मुतखडा आणि पानफुटी :
पानफुटी (Bryophyllum pinnatum) ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती मूतखड्यावर खूप उपयोगी असते. पानफुटीमुळे मूतखड्याचे बारीक कण होऊन लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते. पानफुटीच्या उपायाने अगदी 10 ते 15 mm पर्यंतचे मूतखडेही लघवीवाटे विरघळून बाहेर पडू शकतात. यासाठी येथे मुतखडा त्रासावर पानफुटी पानांचा वापर कसा करावा याविषयी माहिती दिली आहे.
पानफुटीची पाने मुतखड्यावर अशी वापरा :
मुतखडा असणाऱ्यांनी पानफुटीची दोन पाने दररोज सकाळी चावून खावीत किंवा पानफुटीची पाने बारीक वाटून त्याचा रस काढून प्यावा. काही दिवस नियमित हा उपाय केल्यास हळूहळू किडनी स्टोनचे बारीक कण होऊन लघवीवाटे बाहेर निघून जातात. पानफुटीची पाने हा मुतखड्यासाठी एक रामबाण उपाय आहे.
पानफुटीची ताजी पाने दररोज उपलब्ध व्हावीत यासाठी ही औषधी वनस्पती दारातील एका कुंडीत लावावी. याचे रोपटे नर्सरीत मिळते किंवा पानफुटीचे पान मातीत रुजवल्यास किंवा फांदी कुंडीत लावल्यासही त्यापासून थोड्या दिवसात पानफुटीचे रोपटे तयार होते.