गरोदरपणात सोनोग्राफी तपासणी कधी करावी लागते याविषयी जाणून घ्या..

Medical Author – डॉ. सतीश उपळकर
© हेल्थ मराठी डॉट कॉम

गरोदरपणात सोनोग्राफी तपासणी :

प्रेग्नन्सीमध्ये अल्ट्रासाऊंड सोनोग्राफी तपासणीचे खूप महत्त्व असते. सोनोग्राफीमुळे गर्भाची होणारी वाढ आणि हालचाल आपण पाहू शकतो. याशिवाय गर्भात असलेले दोष यांचे ज्ञानही सोनोग्राफी तपासणीतून होण्यास मदत होऊ शकते. याबरोबरच ज्या गरोदर स्त्रियांमध्ये गर्भपात होण्याचा जास्त धोका असतो त्या स्त्रियांमध्ये सोनोग्राफीच्या आधारेच उपचार ठरवले जातात.

प्रेग्नन्सीच्या नऊ महिन्यांच्या काळात साधारणपणे चार ते पाच वेळा सोनोग्राफी केली जाते. तर गर्भावस्थेत काही समस्या निर्माण झाल्यास यापेक्षाही जास्त वेळा सोनोग्राफी करावी लागू शकते. गरोदरपणात सोनोग्राफी तपासणी किती वेळा करणे आवश्यक असते, गरोदरपणात सोनोग्राफी कधी करावी याविषयी माहिती खाली दिली आहे.

गरोदरपणात सोनोग्राफी कधी करावी..?

पहिली सोनोग्राफी –
6 ते 10 आठवड्यांदरम्यान (म्हणजे दीड ते दुसऱ्या महिन्यात) करतात. याला डेटिंग स्कॅन असेही म्हणतात.

दुसरी सोनोग्राफी –
11 ते 14 व्या आठवड्यांदरम्यान (म्हणजे तिसऱ्या ते चौथ्या महिन्यात) करतात. याला न्यूकल ट्रान्सलुसेन्सी स्कॅन (NT स्कॅन) असेही म्हणतात.

प्रत्येक गरोदर स्त्रीस उपयुक्त असे 'प्रेग्नन्सी मराठी' हे पुस्तक आजच डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

तिसरी सोनोग्राफी –
18 ते 22 व्या आठवड्यांदरम्यान (म्हणजे चौथ्या ते पाचव्या महिन्यात) करतात. याला टार्गेटेड सोनोग्राफी किंवा एनॉमली स्कॅन असेही म्हणतात.

चौथी सोनोग्राफी –
21 ते 32 व्या आठवड्यांदरम्यान (म्हणजे सातव्या ते आठव्या महिन्यात) करतात. याला ग्रोथ स्कॅन असेही म्हणतात.

पाचवी सोनोग्राफी –
36 ते 40 आठवड्यांदरम्यान (म्हणजे शेवटच्या महिन्यात) करतात. याला कलर डॉपलर स्कॅन असे म्हणतात.

(ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये. तसेच Youtube video बनवू नये. कॉपीराईट सूचना वाचा..)

अधिकवेळा सोनोग्राफी केंव्हा करावी लागू शकते..?

• मातेचे वय 35 वर्षापेक्षा जास्त असल्यास,
• जुळी बालके होणार असल्यास,
• गर्भाची अपेक्षित वाढ झालेली नसल्यास,
• गर्भजल कमी असल्यास,
• ऐजिंग प्लेसेंटा किंवा नाळेला रक्तपुरवठा कमी होत असल्यास,
• गर्भवतीला उच्च रक्तदाब किंवा मधुमेह समस्या असल्यास अधिकवेळा सोनोग्राफी करावी लागू शकते.

How many times sonography should be done in pregnancy marathi information.