आमवात – Rheumatoid arthritis :
आमवात या आजारात सांध्यांमध्ये सूज येते, सांधे जखडतात आणि त्याठिकाणी अतिशय वेदना होत असते. आमवाताला Rheumatoid arthritis ह्या नावानेही ओळखले जाते. आमवात हा ऑटोइम्यून आजार असून यात आपलीचं इम्यून सिस्टीम आपल्याच ऊतींवर हल्ला करण्यास सुरवात करते. आमवाताचा परिणाम केवळ सांधेच नाही तर शरीराच्या अनेक अवयवांवरही होत असतो.
आमवातमध्ये योग्य आहार घेणे आवश्यक असते. यासाठी येथे आमवातमध्ये कोणता आहार घ्यावा, आमवात असल्यास काय खावे, काय खाऊ नये याविषयी माहिती दिली आहे.
आमवात आणि आहार पथ्य :
आमवातमध्ये सहज पचणारा पौष्टिक आहार घ्यावा. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे यांचा समावेश असावा. प्रामुख्याने तांदूळ, गहू, कुळीथ, जवस, कारले, शेवगा, पडवळ, बीट, लसूण, आले, सुंठ, हळद, बोर, डाळिंब, तूप, दूध, मनुका, बदाम, अक्रोड, सैंधव मीठ, एरंडेल तेल, कोमट पाणी इत्यादी आहारात असावेत. तसेच थोड्या प्रमाणात मांसाहार करू शकता.
आमवात रुग्णांनी काय खाऊ नये..?
पचण्यास जड असणारे पदार्थ म्हणजे हरबरा, मटार, बटाटा खाणे टाळावे. फास्टफूड, खारट पदार्थ, तेलकट पदार्थ, मैद्याचे पदार्थ, थंडगार पदार्थ खाणे टाळावे. फ्रिजमधील थंडगार पाणी, कोल्ड्रिंक्स पिणे टाळावे. तसेच सिगारेट, धूम्रपान, तंबाखू, मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहावे.
आमवाताचा त्रास हा दिवसेंदिवस वाढतच असतो. यासाठी योग्य आयुर्वेदिक औषधे, योग्य आहार आणि व्यायाम याद्वारे आमवात आटोक्यात ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे आमवात झाल्यावर अशाप्रकारे आयुर्वेदिक आहार पथ्य सांभाळणे गरजेचे असते. आमवात विषयी अधिक माहिती आणि त्यावरील योग्य उपचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
Rheumatoid arthritis diet chart in Marathi language. Article written by Dr. Satish Upalkar.