मेथीची भाजी खाण्याचे फायदे मराठी माहिती

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Health Benefits of Methi bhaji in Marathi, Fenugreek vegetables in Marathi, Methi chi bhaji in Marathi information.

मेथी भाजीतील पोषक घटक :

आरोग्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचे खूप महत्त्व आहे म्हणूनच डॉक्टर आपणास हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात पण आपण जेंव्हा मेथीची भाजी बघतो तेंव्हा मात्र अनेकजण नाके मुरडतात. मेथीची भाजी चवीला कडू असते पण मेथीच्या भाजीत अनेक उपयुक्त पोषकतत्वे असतात. मेथीच्या भाजीत असलेल्या अँन्टिऑक्सिडंट गुणधर्मामुळे कर्करोग, मधुमेह व उच्च रक्तदाब यांना प्रतिबंध होण्यास मदत होतो. 

शंभर ग्रॅम मेथीच्या भाजीत 4 ग्रॅम प्रथिने, 6 ग्रॅम कर्बोदके, 1ग्रॅम स्निग्ध पदार्थ, 0% कोलेस्टेरॉल, 1 ग्रॅम फायबर्स, 395 mg कॅल्शियम आणि 2 mg लोह हे पोषकघटक असतात आणि मेथीमध्ये ‘क’ आणि ‘के’ ही दोन्ही जीवनसत्त्वं मुबलक प्रमाणात असतात. 

मेथीच्या भाजीची इतर नावे :
शास्त्रीय नाव – Trigonella foenum-graecum
इंग्लिश नाव – Fenugreek Vegetable
हिंदी नाव – मेथी

मेथीच्या भाजीचे फायदे :

मेथीच्या भाजीचे आरोग्यासाठीचे फायदे खाली दिले आहेत.

हृदयाच्या आरोग्यासाठी हितकारी..
मेथीच्या भाजीत गॅलॉक्टोमेनिन हा हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारा घटक असतो. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मेथीची भाजी फायदेशीर ठरते. यासाठी ज्यांना हाय ब्लडप्रेशरची समस्या आहे त्यांनी कांदा घालून मेथीची भाजी आवर्जून खावी.

पचनक्रियेसाठी उपयुक्त..
मेथीमध्ये फायबर्स मोठ्या प्रमाणात असल्याने पोट नियमित साफ होण्यास मदत होते. तसेच मेथीच्या भाजीच्या सेवनाने भूक सुधारते, पचनक्रिया सुधारते. पोट साफ न होण्याची कारणे व उपाय वाचा..

कँसरला प्रतिबंध करते..
मेथीच्या भाजीतील अँन्टिऑक्सिडंट ह्या गुणधर्मामुळे स्तनांच्या आणि आतड्यांच्या कर्करोगाला मेथी प्रतिबंध करते.

मधुमेही रुग्णांसाठी उपयुक्त..
मधुमेहामध्ये आहारावर भरपूर लक्ष द्यावे लागते. मेथीची भाजी, मेथीचे दाणे हे मधुमेही रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त असतात. त्यामुळे ज्यांना डायबेटीसची समस्या आहे त्यांनी मेथीची भाजी आवर्जून खावी. मधुमेहाविषयी अधिक माहिती जाणून घ्या..

हिमोग्लोबिन वाढवते..
मेथीच्या भाजीत लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यानी ही भाजी आहारात घ्यावी. रक्तल्पता किंवा ऍनिमिया आजारात ह्या भाजीचे सेवन करावे.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

गरोदर स्त्रियांना आणि बाळंतिणींसाठी उपयुक्त..
गरोदर व स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होते. आहारात मेथीच्या भाजीचा वापर केल्याने शरीराला पुरेसे लोह मिळते.
मेथीमध्ये असलेल्या डायोस्जेनिन या घटकामुळे आईच्या दूधाच्या प्रमाणात वाढ होते. त्यामुळे बाळंतिणींना मेथीची भाजी खाण्याचा सल्ला देण्यात येतो. मेथीच्या भाजीमुळे बाळंतिणींना जास्त दूध येण्यास मदत होते म्हणून बाळंतिणीला मेथीची लसूण आणि ओलं खोबरं घातलेली भाजी मुद्दाम देतात. 

सर्वच वयोगटातील स्त्रियांना उपयुक्त..
मेथीच्या भाजीतील डायोस्जेनिन, आयसॉफ्लॅवेन्स, अॅस्टोजिन या घटकांमुळे मासिक पाळीमध्ये आराम मिळतो. मासिक पाळीच्या काळामध्ये तसेच गरोदर व स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये लोहाची कमतरता निर्माण होते. आहारात मेथीच्या भाजीचा वापर केल्याने शरीराला पुरेसे लोह मिळते. त्याचप्रमाणे मेथीमधील उपयुक्त घटकांमुळे मॅनोपॉजमध्ये होणाऱ्या मूड बदलणे व उष्णतेच्या समस्येमध्ये देखील आराम मिळतो.

Benefits of Methi in Marathi, Fenugreek vegetable & Its Side Effects in Marathi,