पावसाळा आणि केसांचे आरोग्य :

पावसाळ्यात केस वारंवार भिजण्याची शक्यता असते. पावसाच्या ओलसर हवामानात केस अधिक काळ भिजलेले राहिल्यास त्यात फंगल आणि बॅक्टेरिअल इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात केसांची योग्य निगा ठेवणे गरजेचे असते.

पावसाळ्यातील केसांची अशी घ्यावी काळजी :

केस ओलसर ठेऊ नका..
पावसाच्या पाण्यात केस भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि केस भिजले तरी लगेच कोमट पाण्याने धुऊन घ्यावेत. कारण पावसाच्या पाण्यामुळे केसात बॅक्टेरिया किंवा फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.

तसेच पावसाळ्यात केस ओले असताना ते बांधून ठेवू नयेत. ओले केस बांधलेले असल्यास केसात फंगल इन्फेक्शन होऊन डोक्यात खाज येऊ शकते. त्यामुळे ओले केस असल्यास ते कोरडे करून मगच बांधावे.

हेअर स्टाईलिंग प्रोडक्ट कमी वापरावे..
इतरवेळी आपण वेगवेगळ्या हेअर स्टाइल करण्यासाठी आपण हेअर स्प्रे, हेअर जेलचा वापर करतो. मात्र पावसाळ्यात हेअर स्टाईलिंग प्रोडक्टचा वापर करणे टाळावे. कारण यामध्ये केमिकल्स भरपूर असतात. त्यांचा वापर केल्यास आद्रतेमुळे केस चिपचिपित होतात.

यासाठी पावसाळ्यात साधारण हेअरस्टाईल योग्य ठरते. याशिवाय आपण Anti Humidity Hair gel वापरू शकता. तसेच पावसाळ्यात हेअर ड्रायरचा वापर करणे, हेअर स्ट्रेटनिंग करणे किंवा वारंवार आयर्निग करणेही टाळावे.

केमिकल-फ्री शॅम्पू करावा..
पावसाळ्यात वातावरणातील ओलावा, आद्र्रतेमुळे केस तेलकट आणि चिकट होतात यासाठी आठवड्यातून दोनदा केस धुण्यासाठी हर्बल शॅम्पू वापरावा. रुक्ष-कोरडे केस असल्यास माईल्ड क्रीमयुक्त शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करावा.

केसात कोंडा होत असल्यास..
मान्सून सिझनमध्ये केसात कोंडा होण्याची समस्या अधिक होऊ शकते. पावसाळ्यात केसात कोंडा होत असल्यास अँटी डॅन्ड्रफ शाम्पू वापरावा. यामुळे केस मऊ राहतात कोंडाही नाहीसा होतो. किंवा रात्रभर भिजलेल्या मेथीच्या बिया बारीक वाटून त्याची पातळ पेस्ट करावी. ह्या पेस्टमध्ये थोडे विटामिन-E युक्त तेल घालून हे मिश्रण केसांना लावावे यामुळे केसातील कोंडा होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

तेलकट व चिकट केसांसाठी..
पावसात केस तेलकट व चिकट होत असल्यास एका लिंबाचा रस काढून तो आपल्या केसांना 15 मिनिटे लावावा व त्यांनतर केस धुवावेत. यामुळे पावसाळ्यात केस तेलकट आणि चिकट होत नाहीत.

केस हळुवार विंचरा..
पावसाळ्यात केस कंगव्याने विंचरताना खूप काळजी घ्यावी यासाठी मोठ्या दाताच्या कंगव्याने हळुवारपणे केस विंचरावे. जेणेकरून जास्त केस तुटणार नाही.

तेल मालिश..
पावसाच्या दिवसामध्ये केसांना आठवड्यातून एक किंवा दोनवेळा खोबरेल तेल लावून मसाज करावा. यामुळे केसांचे पोषण होण्यास मदत होते व केसांतील कोरडेपणाही जातो.

योग्य आहार घ्या..
पावसाळ्यात केसांसाठी उपयुक्त असणारा व्हिटॅमिन-E युक्त आहार आहार घ्या. आहारात विविध कडधान्ये, फळभाज्या, बदाम, अंडी यांचा समावेश असावा. पावसाळ्यातील दिवसात कोणता आहार घ्यावा ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...