अंबाडीची भाजी खाण्याचे फायदे मराठी माहिती

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

Ambada bhaji in Marathi, Health Benefits of Ambadi in Marathi, Ambaada or Gongura Leaves in Marathi.

अंबाडा भाजीतील पोषक घटक :

आंबट चवीची अंबाडीची भाजी ही चविष्ट तर असतेच शिवाय अनेक पोषकतत्त्वांनीही परिपूर्ण असते. अंबाड्याच्या भाजीत आयर्न (लोह), व्हिटॅमिन-C, व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-B6, folate, कॅल्शियम, झिंक आणि अँटीऑक्सिडंट यासारखे अनेक पोषकतत्वे भरपूर प्रमाणात असतात.

अंबाडीच्या भाजीची इतर नावे :
शास्त्रीय नाव – Hibiscus cannabinus
इंग्लिश नाव – Gongura Leaves
हिंदी नाव – गोंगुरा के पत्ते

अंबाडीच्या भाजीचे फायदे :

अंबाडीच्या भाजीचे आरोग्यासाठीचे फायदे खाली दिले आहेत.

रक्तदाब नियंत्रित ठेवते..
अंबाडीची भाजी वाढलेला रक्तदाब कमी करून नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. अंबाडा भाजीत अँटीऑक्सिडंट्स मोठया प्रमाणात असतात त्यामुळे वाईट कोलेस्टेरॉल कमी होते व रक्तदाब नियंत्रित होतो. हाय ब्लडप्रेशरची माहिती वाचा..

वजन कमी करते..
अंबाडी हा लो कॅलरीज डायट असून अनेक पोषकतत्वे, व्हिटॅमिन, फायबर्स यामध्ये असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आहारात या भाजीचा समावेश करू शकता.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी..
अंबाड्याच्या भाजीत व्हिटॅमिन-A, आयर्न, झिंक मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी ही भाजी उपयुक्त असते.

केसांच्या आरोग्यासाठी..
अंबाड्याच्या भाजीत अनेक पोषकघटक, व्हिटॅमिन आणि प्रोटीन मुबलक असते त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असून केस गळणे, तुटणे या समस्या कमी होतात.

हाडांच्या मजबुतीसाठी..
अंबाड्याच्या भाजीत हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असणारा कॅल्शिअम हा घटक भरपूर असतो. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस यासारख्या आजाराला दूर ठेवते. येथे क्लिक करा व जाणून घ्या ऑस्टिओपोरोसिस या आजाराची माहिती..

हिमोग्लोबिन वाढवते..
या भाजीत लोहाचे प्रमाण जास्त असल्याने हिमोग्लोबिन कमी असणाऱ्यानी ही भाजी आहारात घ्यावी. रक्तल्पता किंवा ऍनिमिया आजारात ह्या भाजीचे सेवन करावे.

लघवीच्या तक्रारी दूर करते..
अंबाडा हा diuretic गुणांचा असल्याने लघवीला जळजळ होणे, उन्हाळे लागणे यावर ही भाजी उपयुक्त ठरते.

अंबाडीची भाजी कोणी ही भाजी खाऊ नये किंवा अंबाड्याची भाजी खाण्याचे नुकसान :
अंबाड्याच्या भाजीत Oxalic Acid चे प्रमाण जास्त असते त्यामुळे जास्त प्रमाणात हा घटक शरीरात गेल्यास किडनी स्टोन (मुतखडा) होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असल्यास अंबाडीची भाजी खाऊ नका.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

अंबाडीची भाजी खाल्यामुळे पोटातील आम्लाचे प्रमाण वाढून छातीत जळजळ होणे, आंबट ढेकर येणे, ऍसिडिटी होणे, पित्ताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पित्ताचा त्रास, त्वचारोग आणि अल्सर असणाऱ्यांनी ही भाजी खाणे टाळावे. गरोदरपणातही स्त्रियांनी ही भाजी खाणे टाळावे.

अंबाडीची भाजी करताना कोणती काळजी घ्यावी..?
अंबाडीची भाजी ही तांब्याची भांडी, बीडाची भांडी (ओतीव लोखंड – कास्ट आयर्न) किंवा अल्युमिनियमची भांडी यामध्ये करू नये कारण अंबाड्याच्या भाजीत Oxalic Acid चे प्रमाण जास्त असते त्यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन अपायकारक घटक तयार होत असतो. यासाठी ही भाजी नॉनस्टिक भांडी किंवा स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात करावी.

Ambada Nutritional contents in Marathi, Gongura Leaves in Marathi information.