केस पातळ होणे : केमीकलयुक्त हेअर प्रोडक्ट्सचा अतिवापर, हार्मोनल बदल, चुकीचा आहार, ताणतणाव, प्रदूषण यासारख्या अनेक कारणांमुळे भरपूर प्रमाणात केस गळून जातात व त्यामुळे डोक्यावरील केस पातळ होतात. ही समस्या बऱ्याच स्त्री-पुरुषांना असते. केस पातळ होण्याची कारणे : केस पातळ होण्यासाठी पुढील कारणे प्रामुख्याने जबाबदार असतात. हार्मोन्समधील असंतुलन, आनुवंशिकता, केसात कोंडा होण्याची समस्या, थायरॉइडचा त्रास, […]
Hair Care
पांढरे केस काळे करण्यासाठी सोपे घरगुती उपाय
पांढऱ्या केसांची समस्या – आजच्या धावपळ आणि तणावाच्या जीवनात केस वेळेपूर्वी पांढरे होण्याची समस्या अनेकांना असते. पांढर्या केसांनी व्यक्तीचे सौंदर्य खराब होत असते. यासाठी, ते उपाय म्हणून बरेच महागडे हेअर डाय, कलर, शैम्पू वापरून पाहतात. पण म्हणावा तसा त्यांचा उपयोग होत नाही. यासाठी येथे पांढरे केस काळे करण्याचे सोपे उपाय सांगितले आहेत. केस पांढरे होण्यामागे अनेक […]
केस गळतीवर उपाय म्हणून कांद्याचा असा करा वापर ..
केस गळण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी कांदा हा खूप उपयुक्त ठरतो. कांद्याच्या रसात सल्फरचे प्रमाण अधिक असते. यांमुळे टिश्यूतील कोलेजनच्या निर्मितीस मदत होऊन केसांची वाढ होते तसेच केस मजबूतही होतात. यासाठी केस गळतीवर घरगुती उपाय म्हणून कांदा हा खूप गुणकारी ठरतो. 2002 मध्ये केलेल्या संशोधनानुसार, केस गळती रोखण्यासाठी कांद्याचा रस उपयुक्त ठरू शकत असल्याचे दिसून आले […]
लवकर केस पांढरे होण्याची कारणे व त्यावरील उपाय जाणून घ्या
केस पांढरे का व कशामुळे होतात..? तरुण वयात केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना आहे. मेलेनिनची कमतरता, अनुवंशिकता, चुकीचा आहार, धूळ-प्रदूषण, मानसिक ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे केस वेळेपूर्वी पांढरे होऊ लागतात. लवकर केस पांढरे होण्याची कारणे : मेलेनिन पिग्मेंटेशनच्या कमतरतेमुळे केसांचा रंग पांढरा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबरच शरीरातील मेलेनिनचं प्रमाण कमी होऊ लागते त्यामुळे केस पांढरे […]
केस जाड होण्यासाठी हे करावे घरगुती उपाय
केसांची जाडी वाढवणे (Thicker Hair) : केसांचा आकार पातळ होण्याची अनेक कारणे असतात. जसे शारीरिक आजार, मानसिक तणाव, हार्मोन्समधील असंतुलन, पोषकतत्वांची कमतरता, प्रदूषण, एलर्जी, अयोग्य ब्यूटी प्रोडक्टचा अतिवापर, केसांची देखभाल न करणे यांमुळे केसांचा आकार पातळ होऊ शकतो. पातळ झालेले केस कमजोर होऊन सहज तुटतही असतात. याशिवाय केसांचा आकार पातळ झाल्यामुळे केस गळतीचे प्रमाणही वाढते. […]
केस लवकर वाढवण्यासाठी हे करा घरगुती उपाय
केस लवकर वाढवणे (Grow Hair Faster) : आपले केस काळे, दाट आणि चमकदार असावेत असे प्रत्येकालाचं वाटत असते. काही जणांचे केस लवकर लवकर वाढत असतात तर काहींचे सावकाशपणे वाढत असतात. तसेच केस गळून पातळ होण्याच्या तक्रारीही अनेकांना भेडसावत असतात. त्यामुळे केस लवकर वाढावेत अशी अनेकांची इच्छा असते. यासाठी याठिकाणी केस लवकर वाढवण्याचे उपाय दिले आहेत. […]
विरळ झालेल्या केसांसाठी हे करा घरगुती उपाय
केस विरळ होणे (Hair loss) : अनेक कारणांनी केस गळती होऊन केस विरळ होत असतात. केस गळण्याच्या समस्यांमध्ये केस पातळ होणे ते पूर्ण टक्कल पडणे यांचा समावेश असतो. त्यामुळे केस विरळ होत असल्यास त्यावर वेळीच योग्य उपाय करणे आवश्यक असते. केस विरळ होण्याची कारणे : केस गळती होऊन केस विरळ व पातळ होण्यासाठी अनेक कारणे […]
टक्कल पडल्यास नवीन केस उगवण्यासाठी हे करा घरगुती उपाय
केस गळण्याची समस्या : पुरुष आणि महिला दोघेही केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असतात. अधिक प्रमाणात केस झडल्यामुळे टक्कल पडण्याचीही शक्यता अधिक असते. टक्कल पडण्याच्या समस्येची अनुवांशिकता, वाढते वय, हार्मोनल असंतुलन, मानसिक ताणतणाव आणि असंतुलित आहार ही प्रमुख कारणे आहेत. गेलेले केस उगवण्यासाठी उपाय म्हणून अनेकजण केमिकल्सयुक्त हेअर प्रोडक्टचा वापर, हेअर-प्लगचा उपयोग किंवा खर्चिक सर्जरीचा पर्यायही […]
केसांना चाई लागणे यावरील घरगुती उपचार जाणून घ्या – Alopecia Areata
डोक्यात चाई पडणे (Alopecia Areata) : केसात चाई पडण्याची तक्रार अनेकांना असते. यामध्ये अचानक एखाद्या ठिकाणचे सर्व केस गळून जातात. केस झडल्यामुळे त्याठिकाणी छोटे-छोटे गोलाकार पॅच निर्माण होतो. काही वेळा केस गेलेल्या ठिकाणी गोलाकार छोटासा खळगाही पडू शकतो. या समस्येला वैद्यकीय भाषेत एलोपेशीया एरेटा (Alopecia Areata) किंवा spot baldness असेही म्हणतात. चाई ही समस्या डोक्यातील […]
पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्यावी ते जाणून घ्या
पावसाळा आणि केसांचे आरोग्य : पावसाळ्यात केस वारंवार भिजण्याची शक्यता असते. पावसाच्या ओलसर हवामानात केस अधिक काळ भिजलेले राहिल्यास त्यात फंगल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात केसांची योग्य निगा ठेवणे गरजेचे असते. पावसाळ्यातील केसांची अशी घ्यावी काळजी : केस ओलसर ठेऊ नका.. पावसाच्या पाण्यात केस भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि […]