यकृत कैन्सर विषयी जाणून घ्या

3162
views

यकृत कैन्सरची सामान्य माहिती :
यकृत कैन्सरला Hepatocellular carcinoma किंवा Hepatoma या अन्य नावांनीसुद्धा ओळखतात.

यकृत हे शरीरातील एक अतिमहत्वाचे असे अवयव आहे. पचनक्रिया, रक्तसंचारण क्रियेमध्ये यकृताची महत्वाची अशी भुमिका असते. याशिवाय शरीरातील अपायकारक विषारी घटकांचे निचरा करण्याचे महत्वपुर्ण कार्य हे यकृतावरच अवलंबुन असते.
त्यामुळे कोणत्याही कारणांनी जर यकृतामध्ये बिघाड झाल्यास वरील महत्वाच्या क्रिया सुरळितपणे होण्यास बाधा पोहचते.
यकृताच्या कैन्सरमध्ये यकृतातून अपायकारक विषारी घटकांचा निचरा होण्यास अवरोध उत्पन्न होतो. पर्यायाने रक्तातील अपायकारक विषारी घटकांची वाढ होते. अशावेळी योग्य उपचार केले गेले नाही तर यकृत निकामी होऊन रुग्ण दगावण्याचा धोका अधिक असतो.

यकृतात दोन प्रकारे कैन्सर उत्पन्न होत असतो,
[1] यकृतात स्वतःहूनच निर्माण होणारा Primary liver cancer.
[2] अन्य ठिकाणच्या कैन्सरचा यकृतामध्ये प्रसार झाल्याने होणारा यकृत कैन्सर.

◦ यकृतात स्वतःहूनच निर्माण होणारा Primary liver cancer –
जेंव्हा यकृतामधील पेशींमध्ये बदल होऊन त्यांची वाढ आणि विभाजन अनियंत्रित स्वरुपात होऊ लागते तेंव्हा यकृतामध्ये स्वतःहूनच कैन्सर निर्माण होतो त्यास Primary liver cancer असे म्हणतात. वेळीच योग्य उपचार न केल्यास प्राईमरी लिव्हर कैन्सरचा प्रसार फुफ्फुस आणि हाडांमध्येही होतो.

◦ अन्य ठिकाणच्या कैन्सरचा यकृतामध्ये प्रसार झाल्याने होणारा यकृत कैन्सर –
कधीकधी अन्य ठिकाणच्या कैन्सरचा यकृतामध्ये प्रसार झाल्याने यकृत कैन्सर निर्माण होतो. या स्थितीस Liver Metastasis असे म्हणतात.

यकृत कैन्सर संभाव्य घटक (Risk factor) –
◦ यकृत कैन्सरचे प्रमाण स्त्रीयांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक आहे.
◦ वयाचा विचार केल्यास 30 वर्षानंतरच्या व्यक्तीमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते.
◦ अति मद्यपान, धुम्रपान करणाऱयांना यकृत कैन्सर होण्याचा धोका अधिक असतो.
◦ पोटाचा, आतड्याचा, फुफ्फुस्, मुत्रपिंड किंवा गर्भाशयाचा कैन्सर असल्यास तेथील कैन्सरचा प्रसार यकृतात होऊन, यकृत कैन्सर उद्धवण्याचे प्रमाण अधिक आहे.
त्यामुळे यकृत कैन्सरचे निदान करतान वरील भागांचेसुद्धा परिक्षण करणे गरजेचे असते.

यकृत कैन्सरची कारणे –
◦ यकृत सिरोसिस हे यकृत कैन्सरचे एक प्रमुख कारण आहे.
◦ Hepatitis B and C च्या उपद्रवामुळे
◦ अत्यधिक मद्यपानामुळे
◦ पित्तवाहिनीतील विकृती हे यकृत कैन्सरचे सहाय्यक कारण असतात.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.