डोळ्याचा गंभीर विकार काचबिंदू अर्थात ग्लूकोमा (Glaucoma)

3130
views

Glaucoma in Marathi information, Glaucoma Symptoms, Causes Diagnosis, Treatment in Marathi, Kachbindu Netrarog Marathi, Eye diseases in Marathi,

आज अकाली अंधत्व येण्याचे ग्लूकोमा हा विकार एक प्रमुख कारण बनत आहे. अनुवंशिकता, मधुमेह आणि स्टिरॉइड औषधांचा वाढता वापर यामुळे ग्लूकोमा (काचबिंदू) या आजाराचं प्रमाण वाढत आहे. या आजारात एकदा गेलेली दृष्टी पुन्हा येत नाही. मात्र वेळीच तपासणी आणि योग्य उपचार करून शिल्लक राहिलेल्या दृष्टीवर परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात.

या आजारात डोळ्यांतील दाब वाढतो. सामान्यत: डोळ्यांतील दाब हा 10 ते 20 मीमी ऑफ मॅक्युरी इतका असतो. काचिबदू झालेल्या डोळयात तो 20च्या वर आणि 40 ते 60 पर्यंतही जाऊ शकतो. दृष्टीची संवेदना मेंदूकडे नेणारी Optic Nerve अशा दाबामुळे प्रभावित होते. यावर वेळेवर उपचार होऊ न शकल्यास अंधत्व येतं.

काचबिंदू होण्याचा धोका कोणाला..?
काचबिंदू कोणालाही होऊ शकतो. मात्र तो होण्यातही आनुवंशिकतेचा मुद्दासुध्दा प्रमुख आहे. एखाद्याच्या कुटुंबात आई-वडिलांना, आजी-आजोबांना किंवा भावाबहिणीला काचबिंदू असल्यास त्यालाही काचबिंदू होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच त्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असते. ठरावीक कालावधीनंतर डोळ्यांच्या आवश्यक त्या चाचण्या करून घेण्याची गरज असते.

काचबिंदू आणि मोतीबिंदू यांतील फरक :
काचबिंदू झाल्याचं वेळेवर लक्षात आलं नाही तर त्यामुळे येणारं अंधत्व स्वीकारण्यावाचून आपल्याला पर्याय राहात नाही. हा काचबिंदूतला सर्वात मोठा धोका आहे. तसंच हाच तर काचबिंदू आणि मोतीबिंदू यातला मूलभूत फरक आहे. मोतीबिंदूवर उपचार केल्यानंतर, त्यासाठीचं ऑपरेशन केल्यानंतर आपली दृष्टी जवळजवळ 100 टक्के पूर्ववत होते. पण काचबिंदूमध्ये 5 टक्के जरी दृष्टी कमी झाली तरी त्यावर काही उपाय करता येत नाही.

डोळ्यांची तपासणी वेळेवर करणे गरजेचे का आहे..?
90 टक्के रुग्णांना काचबिंदू झाल्याचं वेळेवर लक्षातच येत नाही, आणि हे असे रुग्ण निम्न आर्थिक स्तरातले किंवा अल्पशिक्षितच असतात असं नाही; तर अगदी उच्चशिक्षितानाही आपल्याला काचबिंदू झाल्याचं लक्षात येत नाही आणि जेव्हा कळतं तेव्हा बहुतेक वेळा उशीर झालेला असतो. रक्ताच्या प्रवाहाचे जे आजार असतात म्हणजे मधुमेह (डायबेटिस), रक्तदाब (ब्लडप्रेशर) यांसारखे आजार असणा-यांनी डोळ्यांची तपासणी वेळेवर करावी.

कधीकधी प्रेशर नॉर्मल असतं; पण डोळ्यांची आतली नस तपासली असता काचबिंदूची चिन्हं दिसतात. त्यावरून संभाव्य काचबिंदू लक्षात येऊ शकतो. या चाचण्यांमधून अगदी तिशी-चाळिशीच्या उंबरठयावर असलेल्या रुग्णांनाही काचबिंदू होण्याची शक्यता असेल तर वेळेत निदान करता येतं. आणि पुढचा धोका टाळता येतो.

फक्त काचबिंदूसाठी नाही तर डोळ्यांची तपासणी प्रत्येक दोन वर्षानी करावी. एकदा काचबिंदूचा आजार होऊन डोळे वाचलेल्यांनी दर सहा महिन्यांनी डोळ्यांचे प्रेशर तपासावं. स्वत:च्या मनाने कुठलंच स्टिरॉइड गटात मोडणारं औषध डोळ्यांसाठी वापरू नये. त्यानेही काचबिंदूचा धोका वाढतो. यावर उपाय एकच, काही वर्षाच्या अंतराने डोळ्यांची तपासणी करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही ड्रॉप्स डोळ्यांत घालू नका.

महाहेल्थ अॅप..
ही सर्व माहिती 'महाहेल्थ' ह्या स्मार्टफोन अॅपमध्ये दिली आहे. या मोफत अॅपमध्ये सर्व आरोग्यविषयक माहिती ऑफलाईनसुध्दा वाचता येईल. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन क्लिक करा.

सखोल नेत्रतपासणी करा :
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतातील 2.6 टक्के लोकांना काचबिंदू होतो. नियमित आणि सखोल नेत्रतपासणीमुळे या डोळ्यांच्या आजाराचं निदान लवकरात लवकर होतं. भारतात काचबिंदू या डोळ्यांच्या आजाराला बळी पडणा-या स्त्रियांची संख्या जास्त आहे.

आयओपी उपचारपद्धती आणि काचबिंदू :
काचबिंदूवर कुठलेही उपचार नसले तरीही सध्याच्या परिस्थितीत एलिव्हेटेड इन्ट्रा ऑक्युलर प्रेशर (आयओपी) हा एकच उपचार योग्य आहे. सर्वात प्रभावशाली औषधांनी उपचार करणं आवश्यक असते. त्यात डोळ्यांच्या ड्रॉप्सद्वारे दीर्घकालीन नियंत्रणासाठी एलिव्हिटेड आयओपी कमी करता येऊ शकतो. काही वेळ शस्त्रक्रियाही उपयुक्त ठरू शकते. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी स्लिट लॅम्प तपासणी, ऑप्टिक डिस्क मूल्यमापन याही डोळ्यांच्या तपासण्या कराव्या लागतात.


आपली प्रतिक्रिया द्या :
वरील माहिती आपणास कशी वाटली? किंवा आपल्या काही आरोग्य विषयक समस्या, प्रश्न असल्यास आम्हाला कळण्यासाठी येथे क्लिक करा. आमचे तज्ञ डॉक्टर आपल्या विविध प्रश्नांचे निश्चितच समाधान करतील.