केस पातळ होणे :
केमीकलयुक्त हेअर प्रोडक्ट्सचा अतिवापर, हार्मोनल बदल, चुकीचा आहार, ताणतणाव, प्रदूषण यासारख्या अनेक कारणांमुळे भरपूर प्रमाणात केस गळून जातात व त्यामुळे डोक्यावरील केस पातळ होतात. ही समस्या बऱ्याच स्त्री-पुरुषांना असते.
केस पातळ होण्याची कारणे :
केस पातळ होण्यासाठी पुढील कारणे प्रामुख्याने जबाबदार असतात.
- हार्मोन्समधील असंतुलन,
- आनुवंशिकता,
- केसात कोंडा होण्याची समस्या,
- थायरॉइडचा त्रास,
- रक्तातील लोहाची कमतरता,
- आहारात प्रोटिन्स व बायोटिन यांची कमतरता असणे,
- अपुरी झोप व मानसिक ताणतणाव,
- केमिकलयुक्त हेअर प्रोडक्टचा जास्त व चुकीचा वापर करणे,
- काही औषधांचे दुष्परिणाम,
अशा अनेक कारणांनी केसगळती मोठ्या प्रमाणात होऊन केस पातळ होतात.
केस पातळ होणे यावरील घरगुती उपाय :
1. कांद्याचा रस –
कांदा बारीक करून कांद्याचा दोन चमचे रस काढावा. केसांच्या मुळांशी हलक्या हातांनी या रसाने मालिश करावी. यांमुळे केसांची मुळे घट्ट होऊन केस गळणे कमी होऊन पातळ झालेले केस वाढण्यास मदत होते.
2. ऑलिव तेल –
केस पातळ होणे यावर ऑलिव तेल खूप उपयुक्त असते. केस पातळ झाल्यास ऑलिव तेलाची मालिश केसांच्या मुळाशी केल्याने तेथील रक्ताचे रक्ताभिसरण (Blood circulation) योग्य प्रकारे होते. त्यामुळे केसांची मुळे दाट होऊन केस वाढण्याससुध्दा मदत होते.
3. भृंगराज तेल –
केस पातळ झाल्यास केसांच्या मुळाशी भृंगराज तेलाची मालिश करावी. भृंगराज तेलामध्ये केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक आयुर्वेदिक घटक असतात. त्यामुळे भृंगराज तेलाच्या वापराने पातळ केसांची समस्या दूर होते.
4. मेथी बीज –
मेथीचे बी रात्रभर पाण्यात भिजत घालावे व सकाळी भिजलेले बी बारीक वाटावे. त्याचा लेप केसांना लावून एक तासानंतर केस धुवावेत. या घरगुती उपायाने केसांची वाढ होऊन पातळ झालेले केस दाट होतात.
5. जास्वंद आणि खोबरेल तेल –
केसगळती थांबवून व केस दाट होण्यासाठी जास्वंद हितकारी असते. यासाठी जास्वंदाची काही फुले बारीक करून ती खोबरेल तेलात मिसळावीत. केस पातळ झालेले असल्यास हे तेल काही तासांसाठी केसांच्या मुळाशी लावावे त्यानंतर केस धुवावेत.
6. खोबरेल तेल आणि कापूर –
खोबरेल तेलामध्ये कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाशी लावावे. यामुळे केस गळणे थांबते व केसांची नवीन वाढ होऊन पातळ झालेले केस दाट होतात.
Read Marathi language article about Hair loss problem solution. Last Medically Reviewed on March 8, 2024 By Dr. Satish Upalkar.