How to increase hemoglobin by Foods & home remedies in Marathi. Hb increasing Tips by Dr. Satish Upalkar.

हिमोग्लोबिन म्हणजे काय व हिमोग्लोबिनचे महत्व :

पोषकतत्त्वांच्या कमतरतेमुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. खाण्यात लोहाची कमतरता असल्यामुळे हे प्रमाण कमी होते. हिमोग्लोबिन हा रक्तातील अतिशय  महत्त्वाचा घटक असून, तो ‘आयर्न’ (लोह) आणि ‘प्रोटीन’ (प्रथिने) यापासून बनलेला असतो. रक्तामध्ये योग्य प्रमाणात हिमोग्लोबिन असावे लागते. रक्तातील हिमोग्लोबिन कसे वाढवावे, हिमोग्लोबीन वाढवण्यासाठी काय करावे, कोणता आहार घ्यावा याची माहिती येथे दिली आहे.

हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असावे..?

पुरुषांमध्ये 13.5 ते 17.5 तर स्त्रियामध्ये 12.0 ते 15.5 इतके हिमोग्लोबिनचे प्रमाण आवश्‍यक असते. मात्र अनेक जणांमध्ये हे प्रमाण कमी असल्याचे आढळते. खाण्यामध्ये लोह आणि प्रोटीनसारख्या भरपूर तत्त्वाचा वापर करुन हिमोग्लोबिनचा स्तर वाढवता येऊ शकतो.

हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे काय होईल..?

हिमोग्लोबिन कमी झाल्यास रक्तातील ऑक्सीजनच्या वहनाची क्षमता कमी होते. ज्यामुळे लाल रक्त-कणिकांची (RBC रक्तातील लाल पेशींची) संख्या कमी होते आणि अनीमिया होतो. जर शरीरात हिमोग्लोबिनचा स्तर भरपूर कमी असेल तर किडनी रोग, रक्ताची कमतरता, कँसर, पक्षाघात यासारखे आजार होऊ शकता. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे चक्कर येणे, त्वचा पिवळी पडणे, सुस्ती येणे अशा समस्या येऊ निर्माण होतात.

हिमोग्लोबिन वाढवण्याचे उपाय :

हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काय खावे – hb increasing foods in Marathi :

हिमोग्लोबिन कसे वाढवावे याची माहिती आत्ता जाणून घेऊया. हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी बीट, काळ्या मनुका, खजूर, आंबा, पेरू, सफरचंद ही फळे खावीत. यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते. हे रक्तातील हीमोग्लोबीनची निर्मीती करते आणि लाल रक्तकणांच्या सक्रियतेला वाढवते.

रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहार नियोजन पुढीलप्रमाणे असावे. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी जास्तीत-जास्त हिरव्या भाज्या खाल्या पाहिजे. या व्यतिरिक्त तीळ, पालक, दूध व दुधाचे पदार्थ, अंडी, नारळ, शेंगदाणे, गुळ, मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा यांमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढेल.

हिमोग्लोबिन कमी झाल्याने होणारे खालील आजारांचीही माहिती जाणून घ्या..

Written by - Dr. Satish Upalkar
लेखक हे वैद्यकिय तज्ञ आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत. माहिती आवडल्यास आमचे YouTube चॅनल Subscribe करा.
सूचना : या साईटवरील माहिती कॉपी-पेस्ट करून ती वेबसाईट किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध करू नये ही विनंती.

Dr. Satish Upalkar is the Founder and CEO of HealthMarathi.com. He is a Healthcare counsultant Doctor. He has completed his Bachelors in Medical Degree from Maharashtra...