यूरिक एसिड कशाने वाढते व शरीरातील यूरिक एसिड कमी करण्याचे उपाय जाणून घ्या..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

शरीरात यूरिक एसिड का व कशामुळे वाढते :

आपल्या शरीरात असणाऱ्या प्यूरिन घटकांमुळे (purine) आपल्या शरीरात नैसर्गिकपणे यूरिक एसिड तयार होत असते. याशिवाय जास्त प्यूरिनयुक्त घटक असणारे पदार्थ खाण्यामुळेही रक्तात यूरिक एसिडचे प्रमाण वाढत असते. 

अशावेळी लघवीवाटे पुरेसे uric acid बाहेर न पडल्यास त्यांचे रक्तातील प्रमाण वाढते. आणि जर यूरिक एसिडचे प्रमाण अधिक झाल्यास यूरिक एसिडचे क्रिस्टल्स आपल्या सांध्यांमध्ये जमा होऊन त्याठिकाणी सूज आणि अतिशय वेदना होत असतात. या त्रासाला हायपरयूरिसेमिया किंवा गाऊट या नावानेही ओळखले जाते.

जास्त प्युरिनयुक्त पदार्थ कोणते आहेत..?

यूरिक एसिडचे प्रमाण वाढवण्यास जबाबदार असणारे हाय-प्युरिनयुक्त पदार्थ पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये,
दारू-बियर, मासे, सीफूड, कोळंबी, झिंगा, खेकडे, मांसाहारी पदार्थ, कोल्ड्रिंक्स, चरबीचे पदार्थ, मटार, बेकरी प्रोडक्ट या पदार्थात प्युरिनचे अधिक प्रमाण असते. असे प्यूरिनयुक्त पदार्थ अधिक खाल्यामुळे शरीरात यूरिक एसिडचे प्रमाण वाढत असते.

शरीरात वाढलेले यूरिक एसिड कमी करण्याचे हे आहेत उपाय :

लसूण..
रक्तामध्ये अधिक वाढलेले युरिक एसिड कमी करण्यासाठी लसूण खूप उपयुक्त ठरते. हा त्रास असल्यास दररोज काही लसूण पाकळ्या चावून खाव्यात. याशिवाय लसूण पाकळ्या बारीक वाटून त्याचा लेप दुखणाऱ्या सांध्यावर लावावा.

आले..
आले खाण्यामुळे युरिक एसिडचे प्रमाण कमी होऊन सांध्यांना आलेली सूज कमी व वेदना कमी होतात. याशिवाय आले बारीक वाटून त्याचा लेप दुखणाऱ्या सांध्यांवर दररोज एकदा लावावा.

हळद..
हळदीतील करक्यूमिन ह्या अँटी-ऑक्सिडंटमुळे सांध्यांना आलेली सूज कमी होते. दोन कप पाण्यात अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा आल्याचा रस मिसळून मिश्रण 10 मिनिटे गरम करावे. हे मिश्रण थंड झाल्यावर प्यावे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

एरंडेल तेलाचा मसाज..
युरिक एसिडमुळे दुखणाऱ्याठिकाणी कोमट केलेले एरंडेल तेल लावून हलका मसाज करावा. यामुळेही संध्यातील सूज, वेदना कमी होण्यास मदत होईल.

पुरेसे पाणी प्यावे..
दिवसभरात पुरेसे म्हणजे साधारण 8 ग्लास पाणी पिण्यामुळे शरीरात जास्त झालेले युरिक एसिड लघवीवाटे बाहेर निघण्यास मदत होते.

यूरिक एसिडचा त्रास असल्यास त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व गुणकारी आयुर्वेदिक औषधे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.