केस गळतीवर कांद्याचा वापर – केस गळण्याची समस्या असल्यास असा करा कांद्याचा वापर..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

केस गळतीवर कांद्याचा वापर :

केस गळण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी कांदा हा खूप उपयुक्त ठरतो. कांद्याच्या रसात सल्फरचे प्रमाण अधिक असते. यांमुळे टिश्यूतील कोलेजनच्या निर्मितीस मदत होऊन केसांची वाढ होते तसेच केस मजबूतही होतात. यासाठी केस गळतीवर घरगुती उपाय म्हणून कांदा हा खूप गुणकारी ठरतो.

केस गळतीवर घरगुती उपाय आणि कांदा :

केस गळतीवर कांद्याचा वापर कशाप्रकारे करावा याविषयी माहिती खाली दिली आहे. केसांच्या समस्येसाठी उपाय म्हणून कांदा वापरताना शक्यतो लाल कांदा वापरावा.

कांद्याचा रस..
केस गळती असल्यास कांद्याचा रस टाळूवर 10 ते 15 मिनिटांसाठी लावावा. अर्ध्या तासानंतर केस सौम्य शैम्पूने धुवावेत. यांमुळे केसांची मुळे बळकट होऊन केस गळण्याची समस्या दूर होते.

कांद्याची पेस्ट..
ग्राइंडरमधून कांद्याची पातळ पेस्ट तयार करून ती पेस्ट केसांना लावावी. अर्ध्या तासानंतर केस सौम्य शैम्पूने धुवावेत. आठवड्यातून दोनदा हा उपाय आपण करू शकता.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

कांदा आणि बीटरूट..
केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी व आपले केस मजबूत करण्यासाठी कांदा आणि बीट उपयोगी पडते. यासाठी, ग्राइंडरमध्ये कांदा आणि बीट बारीक करून त्याची पेस्ट बनवावी.

या मिश्रणात 2 चमचे मध किंवा दही घालावे व या सर्व मिश्रणाची जाड पेस्ट आपल्या संपूर्ण केसांवर आणि केसांच्या मुळाशी चांगल्या प्रकारे लावावी. अर्ध्या तासानंतर केस सौम्य शैम्पूने धुवावेत. असे केल्याने केस गळण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. बीट खाण्याचे फायदे वाचा..

कापलेला कांदा..
कांद्याचा रस काढणे किंवा पेस्ट बनवणे त्रासाचे वाटत असल्यास आपण केवळ कांदा कापूनही तो आपल्या टाळूवर चोळू शकता. ह्यामुळेही काही दिवसात आपले केस गळणे थांबेल.