डोळ्यांचे आरोग्य व घ्यायची काळजी :
पंचेंद्रियांपैकी एक असलेल्या डोळ्यांमुळे आपण सर्व काही बघत असतो. डोळे हे महत्त्वाचे आणि नाजूक असे अवयव आहेत. ‘असेल दृष्टी तर, दिसेल सृष्टी’ या उक्तीप्रमाणे डोळे असतील तरचं आपण सर्व काही पाहू शकतो. त्यामुळे आपापल्या डोळ्यांची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. वाढलेले हवेचे प्रदूषण, स्मार्टफोन-कॉम्प्युटर-टीव्ही यासारख्या साधनांचा अतिवापर यांमुळे डोळ्यांचे आरोग्य आज धोक्यात आले आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी योग्य काळजी घ्यावी लागते.
डोळ्यांची काळजी घेण्यासाठी उपाय :
- डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्या.
- डायबेटिस, उच्च रक्तदाबाच्या या तक्रारीमुळे दृष्टिदोष निर्माण होण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे हे त्रास असणाऱ्यानी डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्यावी.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांत कोणतेही आयड्रॉप्स घालू नका.
- उन्हात काम करताना दर्जेदार गॉगल्स घाला.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करा. ‘अ’ जीवनसत्त्व असणारी फळे उदा. गाजर, बीट, टोमॅटो इ. खावीत.
- टीव्ही, स्मार्टफोनचा मर्यादित वापर करा. जास्त वेळ लॅपटॉप किंवा संगणकासमोर काम केल्यावर थोडावेळ डोळे मिटून शांत बसा.
- कॉम्प्युटर आणि तुमच्या डोळ्यांमधील अंतर योग्य प्रमाणात म्हणजेच 3 फुटांचे आहे की नाही याची खात्री करुन घ्या.
- प्रवास करताना वाचने टाळा.
- पुरेशी झोप व विश्रांती घ्या.
- जागरण करने टाळा.
- डोळ्यांचेही विशिष्ट प्रकारचे व्यायाम असतात. याबद्दलची माहिती आपल्या डॉक्टरांकडून घ्या. त्यानुसार डोळ्यांचा व्यायाम करा.
Read Marathi language article about eye health tips. Last Medically Reviewed on February 15, 2024 By Dr. Satish Upalkar.