अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण

7296
views

अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण :
अवयवदान हे मृत्युनंतर आणि जीवंत असतानाही केले जाते. कायद्यानुसार जीवंत व्यक्ती आपल्या जवळच्या नातलगास अवयवदान करु शकते.

जेंव्हा एखादी जीवंत व्यक्ती अवयवदान करते, तेंव्हा त्या दाता व्यक्तीच्या जीवास धोका नसतो. तरीही त्या जीवंत व्यक्तीतील एक अवयव कमी होतो, हे त्या व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नसते. यासाठी जीवंत व्यक्तींनी अवयवदान करण्याची संख्या कमी करणे गरजेचे आहे. यासाठी मृत व्यक्तींच्या अवयवदानाचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे.

सामान्यतः एक मृत्यदेह सात जणांना जीवनदान देतो, तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करतो. याचा अर्थ एका मृतदेहामुळे सुमारे 42 लोकांना आपले आयुष्य पूर्वरत जगण्यास मदत होते. यासाठी मृत्युपश्चात अवयवदान करण्यासंबंधी जनजागृकता समाजामध्ये होणे गरजेचे आहे. समाजात अवयवदानाबाबत अजूनही अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे अवयवदानाची प्रक्रिया थंडावत चालल्याचे चित्र आहे.

किती तासांत अवयव प्रत्यारोपण होणे गरजेचे आहे –
◦ डोळ्यांचे जतन मृत्युनंतर काही महिन्यांपर्यंत करता येते.
◦ हाडे आणि त्वचा कितीही काळापर्यंत जतन केली जाऊ शकते.
◦ चार तासापर्यंत हृद्य जतन करता येते.
◦ सहा तासापर्यंत फुप्फुस जतन केले जाऊ शकते.
◦ बारा तासापर्यंत यकृत जतन केले जाऊ शकते.
◦ किडनी 48 तासापर्यंत जतन करता येते.

कोण असू शकतो अवयवदाता –
18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती ऐच्छिक अवयवदान करु शकते. तर 18 वर्षाखालील मुलांना अवयवदान करायचे असल्यास त्यांच्या पालकांची परवानगी लागते.

अवयवदान म्हणजे… “मरावे परी देहरुपी उरावे” –
लक्षात ठेवा, एक मृत्यदेह सात जणांना जीवनदान देऊ शकतो, तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारण्यास मदत करू शकतो.
याचा अर्थ एका मृतदेहामुळे सुमारे 42 लोकांना आपले आयुष्य पूर्वरत जगण्यास मदत होते.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.