फॉलिक ऍसिड :
फॉलिक अॅसिडमुळे शरीराची चयापचय क्रिया सुधारते. रक्ताचं प्रमाण वाढतं. शरीरातील लोहाचं प्रमाण कमी होत नाही. म्हणूनच फॉलिक अॅसिडचं प्रमाण असणारे गाजर, बीट, मुळा आणि त्याची हिरवी पानं, कोबी हे पदार्थ खावेत,
व्हिटॅमिन-B9 हे ‘फॉलिक अॅसिड’ या नावानेही ओळखलं जाते. गरोदर स्त्रिया, नवजात बालक यांना फॉलिक अॅसिडची गरज असते. फॉलिक अॅसिडमुळे पोटाचं आरोग्य सुधारते.
प्रत्येक प्रौढ व्यक्तीस प्रत्येक दिवसाला 200 मायक्रोग्रॅम इतकी ‘ब-9’ या जीवनसत्त्वाची गरज असते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरातील पांढऱ्या पेशीत जबरदस्त घट निर्माण होते. त्यातून ‘लुकोपेनिआ’ हा आजार निर्माण होतो. पंडुरोग (अॅनिमिया), अस्थिमज्जाचे विकारही होतात. पोटाचे विकार डोकं वर काढतात. हिमोग्लोबिनचे प्रमाण घटतं. ‘ब-9’ जीवनसत्त्व पुढील अन्नपदार्थातून मिळेल.
फॉलिक अॅसिड देणारा आहार, फळे व भाजीपाला :
संत्री, बदाम, केळी, सफरचंद, गाजर, बीट, कोबी, मुळा, लेटय़ूस, टोमॅटो, नारळ, दूध आणि त्यापासूनचे पदार्थ, यीस्टचे प्रकार, हिरव्या भाज्या, तांदूळ, गहू, गव्हांकुर, वाफवलेल्या डाळी, मका, शेंगदाणे, भेंडी, मसूर.
Read Marathi language article about Folic acid or Vitamin B9. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.