पांढरे केस काळे करणे यावर सोपे उपाय :

आजच्या धावपळ आणि तणावाच्या जीवनात केस वेळेपूर्वी पांढरे होण्याची समस्या अनेकांना असते. पांढर्‍या केसांनी व्यक्तीचे सौंदर्य खराब होत असते. यासाठी, ते उपाय म्हणून बरेच महागडे हेअर डाय, कलर, शैम्पू वापरून पाहतात. पण म्हणावा तसा त्यांचा उपयोग होत नाही. यासाठी येथे पांढरे केस काळे करण्याचे सोपे उपाय सांगितले आहेत.

केस पांढरे होण्यामागे अनेक कारणे जबाबदार असतात. मेलेनिनची कमतरता, अनुवंशिकता, अयोग्य आहार, आहारातील व्हिटॅमिन बी -12 ची कमतरता, थायरॉईड ग्रंथीतील समस्या आणि प्रदूषण अशा विविध कारणांमुळे केस अकाली पांढरे होत असतात. 

पांढरे केस काळे करण्यासाठी हे करा उपाय..

कडीपत्ता –
कडीपत्ता खोबऱ्याच्या तेलात टाकून उकळून घ्यावे व हे तयार केलेले तेल रोज काही दिवस आपल्या केसांना लावून मसाज करावा. या उपायामुळे पांढरे केस काळे करण्यासाठी मदत होते.

भृंगराज –
भृंगराजपासून बनवलेले तेल आपण दररोज केसांना लावल्यास केस पांढरे होण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

चहापावडर –
पांढरे केस काळे करण्यासाठी चहाची पावडर फायदेशीर ठरते. यासाठी चहा, कॉफी किंवा ब्लॅक टीच्या चोथ्याने पांढरे झालेले केस धुवावेत.

कांदा –
कांद्याची बारीक पेस्ट करुन त्यात लिंबू रस घालावा. ही घट्ट पेस्ट केसांना लावावी. त्यानंतर अर्ध्या तासाने केस धुवावेत. पांढरे केस काळे करण्यासाठी हा उपायही उपयोगी आहे.

आवळा –
आवळा पावडरमध्ये लिंबू रस मिसळून ते मिश्रण केसांना लावावे. तसेच आवळा असलेल्या तेलाने केसांना दररोज रात्री मालिश करावी.

कोरफड –
कोरफडीचा गर काढून त्यामध्ये लिंबू पिळून ते मिश्रण केसांना लावावे. काही वेळानंतर केस धुवून टाकावेत. पांढरे केस काळे करण्याचा हा उपायही उपयोगी आहे.

Marathi tips for white hair problem solution.

Written by - डॉ. सतीश उपळकर
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत.

आरोग्याचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटन क्लिक करा व आमचे YouTube चॅनल Subscribe करा.


सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.