Dr Satish Upalkar’s article about Milk Cream health benefits in Marathi.

दुधाची साय खाण्याचे फायदे व तोटे यांची माहिती

दुधाची साय – Milk Cream :

दूध उकळल्यानंतर त्यावर साय येत असते. ही दुधाची साय अनेकजणांना खायायला आवडते. यामध्ये अनेक पोषकघटक असतात. दुधाची साय ही स्वादिष्ट व पौष्टीक असते. असे असले तरीही योग्य प्रमाणातच साय खाणे आवश्यक आहे. यासाठी या लेखात डॉ सतीश उपळकर यांनी साय खाण्याचे फायदे व नुकसान याविषयी माहिती दिली आहे.

दुधाच्या सायमधील पोषकतत्वे –

दुधाच्या सायमध्ये कॅलरीज, प्रथिने, फॅट, कॅल्शियम, आयरन, फॉस्फरस आणि लैक्टोज भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय व्हिटॅमिन A, D, E व K ह्या जीवनसत्त्वांचे प्रमाणही दुधाच्या सायीत चांगले असते.

दुधाची साय खाण्याचे फायदे :

दुधाची साय ही डोळे, त्वचा, केस व नखांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, हाडे बळकट होतात तसेच मोतीबिंदू, काचबिंदू व अल्झायमरसारख्या आजारापासून दूर राहण्यास मदत होते. हे सर्व फायदे दुधाची साय खाण्यामुळे होतात.

1) डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त –

दुधाच्या सायमध्ये व्हिटॅमिन-A चे मुबलक प्रमाण असल्याने डोळ्यांसाठी दुधाची साय फायदेशीर आहे. यामुळे डोळ्यांमधील नैसर्गिक ओलावा राखण्यास मदत होते तसेच मोतीबिंदू, काचबिंदू (ग्लूकोमा) यासारख्या रोगांपासून दूर राहण्यास प्रभावी ठरते. [1]

2) मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर –

दुधाच्या सायमध्ये व्हिटॅमिन-बी12, व्हिटॅमिन-बी5 व फॉस्फरस या घटकांचे चांगले प्रमाण असते. हे पोषकघटक मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. यामुळे अल्झायमरसारख्या आजारापासून दूर राहण्यास मदत होते.

3) हाडे मजबूत होतात –

दुधाच्या सायमध्ये हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन-D, कॅल्शिअम आणि
फॉस्फरस हे पोषकघटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे आपली हाडे मजबूत व बळकट होतात. याशिवाय, हिरड्या आणि दात देखील निरोगी राहण्यास यामुळे मदत होते. [2]

4) व्हिटॅमिन बी12 मिळते –

इतर दुग्धजन्य पदार्थांप्रमाणेच सायमध्येही व्हिटॅमिन-बी12 चे प्रमाणही अधिक आहे. शरीरातील उतींच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन-बी12 चे महत्वाचे कार्य असते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते तसेच त्वचा, केस व नखे यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

5) मानसिक तणाव कमी होतो –

मानसिक तणाव दूर करण्यासाठी आवश्यक ठरणारे व्हिटॅमिन-बी5 देखील सायमध्ये पुरेशा प्रमाणात असते. यामुळे साय खाण्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होऊ शकते.

6) त्वचेसाठी उपयुक्त –

दुधात असणाऱ्या लैक्टिक ऍसिड आणि अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड हे घटक त्वचेसाठी फायदेशीर असतात. अनेक कॉस्मेटिक क्रीममध्ये हेच घटक वापरले जातात. त्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवर दुधाची साय लावल्याने चेहरा तजेलदार व सुंदर होण्यासाठी मदत होते. [3]

दररोज किती चमचे दुधाची साय खावी..?

दररोज दुधाची साय खाण्यापेक्षा कधीतरीचं ती खाणे अधिक योग्य आहे. तसेच एका दिवसात एक चमचापेक्षा अधिक दुधाची साय खाऊ नका.

दुधाची साय कोणी खाऊ नये..?

सायमध्ये सैचुरेटेड फॅट्सचे प्रमाण अधिक आढळते. सैचुरेटेड फॅट्समुळे लठ्ठपणा व रक्तातील वाईट असे LDL प्रकारचे कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हार्ट डिसिज, हाय ब्लडप्रेशर, डायबेटिस, हाय कोलेस्टेरॉल, पक्षाघात, लठ्ठपणा यासारख्या समस्येने त्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी दुधाची साय खाणे टाळले पाहिजे. तसेच ज्यांना दुधाची एलर्जी आहे त्यांनीही दुधाची साय खाणे टाळले पाहिजे. [4]

साय खाण्याचे नुकसान – Milk Cream Side effects in Marathi :

सायमध्ये सैचुरेटेड फॅट्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे दुधाची साय अधिक प्रमाणात खाण्यामुळे रक्तातील वाईट असे LDL प्रकारचे कोलेस्टेरॉल वाढण्याची शक्यता असते. LDL कोलेस्टेरॉलमुळे हृदयाचे विकार, हार्ट अटॅक, हाय ब्लडप्रेशर, पक्षाघात यासारख्या गंभीर समस्या होतात. तसेच दुधाची साय अधिक खाण्यामुळे लठ्ठपणाची समस्याही निर्माण होऊ शकते. हे सर्व तोटे दुधाची साय अधिक खाण्यामुळे होतात.

हे सुद्धा वाचा..

© लेखक - डॉ. सतीश उपळकर
(महत्वाची सूचना - ह्या साईटवरील माहिती कॉपी पेस्ट करू नये.)

Information about Benefits and Side effects of Milk Cream in Marathi language. Article written by Dr. Satish Upalkar.