दर महिन्याला येणारी नियमित मासिक पाळी चुकणे हे गरोदरपणाचे पहिले लक्षण मानले जाते. गरोदर अवस्थेत हार्मोन्समध्ये बदल घडतात व नियमित येणारी मासिक पाळी थांबली जाते. त्यामुळे पाळी बंद होऊन महिन्याहून अधिक काळ झाल्यास गरोदर असण्याची शक्यता असू शकते.
संबंधानंतर स्त्री किती दिवसात गरोदर होऊ शकते..?
बर्थ कंट्रोल पिल्स म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या किंवा कंडोम, डायाफ्राम यांचा वापर न करता स्त्री आणि पुरुषामध्ये संबंध घडल्यास त्या स्त्रीमध्ये गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते. संबंधानंतर काही मिनिटांपासून ते 5 दिवसापर्यंत स्त्रीबीज आणि पुबीज यांचे मिलन होऊन फर्टिलाईजेशन होते. त्यानंतर 6 ते 15 दिवसांपर्यंत मिलनातून फर्टिलाईज झालेले अंडे हे गर्भाशयात रुजण्याची प्रक्रिया (Implantation) सुरू होते व तेंव्हा गर्भधारणा होऊन ती स्त्री गरोदर होते.
गर्भधारणा झाली की नाही हे किती दिवसात समजते..?
साधारणपणे संबंधानंतर 6 ते 15 दिवसांपर्यंत ती स्त्री गरोदर होऊ शकते. त्यामुळे गर्भधारणा झाली आहे की नाही हे संबंधानंतर 15 दिवसात समजू शकते. अशावेळी गर्भधारणा झाल्यावर काही लक्षणे जाणवू शकतात त्यावरून गरोदर आहे की नाही हे कळते.
गर्भधारणा झाली हे कसे समजते..?
सर्वसाधारणपणे गर्भारपणाच्या सुरुवातीला पुढील काही लक्षणे आढळू शकतात. त्यायोगे गरोदर असल्याचे कळू शकते.
1) मासिक पाळी न येणे,
2) स्तन दुखू लागणे, स्तन जड व सुजल्यासारखे वाटणे,
3) मळमळणे व उलट्या होणे,
4) थकवा व अशक्तपणा जाणवणे,
5) पोट फुगल्यासारखं किंवा गच्च वाटणे,
6) सारखे-सारखे लघवीला होणे,
7) अंग गरम झाल्यासारखे वाटणे,
8) चिडचिडेपणा वाढणे, मूड सतत बदलत राहणे.
पाळीच्या तारखेच्या एक आठवडाआधी स्तन जड वाटणे, थकवा येणे, मळमळ, वारंवार झोप येणे ही लक्षणे जाणवू शकतात. तर वारंवार लघवीला होणे हे लक्षण पाळीच्या तारखेच्या काही दिवस आधी सुरु होते.
तसेच यावेळी प्रेग्नन्सी टेस्ट करून गर्भधारणा झाली आहे की नाही ते कळू शकते. यासाठी घरच्याघरी प्रेग्नन्सी टेस्ट करता येते. औषधांच्या दुकानात ही टेस्ट करण्याचे ‘Pregnancy test Kit’ हे साहित्य सहज मिळू शकते. प्रेग्नन्सी टेस्टचा रिझल्ट अचूक येण्यासाठी ती टेस्ट योग्य वेळीचं करावी लागते. Pregnancy test कशी करावी याची माहिती जाणून घ्या..
गरोदर आहे की नाही हे समजण्यासाठी प्रेग्नन्सी टेस्ट कधी करावी..?
मासिक पाळी चुकल्यानंतर, एक आठवड्याने प्रेग्नन्सी टेस्ट केल्यास गरोदर आहे की नाही याचे अगदी खात्रीशीर निदान होते. आणि जर तुम्ही एवढा वेळ वाट पाहू इच्छित नसाल तर, संबंधानंतर एक ते दोन आठवड्यानी प्रेग्नन्सी टेस्ट करू शकता. मात्र त्याच्या रिझल्टची अचुकचा सांगता येणार नाही.
आणखी कोणत्या पद्धतीने प्रेग्नंट आहे की नाही ते समजते..?
प्रेग्नन्सी टेस्ट प्रमाणेच ब्लड टेस्ट करून रक्तातील हार्मोन्सचे प्रमाण (Serum BHCG) तपासून गरोदर आहे की नाही हे ओळखता येते. ही ब्लड टेस्टसुद्धा मासिक पाळी चुकल्यानंतर, एक आठवड्याने किंवा संबंधानंतर एक ते दोन आठवड्यानी करता येते. याशिवाय सोनोग्राफी तपासणी करूनही खात्रीशीररित्या गरोदर आहे की नाही ते समजू शकते.
हे सुध्दा वाचा –
गर्भधारणा झाल्यावर जाणवणारी लक्षणे
Last Medically Reviewed on February 18, 2024 By Dr. Satish Upalkar.
सविस्तर माहिती मिळाली Thanks
Thanks for your feedback
Maji pali chukun mahina join 15divs wr zhalet pn me pregnency text keli nahi mg me pregnent asushkte ka
Pregnancy test karun check kara
Nice informetion
Thanks