Dr Satish Upalkar’s article about hair fall solutions in Marathi.
केस गळती होणे –
कमकुवत झालेले केस, हार्मोन्समधील बदल, योग्य आहाराचा अभाव, प्रदूषण किंवा हेअर प्रोडक्टचा अतिवापर अशा अनेक कारणांनी केस गळतीची समस्या होत असते. या लेखात केस गळतीवर कोणते घरगुती उपाय करावे याविषयी सांगितली आहे.
केस गळतीवरील घरगुती उपाय –
केसांच्या मुळांशी कांद्याचा रस लावून थोड्यावेळाने केस धुवावेत. यामुळे केसांची मुळे बळकट होऊन केस गळतीची समस्या कमी होते. याशिवाय रात्रभर पाण्यात भिजलेले मेथीचे बी बारीक वाटून त्याचा लेप केसांना लावून थोड्यावेळाने केस धुवावेत. हा उपयुक्त उपाय काही दिवस केल्यास केस गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच भृंगराज तेलाने केसांच्या मुळांशी मालिश केल्याने केस गळतीची समस्या दूर होते तसेच केस वाढण्यासही मदत होते. केस गळतीवर हे घरगुती उपाय तुम्ही करू शकता.
केस गळती होत असल्यास काय करावे..?
1) केसांच्या मुळांशी कांद्याचा रस लावा.
कांदा रसात सल्फरचे प्रमाण अधिक असते. यांमुळे टिश्यूतील कोलेजनच्या निर्मितीस मदत होऊन केसांची वाढ होते. यासाठी कांद्याचा रस केसांच्या मुळांशी 10 ते 15 मिनिटांसाठी लावावा. अर्ध्या तासानंतर केस सौम्य शैम्पूने धुवावेत. असे केल्याने केसांची मुळे बळकट होऊन केस गळतीची समस्या कमी होते.
2) केसांच्या मुळांशी कोरपड जेल लावा.
आठवड्यातून एकदा दोन चमचे एलोवेरा रस केसांच्या मुळांशी लावून मसाज करावा व अर्ध्या तासानंतर केस धुवावेत. यासाठी आपण ताज्या कोरपडीचा गरही वापरू शकता. यामुळेही केस गळतीची समस्या लवकर कमी होते.
3) भिजलेल्या मेथी बिया वाटून केसांना लावा.
रात्रभर पाण्यात भिजलेले मेथीचे बी बारीक वाटावे व त्याचा लेप केसांना लावून एक तासानंतर केस धुवावेत. हा उपयुक्त उपाय अनेक दिवस केल्यास केस गळतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. याशिवाय आहारात मेथी भाजीचा वापर करणेही केसांच्या गळतीवर लाभदायक ठरते. मेथीच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या..
4) जास्वंदाची फुले बारीक कुटून केसांना लावा.
जास्वंदाची फुले बारीक कुटून खोबरेल तेलात घालावीत. त्यानंतर हे तेल रात्री झोपण्यापूर्वी केसांना लावावे व सकाळी अंघोळ करताना केस धुवावेत. जास्वंद केसांना पोषण देतात व केस गळती दूर होते.
5) ऑलिव तेलाने केसांना मालिश करा.
केस गळतीवर ऑलिव तेलाने केसांना मालिश करणेही उपयोगी ठरते. यामुळे केसांच्या मुळात योग्य प्रकारे रक्ताभिसरण होण्यास मदत होते आणि केसांच्या मुळे अधिक मजबूत करते.
6) भृंगराज तेलाने केसांना मालिश करा.
भृंगराज तेलाने मालिश केल्याने केस गळतीची समस्या दूर होते तसेच केस वाढण्यासही मदत होते. भृंगराजमध्ये केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असणारे आयुर्वेदिक गुणधर्म असतात. म्हणूनच अनेक हेअर प्रोडक्टमध्ये भृंगराजचा वापर केला जातो.
हे सुध्दा वाचा – केसांच्या विविध समस्या व त्यावरील उपाय जाणून घ्या..
In this article information about hair fall solutions in Marathi language. This health article is written by Dr Satish Upalkar (Certified physician and Healthcare expert).