अल्प रक्तदाब (Low blood pressure)

5259
views

अल्प रक्तदाब (Low blood pressure):
अल्प रक्तदाब हा विकार Hypo-tension, Low blood pressure, Low BP या नावानेसुद्धा ओळखला जातो. याविकारामध्ये रक्तदाब असामान्यपणे कमी होतो. वयस्कांमध्ये सिस्टोलिक ब्लड प्रेशर 100 mm Hg पेक्षा कमी आढळत असल्यास त्यांना अल्प रक्तदाबाचे रुग्ण मानले जाते.

अल्प रक्तदाबाची कारणे :
रक्तदाब असामान्यपणे कमी होण्यासाठी अनेक कारणे जबाबदार असतात.
◦ उच्चरक्तदाब किंवा डिप्रेशनसाठी योजलेल्या औषधांमुळे रक्तदाब कमी येऊ शकतो.
◦ हृद्यातील विकृतीमुळे अल्परक्तदाब होऊ शकतो. जसे arrhythmias यासारख्या विकारामुळे,
अति रक्तस्त्रावामुळे,
◦ अतिसार, उलटीमुळे डिहाइड्रेशनची स्थिती निर्माण झाल्याने,
◦ असामान्यपणे शरीरातील तापमाण कमी झाल्याने Hypothermia मुळे रक्तदाब कमी होऊ शकतो,
◦ रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने, दमा, न्युमोनिया यासारख्या विकारांमध्ये रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झालेले आढळते.
◦ हॉर्मोन्सच्या असंतुलनामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.
◦ मज्जासंस्थेच्या विकारांमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. जसे डायबेटिक न्युरोपॅथी, मेंदु आणि मज्जासंस्थेस आघात (Injury) झाल्याने रक्तदाब असामान्यपणे कमी झालेला आढळतो.
◦ कुपोषणामुळे,
◦ किडन्यांचे विकारांमुळे,
◦ शारीरीक दुर्बलता, अशक्तपणामुळे,
◦ उपवास, अन्न आणि पाण्याच्या कमतरतेमुळे,
◦ शारीरिक अतिपरिश्रमामुळे,
◦ मानसिक तणाव, भय, शोक, मानसिक आघातामुळे अल्प रक्तदाबाची स्थिती निर्माण होते.

अल्प रक्तदाबाची लक्षणे :
◦ रक्तदाब असामान्यपणे कमी होणे,
◦ अत्यधिक घाम येणे,
◦ बैचेन, अस्वस्थ वाटणे,
◦ भ्रम, चक्कर येणे,
◦ हात पाय थंड पडणे, कम्पण होणे, थरथरणे,
◦ डोळ्यासमोर अंधारी येणे, दृष्टी कमजोर होणे,
◦ संज्ञाहिना (Fainting) उत्पन्न होणे,
◦ हृद्य स्पंदने असामन्यपणे होणे, छातीत धडधडणे.
ही लक्षणे सामान्यतः अल्प रक्तदाबामुळे उत्पन्न होऊ शकतात.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.