असतात. एकट्या सिगारेटमध्ये तब्बल 4000 विषारी अपायकारक रसायने असतात. त्यातील 43 विषारी घटक कॅन्सरला कारणीभूत ठरतात.

सिगारेट, बिडीचे प्रत्येक पाकिट हे सेवन करणाऱ्‍याला मृत्युच्या जवळ घेऊन जात असते. एक सिगारेट मनुष्याच्या जीवनातील 8 मिनिटे कमी करतो. सध्या जगातील 1 अब्ज लोक हे धुम्रपानाच्या विळख्यात आले आसून प्रतिवर्षी किमान 6 लाख लोक धुम्रपानामुळे मृत्युमुखी पडतात.

धुम्रपानाचा सर्वात जास्त परिणाम आपल्या फुप्फुसांवर होतो. धुम्रपान करणाऱ्‍या व्यक्तिंना फुप्फुसाचा कर्करोग (Lung cancer) होण्याची अधिक शक्यता असते. धुम्रपान हे फुप्फुस कँसरचे 90 % कारण असते.

धुम्रपानामुळे होणारे दुष्परिणाम :
धुम्रपानाचा सर्वात जास्त परिणाम आपल्या फुप्फुसांवर होतो. धुम्रपान करणाऱ्‍या व्यक्तिंना फुप्फुसाचा कर्करोग (Lung cancer) होण्याची अधिक शक्यता असते.
धुम्रपान हे फुप्फुस कँसरचे 90 % कारण असते.

 • तोंडाचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग, पोटाचा कर्करोग होणे,
 • ‎मुखरोग आणि श्वसनसंस्थेचे गंभीर विकार होणे,
 • ‎त्वचा रुक्ष, कांतीरहीत होणे, त्वचा काळवंडणे, त्वचेवर सुरकुत्या पडतात,
 • ‎म्हातारपण लवकर येते, अकाली वृधत्व,
 • ‎शरिरातील रक्तप्रवाह कमी होणे,
 • ‎उच्चरक्तदाब,
 • ‎हृद्य रोग उत्पन्न होणे, हार्ट अटॅक येणे,
 • ‎पक्षाघाताचा झटका येणे,
 • ‎डोळ्यांचे विकार उद्भवणे, दृष्टी कमजोर होणे, मोतिबिंदू होणे,
 • ‎पचनसंस्थेचे विकार उद्भवणे,
 • ‎प्रजननसंस्थेवर धुम्रपानामुळे घातक परिणाम होतो. नपुसंकता निर्मान होते.
 • ‎अकाली मृत्यु येणे. पर्यायाने धुम्रपानामुळे आयुष्याचा धुर होतो आणि शेवटी उरते फक्त राख..

सेकंडहँड स्मोकमुळेही याचा धोका संभवतो. म्हणजे जर आपण धूम्रपान करत नसाल आणि आपल्या आजूबाजूची व्यक्ती धूम्रपान करीत असल्यास त्या धुराच्या संपर्कात आल्यानेही याचा आपणास धोका संभवतो.

सिगारेट सोडण्याचे उपाय
धुम्रपान करणे शरिरास हानिकारक असते हे माहित असूनही अनेकजन त्याच्या अहारी जातात. इच्छा असूनही त्या पासून दूर होऊ शकत नाहीत.

 • प्रबळ इच्छा करावी. धुम्रपान न करण्याचा दृढनिश्चय मनामध्ये करावा.
 • ‎यासंबंधी आपल्या मित्रपरिवारालाही कल्पना द्यावी. कोणत्याही परिस्थितीत धुम्रपानापासून दूर रहावे.
 • ‎धुम्रपानाची इच्छा झाल्यास लिंबूरसाचे चाटण करावे. त्यामुळे धुम्रपानाची इच्छा मंद होण्यास मदत होते. तसेच वेलदोडे, ओवा, जेष्ठमध तोंडामध्ये ठेवावा.
 • ‎मानसिक तणावरहीत रहावे. यासाठी नियमित व्यायाम, योगासने, ध्यानधारणा, प्राणायाम करावे.
 • ‎सकाळी मोकळ्या हवेत फिरायला जावे.
 • ‎एखादा चांगला छंद लावून घ्यावा. त्यामध्ये मन गुंतवून ठेवावे.


दृढनिश्चयाशिवाय सिगारेट, धुम्रपानापासून दूर जाणे अशक्य आहे. तेंव्हा मनाची पूर्ण तयारी करा आणि धुम्रपानरहीत जीवन जगा.

हे सुद्धा वाचा..
दारूचे व्यसन आणि त्याचे दुष्परिणा

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.