Surgical operation treatment for Piles information in Marathi. Article written by Dr Satish Upalkar.

मूळव्याध – Piles :

मूळव्याधमध्ये गुद्द्वारच्या आत किंवा बाहेरील बाजूच्या शिरांना सूज येथे. त्यामुळे याठिकाणी असह्य वेदना जाणवतात, तेथे मूळव्याधीचे कोंब येतात तसेच काहीवेळा शौचावाटे रक्तस्त्रावही होऊ लागतो. मूळव्याधीचा त्रास अधिक वाढल्यास मूळव्याध ऑपरेशन करावे लागते. मूळव्याधवर कोणकोणत्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत तसेच मूळव्याध ऑपरेशन कसे करतात याविषयी माहिती येथे दिली आहे.

मूळव्याध आणि ऑपरेशन - Piles operation in Marathi.

मूळव्याधीची कारणे –

अयोग्य आहार, बद्धकोष्ठता हेच मूळव्याधीचे प्रमुख कारण आहे. वारंवार तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ, फास्टफुड खाण्याची सवय, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली यामुळे बहुतेक लोकांना मूळव्याधांची समस्या होत असते. तसेच काही प्रमाणात आनुवंशिक घटकसुध्दा यासाठी जबाबदार असू शकतात.

मूळव्याध शस्त्रक्रिया (Hemorrhoidectomy) –

मूळव्याधवर वेळीच योग्य काळजी व उपचार न घेतल्यास हा त्रास वाढून शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता पडते. साधारणपणे मूळव्याधीच्या दहा पैकी एका रुग्णाला शस्त्रक्रिया करण्याची गरज पडते.

मूळव्याध ऑपरेशन कसे करतात..?

मूळव्याधच्या त्रासात औषध उपचार तसेच अन्य पध्दतीनेही फरक पडत नसल्यास मूळव्याध ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला जातो. ह्या ऑपरेशनला Hemorrhoidectomy किंवा मुळव्याध शस्त्रक्रिया असे म्हणतात. मूळव्याध ऑपरेशनमध्ये भूल देऊन मूळव्याधीचे कोंब शस्त्रक्रियेने काढून टाकतात. अशाप्रकारे मूळव्याध ऑपरेशन करतात.

ह्या ऑपरेशनसाठी रुग्णाला तीन ते चार दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते. ऑपरेशननंतर एक किंवा दोन आठवड्यात रुग्ण पूर्ववत आपली कामे करू लागतो. ह्या ऑपरेशनमुळे मूळव्याधीचा त्रास पूर्णपणे कायमचा दूर होतो. मात्र शौचासंबंधी काही तक्रारी शस्त्रक्रियेनंतर होऊ शकतात. यासाठी शस्त्रक्रियेनंतर फायबर्सयुक्त पदार्थाचा समावेश आहारात जरूर करावा.

मूळव्याध शस्त्रक्रिया करण्यासाठी किती खर्च येतो..?

मुंबई, पुणे येथे मूळव्याध शस्त्रक्रिया (Hemorrhoidectomy) करण्यासाठी हॉस्पिटलनुसार Rs. 15,000 ते Rs. 1,40,000 रुपये पर्यंत खर्च येऊ शकतो. म्हणजे साधारण Rs. 70,500 पर्यंत खर्च मूळव्याध ऑपरेशनसाठी येऊ शकतो.

मूळव्याध ऑपरेशनचा success rate किती आहे..?

मूळव्याध ऑपरेशन यशस्वी होण्यासाठी अनेक घटक जबाबदार असतात. जसे मूळव्याधची स्थिती, रुग्णाचे वय, रुग्णाच्या आरोग्याची स्थिती, सर्जरीची पद्धत यावर मूळव्याध ऑपरेशनचा success rate अवलंबून असतो. मूळव्याध ऑपरेशनचा success rate साधारण 95% इतका आहे.

मूळव्याध ऑपरेशनचे फायदे काय आहेत..?

मूळव्याध ऑपरेशनमुळे मूळव्याधीचा त्रास पूर्णपणे कायमचा दूर होतो.

कॉपीराइट - डॉ. सतीश उपळकर
(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

हे सुद्धा वाचा..
मूळव्याध वरील आयुर्वेदिक प्रभावी उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.