सर्दी होण्याची कारणे व सर्दी कमी होण्यासाठी घरगुती उपाय (Common cold)

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Common cold upay in Marathi, sardi var upay in marathi, sardi var upchar Marathi, sardi upay in Marathi.

सर्दी होणे :

वातावरण बदलामुळे प्रामुख्याने थंडी आणि पावसाच्या दिवसात आपणा सर्वानाच सर्दी होण्याचा त्रास होत असतो. श्वसन मार्ग, नाक व घशामध्ये व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे सर्दी होत असते. मात्र हल्लीच्या धकाधकीच्या जीवनमानात आणि प्रदूषित वातावरणामुळे कोणत्याही ऋतूमध्ये सर्दीचा त्रास अनेकांची पाठ सोडत नाही.

सर्दी होण्याची कारणे :

साधारणपणे सर्दी ही Rhinovirus नावाच्या व्हायरस इन्फेक्शनमुळे होते. सर्दी हा संसर्गजन्य रोग असल्याने सर्दी झालेल्या व्यक्तीच्या खोकला किंवा शिंकातून दुसऱ्या व्यक्तीला सर्दीची लागण होत असते. तसेच ऍलर्जी आणि बॅक्टरीयाच्या इन्फेक्शनमुळे ही सर्दी होत असते.

तसेच सर्दी प्रामुख्याने हिवाळ्यात आणि पावसाळ्यात भरपूर प्रमाणात होते. थंडीत सकाळचा प्रवास, पावसात भिजणे, थंड पेय तसेच थंड पदार्थ जास्त खाणे या सवयी सर्दीला आमंत्रण ठरतात.

सर्दीवर उपचार :

Common cold treatment in Marathi
संसर्गातून झालेली सर्दी पाच-सहा दिवसांत आपोआप बरी होत असते. लक्षणानुसार उपचार केले जातात. सर्दीवर वेदनाशामक औषधे, Antihistamine, ताप आणि खोकला कमी करणारी औषधे दिली जातात.

सर्दी जर आठवड्यापेक्षा अधिक दिवस असल्यास आणि त्याबरोबरचं ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा खोकल्यातून रक्त येत असल्यास आपल्या डॉक्टरांना तात्काळ दाखवावे.

सर्दी झाल्यावर कोणती काळजी घ्यावी..?

• भरपूर कोमट पाणी प्यावे.
• ‎पूर्णपणे विश्रांती घ्यावी.
• ‎थंड वातावरणापासून दूर राहावे. शक्यतो एसीत जाणं टाळावे. प्रवास करताना कान आणि शरीर झाकून घ्यावे.
• ‎उबदार कपडे तसेच झोपताना उबदार रजई घ्यावी.
• ‎शिंकताना नाकापुढे रुमाल धरावा. म्हणजे इतरांना सर्दीची बाधा होणार नाही.
• ‎नेहमी सर्दी होत असणाऱ्या व्यक्तींनी ‘क’ जीवनसत्व असणाऱ्या पदार्थांचं सेवन वाढवावे. यासाठी आपण आवळा, लिंबू, संत्रे इत्यादी फळे खाऊ शकता.
• ‎आवळ्यापासून बनविलेले च्यवनप्राश यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. च्यवनप्राशमुळे आपली रोगप्रतिकारशक्ती ही वाढेल.

सर्दी घरगुती उपाय मराठी :

गरम दूध आणि हळद –
सर्दी झाल्यास एक कप गरम दूधात एक चमचा हळद घालून ते दूध प्यावे. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरिअल त्यामुळे सर्दी कमी होण्यास होते.

आले –
आल्याचा बारीक तुकडा चावून खाल्यानेही सर्दी कमी होण्यास मदत होते. तसेच सर्दीमुळे घशाला आलेली सूज आणि खोकलाही कमी होतो. त्याचबरोबर आले घालून केलेला चहाही आपण पिऊ शकता.

तुळशीच्या पानांचा काढा –
एक कप पाण्यात तुळशीची पाच-सहा पाने घालून त्यात आल्याचा तुकडा बारीक करून टाकावा व मिश्रण चांगले उकळावे. हा आले आणि तुळशीचा काढा थोडा कोमट झाल्यावर प्यावा. हा उपाय सर्दी वर खूप उपयोगी ठरतो.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

लिंबू रस आणि मध –
लिंबूरसात व्हिटॅमिन-C मुबलक असल्याने सर्दी कमी होण्यास ते खूप उपयुक्त ठरते. यासाठी चमचाभर लिंबू रसात दोन चमचे मध घालून ते कोमट पाण्यातून प्यावे. यामुळे सर्दी कमी होण्यास मदत होते.

काळी मिरी, सुंठ आणि मध –
सर्दीमध्ये काळी मिरी पावडर आणि सुंठीचं मिश्रण मधातून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.

Common cold information in Marathi, Remedies for a Runny nose in Marathi, sardi khokla gharguti upay in marathi., Common Cold Treatment, Causes, Symptoms & Prevention in Marathi.