संडासात रक्त पडणे –

संडास मध्ये रक्त येण्याची अनेक कारणे आहेत. ही कारणे सामान्य ते गंभीरही असू शकतात, त्यामुळे संडासवाटे रक्त जात असल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असू शकते. रक्त अधिक प्रमाणात जात असल्यास शरीरात रक्ताची कमतरता होऊन ऍनिमियाही होऊ शकतो.

संडास मध्ये रक्त येण्याची कारणे :

गुदाचे आजार म्हणजे मुळव्याध, फिशर यांमुळे संडासमध्ये रक्त येत असते. याशिवाय बद्धकोष्ठता, पॉलिप्स, जंताचा त्रास, इन्फेक्शन, अल्सर तसेच विविध प्रकारचे कँसर जसे मलाशयाचा कर्करोग, गुदाचा कर्करोग, आतड्याचा कर्करोग, पोटाचा कर्करोग, स्वादुपिंडाचा कर्करोग यासारख्या गंभीर कारणांमुळेही संडासात रक्त पडत शकते.

डॉक्टरांकडे केंव्हा जावे..?

अनेक दिवस संडासात रक्त पडत असल्यास डॉक्टरांकडे जावे. याशिवाय पोटदुखी, जुलाब, उलट्या होत असल्यास डॉक्टरांकडे जावे. तसेच रक्त जाण्यामुळे अशक्तपणा, वजन कमी होत असल्यास आपल्या डॉक्टरांकडे जाऊन यावर निदान व उपचार करणे आवश्यक असते.

संडासात रक्त पडणे यावर करायचे उपाय :

मूळव्याध, फिशर किंवा बद्धकोष्ठता यासारख्या कारणांमुळे जर रक्ताची संडास होत असल्यास खालील उपाय उपयोगी ठरतात. मात्र याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे रक्तस्राव होत असल्यास आपल्या डॉक्टरांकडे जाऊन तात्काळ निदान करणे गरजेचे आहे.

1) लोणी व खडीसाखर –
मूळव्याधमुळे संडासात रक्त पडत असल्यास एक चमचा ताजे लोणी व खडीसाखर मिसळून दिवसातून तीन वेळा खावी. मुळव्याध उपचार जाणून घ्या..

2) कांदा –
मूळव्याधमध्ये संडासमध्ये रक्त येत असल्यास 30 ग्रॅम कांद्याचा रस व 60 ग्रॅम साखर एकत्र करून ते मिश्रण काही दिवसांसाठी दिवसातून दोनदा घ्यावे.

3) साजूक तूप –
बद्धकोष्ठताचा त्रास होत असल्यास व त्यामुळे संडासमध्ये रक्त येत असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी एक कप गरम पाण्यात दोन-तीन चमचे साजूक तूप टाकून ते पाणी प्यावे. यामुळे सकाळी बद्धकोष्ठता दूर होऊन पोट साफ होण्यास मदत होईल.

4) त्रिफळा चूर्ण –
बद्धकोष्ठतेमुळे संडासमध्ये रक्त जात असल्यास गुदभागी त्रास न होता पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्ण खूप उपयोगी ठरते. अर्धा कप कोमट पाण्यात एक चमचा त्रिफळा चूर्ण कालवून ते मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. यामुळे सकाळी व्यवस्थित पोट साफ होण्यास मदत होते.

5) एरंडेल तेल –
पोट साफ न होण्याच्या त्रासावर एरंडेल तेलही उपयुक्त ठरते. यासाठी 5 ml एरंडेल तेल ग्लासभर दुधात मिसळून रोजरात्री झोपण्यापूर्वी प्यावे.

Read Marathi language article about Blood in stool causes and home remedies. Last Medically Reviewed By Dr. Satish Upalkar on March 7, 2024.

Dr. Satish Upalkar, obtained his bachelor’s degree in medicine and surgery from Maharashtra University of Health Sciences, Nashik, India in 2010. He is also a member of the Medical Council of Indian Medicine, Mumbai. He is working as a General Physician and Healthcare Consultant. Since 2012, he has had extensive experience in writing on various medical topics for the general public. After medical graduation, he has also completed diploma in diet and nutrition as well as yoga.