पनीर – Cottage Cheese Or Paneer :
पनीर हा एक दुग्धजन्य पदार्थ आहे. आपल्या आहारातील अनेक पदार्थांत आपण पनीरचा वापर करतो. पनीर हे स्वादिष्ट तर आहेच शिवाय ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. पनीरमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन्स आणि इतरही अनेक पोषकघटक असतात. इतर दुग्धजन्य पदार्थांच्या तुलनेने कमी कॅलरीज पनीरमध्ये असतात. तसेच पनीरमध्ये व्हिटॅमिन-B, कॅल्शियम, फॉस्फरस आणि सेलेनियम अशी अनेक पोषकघटक असतात.
पनीर खाण्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते. पनीरमध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने असल्याने मांसपेशी व हाडे मजबूत होतात. डायबेटिसला दूर ठेवण्यास पनीर उपयोगी पडते.
पनीर खाण्याचे आरोग्यदायी 5 फायदे :
1) पनीर वजन कमी करते ..
पनीरमध्ये कमी कॅलरीज व जास्त प्रोटीन्स असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पनीरचा आहारातील वापर खूप उपयोगी ठरतो. कारण भरपूर प्रमाणात असणाऱ्या प्रोटीन्समुळे पोट लवकर भरल्यासारखे वाटते व पर्यायाने भूकही कमी होते. याचा परिणाम वजन कमी होण्यासाठी होतो.
2) पनीर खाल्याने मसल्स वाढतात ..
पनीर खाण्यामुळे शरीराच्या मसल्स म्हणजे मांसपेशी मजबूत होतात. कारण पनीरमध्ये मुबलक प्रमाणात केसिन प्रकारचे प्रोटीन (casein protein) असते. पनीरच्या आहारातील वापराने muscle (मांसपेशी) वाढतात. स्नायू बळकट होतात, शरीर मजबूत व पिळदार बनते. शारीरिक ताकद वाढते. म्हणूनच अनेक खेळाडू आपल्या डायट प्लॅनमध्ये पनीरचा आवर्जून समावेश करतात.
3) पनीर खाणे डायबेटिसमध्ये उपयुक्त असते ..
पनीरसह इतर दुग्धजन्य पदार्थांतील कॅल्शियममुळे insulin resistance चा धोका 21 टक्क्यांनी कमी होतो. पर्यायाने पनीर खाण्यामुळे डायबेटिस होण्यापासून आपले रक्षण होते. Insulin resistance मुळे टाईप 2 प्रकारचा मधुमेह व हृदयविकार होत असतात. तसेच पनीर खाण्यामुळे रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते. त्यामुळे फॅट कमी असणारे पनीर हे मधुमेहात उपयुक्त असते.
4) पनीर हाडांच्या आरोग्यसाठी फायदेशीर असते ..
पनीरमध्ये हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे कॅल्शियम, फॉस्फरस आणि प्रोटीन्स हे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पनीर खाण्यामुळे आपली हाडे मजबूत व बळकट होण्यास मदत होते.
5) पनीर गरोदरपणात उपयुक्त असते ..
पनीरमध्ये फोलेटचे चांगले प्रमाण असल्याने गरोदर स्त्रियांसाठी पनीर हे फायदेशीर असते. कारण फोलेट हा घटक गर्भाच्या विकासासाठी महत्त्वाचा असतो. तसेच फोलेटमुळे गरोदर स्त्रीच्या शरिरात रक्त वाढण्यास मदत होते. गरोदरपणात काय खावे याची माहिती जाणून घ्या.
कोणत्या प्रकारचे पनीर खावे ..?
बाजारात विविध प्रकारचे पनीर उपलब्ध असतात. कारण फॅटयुक्त दूध तसेच कमी फॅटचे दूधसुध्दा वापरून पनीर केले जात असते. तसेच लैक्टोज-फ्री, सोडियम युक्त किंवा सोडियम-फ्री ह्या प्रकारचेही पनीर उपलब्ध असते. त्यामुळे पनीरचे वेगवेगळे प्रकार असतात. आरोग्यासाठी कमी क्रीमचे (whipped) पनीर व सोडियम-फ्री पनीर फायदेशीर असते.
पनीर खाण्याचे नुकसान (Paneer side effects) :
काही व्यक्तींना पनीर खाणे हे नुकसानदायक ठरू शकते. विशेषतः दुध व दुग्धजन्य पदार्थांची एलर्जी (Lactose intolerance) असणाऱ्या व्यक्तींनी पनीर खाणे टाळले पाहिजे. अशा व्यक्तींमध्ये पनीर खाण्यामुळे पोट बिघडू शकते. त्यांना पोटदुखी, ढेकर, गॅसेस किंवा अतिसार इत्यादी दुष्परिणाम होऊ शकतात. पनीर खाण्यामुळे हे तोटे होऊ शकतात.
पनीर कोणी खाऊ नये ..?
दुध व दुग्धजन्य पदार्थांची एलर्जी (Lactose intolerance) असणाऱ्या व्यक्तींनी पनीर खाणे टाळले पाहिजे. याशिवाय सर्वांनी जास्त फॅटयुक्त व सोडियम असणारे पनीर खाणे टाळावे. जास्त फॅट असणारे व सोडियम असणारे पनीर खाण्यामुळे रक्तदाब, रक्तातील कोेस्टेरॉल व वजन वाढण्याची शक्यता असते. यामुळे हृदयविकार, डायबेटिस, पक्षाघात यासारख्या अनेक समस्या होण्याचा धोका वाढतो. यासाठी फॅट व सोडियम नसणारे पनीर खाण्यासाठी वापरावे.
पनीरमधील पोषकघटक (Paneer Nutrition contents) :
पनीरमध्ये अनेक उपयुक्त पोषकतत्वे, प्रोटीन, खनिजे व व्हिटॅमिन्स असतात. एक कप म्हणजे साधारण 226 gm पनीरमधील पोषकघटक पुढीलप्रमाणे आहेत.
- कॅलरीज – 163
- प्रोटीन – 28 ग्रॅम
- फॅट – 2.3 ग्रॅम
- कॅल्शिअम – 11% of RDA
- व्हिटॅमिन B12 – 59% of RDA
- रिबोफ्लेविन – 29% of RDA
- सेलेनियम – 37% of RDA
- फोलेट – 7% of RDA
- फॉस्फरस – 24% of RDA
हे सुद्धा वाचा..
Read Marathi language article about Benefits and Side effects of Cottage Cheese Or Paneer. Last Medically Reviewed on February 29, 2024 By Dr. Satish Upalkar.