रक्त कमी असण्याची तक्रार आपल्यापैकी बऱ्याच जणांना असते. यामुळे हिमोग्लोबिन कमी झाल्याने अनीमिया, थकवा जाणवणे, अशक्तपणा यासारख्या समस्या होत असतात. यासाठी या लेखातहिमोग्लोबिन व रक्त वाढीसाठी कोणती फळे खावीत याची माहिती सांगितली आहे.
रक्त वाढीसाठी ही फळे खावीत –
रक्त व हिमोग्लोबिन वाढण्यासाठी लोह, फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन B12 असे पोषकघटक असणारी फळे खाल्ली पाहिजेत. यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढून रक्त वाढण्यास मदत होते. यासाठी रक्त वाढीसाठी डाळिंब, केळी, सफरचंद, संत्री, मोसंबी, टरबूज, खजूर ही फळे खावीत.
रक्त व हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी फळे –
डाळींब –
रक्त व हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी डाळींब हे सर्वात चांगले फळ मानले जाते. डाळिंबाच्या दाण्यात लोह, व्हिटॅमिन C अशी उपयुक्त पोषकतत्वे असतात. डाळिंबाचे दाणे खाल्याने किंवा डाळींबाचा रस पिण्यामुळे हिमोग्लोबिन वाढून रक्त वाढण्यास मदत होते.
केळी –
केळ्यात लोह, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स चे प्रमाण चांगले असते. त्यामुळे केळे खाल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. त्यामुळे रक्त वाढवायचे असल्यास केळे जरूर खा. केळी खाण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..
सफरचंद –
सफरचंदात लोह मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे सफरचंद खाल्याने हिमोग्लोबिन व रक्त वाढण्यास मदत होते. यासाठी सालीसकट दररोज एक सफरचंद जरूर खा.
संत्री व मोसंबी –
ह्या लिंबूवर्गीय दोन्ही फळात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन-सी मुळे लोहाचे शरीरात शोषण होण्यास मदत होते. त्यामुळे रक्त वाढवायचे असल्यास संत्री, मोसंबी यासारखी लिंबूवर्गीय फळे जरूर खावीत.
टरबूज –
टरबूजमध्ये भरपूर लोह आणि व्हिटॅमिन-सी असते. त्यामुळे टरबूज हे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते. रक्त वाढवण्यासाठी टरबूज देखील तुम्ही खाऊ शकता.
खजूर –
खजूरमध्येही लोहाचे भरपूर प्रमाण असते. खजूर खाल्याने हिमोग्लोबिन आणि रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. खजूर खाण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा..
हे सुध्दा वाचा – हिमोग्लोबिन किती असावे ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Read Marathi language article about Hemoglobin and Blood increasing Fruits. Last Medically Reviewed on February 26, 2024 By Dr. Satish Upalkar.