केस पांढरे का व कशामुळे होतात..?
तरुण वयात केस पांढरे होण्याची समस्या अनेकांना आहे. मेलेनिनची कमतरता, अनुवंशिकता, चुकीचा आहार, धूळ-प्रदूषण, मानसिक ताणतणाव अशा अनेक कारणांमुळे केस वेळेपूर्वी पांढरे होऊ लागतात. येथे केस पांढरे का व कशामुळे होतात, अकाली केस पांढरे होण्याची कारणे काय आहेत व त्यावरील उपाय सांगितले आहेत.
लवकर केस पांढरे होण्याची कारणे (White hair reason in Marathi) :
मेलेनिन पिग्मेंटेशनच्या कमतरतेमुळे केसांचा रंग पांढरा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबरच शरीरातील मेलेनिनचं प्रमाण कमी होऊ लागते त्यामुळे केस पांढरे होतात. मेलेनिन हा असा घटक आहे की जो त्वचेचा आणि केसांचा रंग योग्य ठेवण्यास मदत करतो. पण वयानुसार मेलेनिनचं प्रमाण कमी झाल्याने केसांचा आणि त्वचेचा रंग बदलतो.
वयानुसार केस पांढरे होणे ही सामान्य बाब असते मात्र जर अगदी तिशी-पस्तीशीतच केस पांढरे होण्याच्या समस्या असल्यास त्याला अकाली केस पांढरे होणे असे म्हणतात.
अकाली केस पांढरे होण्यास अनेक घटक जबाबदार असतात यामध्ये जेनेटिक फॅक्टर, आनुवांशिक कारणे, हार्मोन्सचे असंतुलन, पोषकत्वाची कमतरता, अयोग्य आहार, धूळ व प्रदूषण, ताणतणाव, थायरॉईड प्रॉब्लेम आणि विविध केमिकलयुक्त सौंदर्य उत्पादनांचा चुकीचा वापर यासारख्या अनेक कारणामुळे केस पांढरे होत असतात.
केस पांढरे झाल्यास काय करावे..?
• पांढऱ्या केसांची समस्या असल्यास आवळा असलेल्या तेलाचा वापर करावा.
• केस धुण्यापूर्वी केसांना कोरफडीचा गर लावून मसाज करावा.
• कडीपत्ता तेलात उकळून ठेवावा. हे कडीपत्ता असलेले तेल केसांना दररोज लावल्यास पांढऱ्या केसांची समस्या दूर होते.
• लिंबू रस घातलेले खोबरेल तेल केसांना लावणेही पांढरे केसांवर उपयुक्त ठरते.
• भृंगराज किंवा माक्याचे तेल केसांसाठी वापरावे.
White hair problem reason information in Marathi